Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

न्यायाधीन बंदीची देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली भेट

सोलापूर, दि.31:-  शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन बंदीसाठी स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमधील बंदी आणि कारागृह विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगल्या प्रकारे देखभाल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.               सोलापूर कारागृहातील 25 न्यायाधीन  बंदीवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आली आहे. त्याचबरोबर कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे. या सर्वासाठी शासकीय तंत्रनिकेतन येथील अल्पसंख्यांक समाजातील मुलीच्या शासकीय वसतिगृहात खास कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथे आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका पी. शिव.शंकर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कारागृह अधीक्षक दिगंबर इगवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अभियंता संभाजी धोत्रे, महानगरपालिकेचे नगर नियोजन अभियंता महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.                    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ...

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अर्सनिक अल्बम ३० होमिओपॅथिक या गोळ्याचे वाटप

प्रतिनिधी - 31 मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हुलजंती गावचे सुपुत्र बिरोबा रोडलाईन्स चे मालक उद्योगपती श्री कामानंद हेकडे , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री विकास चोपडे यांच्या वतीने हुलजंती येथे अर्सनिक अल्बम३० ह्या  होमेपेथीक गोळ्या  गावातील लोकांमध्ये वाटण्यात आल्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्या  गोळ्या उपयुक्त आहेत .हुलजंती मध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना ह्या महाभयंकर रोगाला आळ्या घालण्यासाठी गावातील काही तरुण अहोरात्र काम करत असून त्यांच्या सुरक्षेसाठी  ,कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष अमीर आतार निसार अत्तार श्रीकांत सोमुते पोलीस कर्मचारी , ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जामदार तसेच आरोग्य कर्मचारी  काम करीत असून  त्यांच्या मागणीनुसार गावातील लोकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे  यावेळी बिरोबा रोडलाईन चे मालक , उद्योगपती श्री कामानंद हेकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळ विकास चोपडे ग्रामसुरक्षा दल , कोरणा दक्षता समिती सन फाउंडेशन चे अध्यक्ष अमीर अत...

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा-पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि. 29 – जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.कोरोनाच्या प्रार्दुभावावर विचार करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी  चर्चा केली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीसांना या सूचना केल्या.                    जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागहात ही बैठक झाली. या बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, श्री. रणजितसिंह नाईकनिंबाळकर, श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, भारत भालके,  शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत,  संजयमामा शिंदे, यशवंत माने, प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी उपस्थित होते.                       याबैठकीत सर्व खासदार, आमदार यांनी आपल्या समस्या सूचना मांडल्या. यामध्ये आमदार ...

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 29: आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी  परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.              विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.              उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्...

पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे तिला समजल की ती स्वतःच त्यातून बाहेर पडेल

                                                                                             आज जागतिक मासिक पाळी दिन... सकाळी सकाळीच घरातीलच एक किस्सा आठवला. सध्या लॉकडाउनमुळे घरा घरात पापड्या कुरवडया बनवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत... तसाच कार्यक्रम काही दिवसांपूर्वी आमच्याही घरी चालू होता. घरात मासिक पाळी येणाऱ्या आम्ही तिघी. आई ,वहिनी आणि मी. त्यातही आईची पिशवी काढून टाकल्याने राहिलो आम्ही दोघीच वहिनी आणि मी... घरात एकीचे झाले  की एकीचे चक्र सुरू असते. त्यामुळे एकदा अशीच मजा घरात घडली. गेल्या महिन्यात आईने घरात कुरवडया बनविण्याचा घाट घातला, त्याही दोन टप्यात. पहिल्या टप्प्यातल्या कुरवड्या व्यवस्थित झाल्या अगदी कोणत्याही अडचणी व तक्रारीशिवाय . परंतु दुसऱ्या टप्प्यात मात्र आमच्या वहिनीबाईंची पाळी होती. त्यादिवशी सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि दत्ता द...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

इचलकरंजी मधील मुस्लिम समाजाने निर्माण केला आदर्श

प्रतिनिधी - इचलकरंजीमधील मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन लोकार्पण केले.यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर उपस्थित आहे. COVID_19 च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे ३६ लाख रुपयांची रक्कम #WarAgainstVirus साठी उपयोगात आणली या रकमेतून १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आले आहेत. कोरोना च्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात, पात, धर्माच्या पलिकडे जाऊन कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाइन उद्घाटन करताना गौरवोद्गार काढले.    

कारी मध्ये गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप करून ईद साजरी

  प्रतिनिधी - कारी मध्ये गरीब, वंचीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून रमजान ईद साजरी करण्यात आली. सध्या देशात कोरोना या रोगाचे सावट असल्यामुळे कारी येथील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज घरातच पठण केली. रमजान ईद अगदी साध्या पध्दतीने साजरी करून उरलेल्या पैश्यातुन वंचित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या किटच वाटप करण्यात आले. गावामध्ये 35-40 किटच वाटप मुस्लिम समाजाकडून करण्यात आले.यावेळी कारी गावचे उपसरपंच रिझवान सय्यद ,चांद मुजावर, आसिफ मुलानी, दाऊद आतार, तन्वीर मुलाणी, सकलेंन सय्यद,आदम मुजावर आदींनी परिश्रम घेतले.  

ईद मुबारक़

ईद मुबारक़ ईद मुबारक़ कैसे कहूँ ईद मुबारक़ फ़िर भी तुझको ईद मुबारक़ काम धाम सब बँद पड़े है भूखे पेट गरीब चले है छीन गई है रोजनदारी खाने के भी लाले पड़े है कैसे कहूँ ईद मुबारक़ फ़िर भी तुझको ईद मुबारक़ ईद मुबारक़ ईद मुबारक़ छाले पड़े थे पाँव में उसखे नंगे ही थे जी पाँव ही उसखे तड़फ किसे नजर जी आती मजदूर था किसे उसपे रहमत आती कैसे कहूँ ईद मुबारक़ फ़िरभी तुझको ईद मुबारक़ ईद मुबारक़ ईद मुबारक़ माँ पेट से थी फ़िरभी चल पड़ी थी बच्चोंके अरमानो की तो लाश पड़ी थी नम थी आँखे बाप के उसखे मजबूरी में बच्चे भी अब चल पड़े थे कैसे कहूँ ईद मुबारक़ फिर भी तुझको ईद मुबारक़ ईद मुबारक़ ईद मुबारक़ नए कपड़े लाने का जी अब होता नही भूखे ही जो घर चले है दर्द देखा जाता नही कैसे मैं मेरी खुशी घर मे  अपने मनालेता धूँप में जलते पाँव उसखे मैं कैसे हँस लेता कैसे कहूँ ईद मुबारक़ फिर भी तुझको ईद मुबारक़ ईद मुबारक़ ईद मुबारक़ दरदर भटक रहे है खाने कि तलाश में बचा नही है कोई राशन चूल्हे भी बँद पड़े है हवाई जहाजोंसे जो आई बीमारी पैदल ही निकल पड़ी है गरीब सवारी कैसे कह...

पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे दि. 24 :- पुणे विभागातील  3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  3 हजार 178 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.   यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 616 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 444 आहे. कोरोनाबाधित एकूण 267  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.   कालच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 336 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 249, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 22, सांगली जिल्ह्यात 3 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

ईद उल फित्र सोमवारी साजरी होणार - रुयते हिलाल कमिटी , सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी ) - सोलापूर शहर व जिल्हयामध्ये शनिवारी रात्री कोठेही चंद्रदर्शन झालेले नाही.त्यामुळे रुयते हिलाल कमिटीने सोलापूरच्या शुरा कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार रमजान चे 30 रोजे पूर्ण करून ईद उल फित्र सोमवारी 25 मे 2020 रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.मुफ्ती काझी सय्यद अमजद अली, मौलाना ताहेर बेग , मुफ्ती अब्दुल हमीद कासमी , राफे काझी , मौलाना इब्राहिम मंगलगिरी , मौलाना गुलाम गौस , मौलाना निसार अहमद पटेल आदी कमिटीच्या सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला.अशी माहिती सोलापूर शहर काझी मुक्ती सय्यद अमजद अली यांनी दिली आहे.

लॉकडाउन- माणसांशी माणसांसारख्या वागू शकणाऱ्या व्यवस्थांचा विचार करण्याची वेळ

कोरोना धुमाकूळ घालतोय तसतसा पडझडीला वेग आला आहे. अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था आणि खरं म्हणजे सबंध मानवजातच कोलमडून गेली आहे. पण बघाना, हे कोलमडन ही हर एक माणसासाठी सारखं नाहीये. पर्याय आहेत तिला चकवण्याचे अनेकांकडे. जीवनावश्यक वस्तूही लॉकडाउनच्या काळात मिळणं कठीण झालंय. घरी रोजचं दूध शेजारच्या गावातल्या डेअरीतून  यायच. लॉकडावुनमुळे दादाला दुकानं बंद करावं लागलं आणि तिकडे रोज जाण्याचा संबंध उरला नाही. मुलींसाठी दूध तर हवं, मग दूध पावडरचा पर्याय निवडला. फारसं काही अडून पडलं नाही. दिवसाआड कसली ना कसली भाजी गावात येतेच ती घ्यायची किंवा बरेच कडधान्य घरात आहेत त्यावर भागवायचं. पण कांदे संपायला आल्यावर अडचण होईल असं वाटायला लागलं. कांद्याचा वापर कमी करून शेंगदाना कुट उपयोगात आणला जाऊ लागला. कांदा संपायच्या आत दुसरे कांदेही मिळाले. गावात पण बरंसचं वातावरण असंच आहे. म्हणजे पोटाची चिंता तर सगळ्यांनाच आहे पण उपासमारीची वेळ काही काळ थांबवता येऊ शकेल अशी तर निश्चितच परिस्थिती आहे. नाहीच काही मिळालं तर भात शिजवून काढू दिवस. आहेत कणगी भरून भाताची, अशी चर्चा ओट्यांवर नक्की ऐकायला मिळेल. भूक ...

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ची सुरवात

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, UNICEF व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन उद्घाटन झाले.     करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी अशा एकूण१० हजार व्यक्तींची ऑनलाईन उपस्थिती होती. राज्यातील ९ वी ते १२ वीच्या ६६ लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१ हजार व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची   https://mahacareerportal.com या पोर्टलवर माहिती उपलब्ध आहे.तसेच अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क,...

नर्मदेश्वर शिक्षण संस्थेकडून पोलिसांना 100 मास्क व सॅनिटायझरचे वाटप

"देशावरील कोरोना संकटावर सहकार्याने मात केली पाहिजे माणसाकडून माणसासाठी मदतीचा सदैव हात पाहिजे" बार्शी (प्रतिनिधी - शुभम काशीद) -  राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच कुटुंबाची कोणतीही पर्वा नकरता चोवीस तास कर्तव्यावर राहणाऱ्या पोलिस बांधवांना श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगावचे सहसचिव हेमंत गडसिंग यांचे वतीने पांगरी पोलिस स्टेशन व वैराग पोलीस स्टेशन येथील एकूण 100 पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी पांगरी पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन हुंदळेकर,वैराग पोलिस स्टेशनचे एपीआय बजरंग कापसे,सहसचिव हेमंत गडसिंग,शैलजाताई गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,संचालक विलास मिरगणे,पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर गव्हाणे,सीआयडीचे अर्जुन कापसे,रेश्मा सुतार,सौदागर जाधव,उपस्थित होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखत खाकी वर्दीतला देवदूत बनून देख...

उडान फाऊंडेशनचे गरजू कुटुंबांना धान्य किटचे वाटप

बार्शी (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन काळात बार्शीतील उडान फाऊंडेशनने यावर्षीचा होणारा रमाजान ईदवरील खर्च टाळून गरजू कुटुंबांना किराना किटचे वाटप करून ईद साधेपणाने करणार असल्याचा संदेश दिला. प्रतिवर्षी उडान फाऊंडेशन व फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव जमील खान, उद्योजक युन्नुस् शेख, शब्बीर वस्ताद, शोएब काझी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ ईदसाठीचे  लागणारे साहित्य गेली पाच वर्षे बार्शीतील गरीब कुटुंबांना वाटप करते. परंतू यावर्षी नायब तहसीलदार संजीवन मुंढे व पुरवठा अधिकारी ऋषिकेश धनवडे यांच्या हस्ते किराणा किटचे सामान देऊन सुरवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव जमील खान यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, फाऊंडेशनने लॉकडॉऊन जाहीर झाल्यापासून बार्शीतील सर्वधर्मिय पाचशे कुटुंबांना आतापर्यंत किराणा मालाचे किट दिले आहेत. तसेच भगवंत अन्नछत्रालय, आंधळकर अन्नछत्रालय, ऍड.असिफभाई तांबोळी अन्नछत्रालय यांना देखील मदत केली असल्याचे सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, उद्योजक युन्नुस् शेख, शकिल मुलाणी, शोएब काझी, शब्बीर वस्ताद, वस...

NHM अंतर्गत राज्यात विविध पदांची भरती

पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे ● जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : 03 ● कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ : 76 ● फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार : 08 ● अर्थसंकल्प व वित्त अधिकारी  : 09 ● जिल्हा खाते व्यवस्थापक : 01 ● M&E सांख्यिकी अधिकारी : 01 ● ज्युनिअर इंजिनिअर-IDW : 02 ● एपिडेमिओलॉजिस्ट / सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS : 01 ● PPM समन्वयक : 01 ● सल्लागार VBD : 01 ● शहर कार्यक्रम व्यवस्थापक : 05 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र अर्जासाठी कोणतीही फी नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) : nrhm.recruit1@gmail.com अर्ज करण्याचा शेवट दिनांक : दि. 28 मे 2020 अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेटमध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडीवर पाठवा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या: https://www.nrhm.maharashtra.gov.in

CIPET संस्थेत विविध पदांची भरती

पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे : ● सिनिअर ऑफिसर 04 ● ऑफिसर 06 ● टेक्निकल ऑफिसर 10 ● असिस्टंट ऑफिसर 06 ● असिस्टंट टेक्निकल ऑफिसर 10 ● एडमिन असिस्टंट ग्रेड III 06 ● टेक्निकल असिस्टंट ग्रेड III 15 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत फी : नाही. अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director (Administration), CIPET Head Office, T.V.K Industrial Estate, Guindy, Chennai – 600032 अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 29 मे 2020 अधिक अधिकृत वेबसाईटसाठी क्लिक करा : https://www.cipet.gov.in/

कोरंन टाईन युवकांचा स्तुत्य उपक्रम

\ प्रतिनिधी -  मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा,हुलजंती येथे विलीनीकरण कक्षामध्ये याच गावातील परंतु बेरोजगार म्हणून राहाण्यापेक्षा उपजीविका करण्यासाठी मुंबई पुणे सातारा यासारख्या ठिकाणी, प्रा, कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेलेले व सध्या जगामध्ये कोरोना (covid-19) या विषाणूने महामायेचे थैमान घातले आहे, यामुळे आपल्या माय भूमी गावाकडे आलेल्या सहा युवकांनी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा हुलजंती येथे शासकीय कोरोना नियमानुसार 14 दिवसांसाठी जि प प्राथमिक शाळा येथे कोरंनटाईन करण्यात आले आहे. त्या दरम्यान या युवकाकडून आपण या शाळेत शिकलो मोठे झालो.तेव्हा आपल्या शाळेचे काही तरी देणे आहोत अशी भावना मनामध्ये येऊन. दोन दिवस कष्ट करून शाळा पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गेली दोन-अडीच महिने झाले शाळा बंद असल्याने अत्यंत भयावह कचरा जाळी झाली होती. ती पूर्णतः स्वच्छ करण्यात आल्या.कोरोना महामारी विषाणू बाबत रांगोळीतून संदेश देण्याचे काम पेंटर दिलीप भोरकडे यांनी केले . यामुळे या गावात या सर्व युवकांचे दिलीप भोरकडे , बाबुराव साळुंखे , संभाज...

आमच्यासाठी गाडी धावेल का ?

                                                     रस्ते आम्हीच बनवले पण त्या रस्त्यावरून आमच्यासाठी गाडी नाही धावली. म्हणून तो कामावर बहिष्कार नाही टाकला हे चित्र बार्शी  येथील पोस्ट ऑफिस समोरील सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आहे. लॉकडाउन मध्ये थोडी शिथिलता आली. आणि कामगार जो उपाशी होता तो तसाच पोटासाठी कामावर रुजू झाला. तोंडाला फडकं बांधलेलं.  दुपारच्या साडेबारा एक दरम्यान रखरखत्या उन्हात जीव गुदमरत होता ,त्यात पुन्हा शारीरिक अंतर आणि हे कामगार काम करत होते. उद्या पूर्ण लॉक डाऊन उठवल्यावर या रस्त्यावरून जाताना तुम्हा आम्हाला गाडी चालवताना तत्रास होऊ नये याची तो खबरदारी घेत तर नसेल?.  खर तर सगळीकडे भीतीच साम्राज्य पसरले असताना हे निडर जीवाची परवा न करता रस्त्याचं काम करायला उतरले. कारण त्यांच्या पोटात भुकेची आग होती. लेकरं उपाशी होती. लाखो कामगार आप आपल्या गावी मिळेल त्या वाहनाने , मिळेल त्या रस्त्याने, कोणी गा...

एमबीए सीईटी चा निकाल उद्या - उद्य सामंत

MAH - MBA /MMS  CET २०२० ही परीक्षा दिनांक - १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती ह्या  परीक्षेला  ११०६३१ उमेदवार बसले  होते सदर परीक्षेचा निकाल  उद्या दिनांक- २३/०५/२०२० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल.

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२२: कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.           बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खाजगी हॉस्पिटलचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. आपल्या सूचनांची प्रशासन निश्चित दखल घेईल. वेळोवेळी बैठका घेतल्या जातील. आपल्या सूचना वेळोवेळी पाठवा,असेही त्यांनी सांगितले.          यावेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, सोशल मिडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. कोरोनाच्या  बाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य...

खासगी हौस्पिटल घेणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.२२-  कोरोना विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील दवाखाने ताब्यात घेण्यात येतील,  अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.                    ज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काल  खासगी रुग्णालया संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार खासगी दवाखान्यातील रुग्ण्सेवेचा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी दवाखाने ताब्यात घेण्याचे अधिकार प्रशासनाला जिल्हा प्रदान करण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी शहर अथवा जिल्ह्यातील कोणतेही हॅास्पिटल उपचारासाठी ताब्यात घेऊ  शकतात. याबाबत सोलापूर शहरासाठी सोलापूर महापालिकेचे आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकचा कामगार धोरण विरोधी निषेध व मागण्या

बार्शी -  कोरोना लाॅक डाउन काळात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्र सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 22 मे 2020 रोजी देशव्यापी कामगार विरोधी धोरण निषेध दिन पाळत मागण्या मागण्यात आल्या.  यावेळी कार्यत्यांनी आपल्या हातात पोस्टर घेवून मागण्या मागीतल्या.  मा. पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मा. जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा यांना मेलव्दारे निवेदण पाठवण्यात आले आहे. या निवेदणात म्हटले आहे,  केंद्र राज्य सरकारांनी कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचे निर्णय रद्द करावेतण् कामाचे तास पूर्वीप्रमाणेच आठ तास करण्यात यावेत, लॉक डाऊन कालावधीचे वेतन कामगारांना विनाकपात अदा करा, पत्रकारांना 10 हजार रूपये निर्वाह भत्त द्याव सुरक्षा द्या, लॉक डाऊन मुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावीएत्यांना अन्न पाणी व औषध उपचार औषधोपचाराची व्यवस्था करावी, आयकर लागून नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला साडेसात हजार ...

शेततळे, ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी निधी द्यावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी

 सोलापूर, दि.21- जिल्ह्यातील शेततळे, अस्तरीकरणे कागद, ठिबक सिचन यांचे थकित अनुदान देण्यासाठी निधी मिळावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील 13261 कृषीपंपाच्या जोडणीची कार्यवाही व्हावी , अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, यांनी आज केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी कार्यालयातून व्ही.सी.व्दारे सहभागी झाले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे,कृषी सभापती अनिल मोटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विशेष अधिकारी पी शिवशंकर , परीविक्षाधीन आयएएस अधिकारी अंकित, जिल्हा ‍ि अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातून मागेल त्याला शेततळे योजनेला अतिशय मागणी आहे. त्याचबरोबर शेततळेसाठी लागणारा कागद, ठिंबक सचिनचे अनुदान थकित आहे. हे अनुदान थकित आहे. हे  अनुदान देण्यासाठी निधी द्याव. जिल्ह्यात 13261 कृषीपंपाच्या वीज जोडण्या बाकी आहेत. त्या लवकरात लवकर जोडून मिळाव्यात.’ पालकमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे देण्याच्...

गुळपोळीत एकल गरीब 21 कुटूंबाना धान्य किटचे वाटप

प्रतिनिधी - लाॅकडाउनचा चौथा टपा सुरू आहे सगळ काही ठप्प झाले असलं तरी माणुसकीचा झरा अविरतपणे सुरूच आहे. कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी 'घासातला घास' या उपक्रमा अंतर्गत आपल्या गूळपोळी गावातीलच गरीब  एकल कुटूंबाना नेहरू युवा मंडळ,नेहरू युवती मंडळ ,भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय, शिवतेज मंडळ  ,भैरवनाथ ग्रामविकास मंडळ , भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था या मंडळाच्या वतीने  धान्य किटचे वाटप करण्यात आले.         गूळपोळी गावातील गरजूंना वाटप केलेल्या या किटमध्ये 5 किलो तांदूळ ,5 किलो गहू ,1 लिटर तेल, 2 किलो बटाटे , 100 ग्रॅम चहा, 1 किलो साखर, 100 ग्रॅम चटणी याचा समावेश आहे.      आपल्या परिसरातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही याची दक्षता आपण घेऊयात आपण सर्वजण कोरोना विरोधात लढू आणी जिंकू देखील. या वेळी मंडळाचे अध्यक्ष व रुग्ण हक्क परिषद बार्शी तालुक्याचे अध्यक्ष  सूर्यकांत गोविंद चिकणे, गुलाब शेख, शहाजी चिकणे, अल्ताफ शेख.आप्पा चौधरी रेखा चिकणे, सुनीता चौधरी विद्या पाटील,व चंद्रकांत बारवकर, शिवाजी चिकणे, अतुल चिकणे ,रवींद्र गायकवाड,रामहरी काळे,...

रुग्णांबाबत माहितीसाठी डॉ.चौगुले यांची नियुक्ती

सोलापूर, दि.20 :- कोरोना विषाणूने बाधित असणाऱ्या रुग्णांबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी  सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. राजेश चौगुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. रुग्णांच्या संबंधितांनी त्याच्या सर्व प्रकारच्या शंका आणि समस्यासाठी डॉ. चौगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे. डॉ.चौगुले यांचे संपर्क क्रमांक 9420761286,9923001444 असे आहेत.

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 20 : - मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.   विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे,जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव,  तसेच  सार्वजनिक बांधकाम विभाग, यंत्र विभाग व  संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाच्या संकटाचा सामना करताना मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होऊ नये, याची दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन अद्ययावत ठेवावा. हा आराखडा तयार करताना मागील वर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नाल्यांची सफाई, विजेचे खांब व पाईपलाईन ची दुरु...

उस्मानाबाद मध्ये कोरोना चे 6 नवे रुग्ण

प्रतिनिधी : - { पुरूषोत्तम बेले } - उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 19 मे हा धक्कादायक ठरला असून मुंबई पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत , या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारनटाईन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद शहरातील 29 वर्ष रुग्णाला अगोदरच ब्लड कॅन्सर आहे तर तुळजापूर शहरातील कोरोना बाधीत महिला ही 6 महिन्यांची गर्भवती असून त्यांना विशेष वैद्यकीय निगरणीत ठेवण्यात येणार आहे. कळंब येथील रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनली असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागात असलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली असून तो तरुण मुंबई येथून सोलापूर पर्यंत खासगी जीपने त्याच्या आईसह 5 जणसोबत आला व त्यानंतर सोलापूरहुन 20 किमी पायी चालत हे आई व मुलगा उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आले व नंतर त्याचा भाऊ त्यांना दुचाकीवर उस्मानाबाद शह...

मांगवडगाव येथील आदिवासींना न्याय द्या, बार्शी आदिवासी महासभेची मागणी

 बार्शी- प्रतिनीधी-  आदिवासी महासंघ बार्शी तालूका कौन्सिल च्या वतिने मांगवडगाव तालुका केज जिल्हा बीड येथील पारधी समाजातील पवार कुटुंबीयांवर निंबाळकर कुटुंबियांनी जमीनीच्या वादातून केलेल्या हल्ल्यात 3 इसमांना ठार करण्यात आले या घटनेचा निषेध करीत हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करण्याची व आदिवासींना न्याय मिळवून देण्याची मागणी दिनांक 18 मे 2020 रोजी मा.मुख्यमंत्री यांना मेल व्दारे निवदेन पाठवून करण्यात आली आहे. या घटनेत मृत झालेल्या पारधी कुटुंबातील मयत तिघा कर्त्या पुरुषांचे वारसांना शासकीय नोकरी द्यावी. त्यांना  प्रत्येकी 25 लाख रुपये मदत द्यावी. न्यायालयीन निकालानुसार जमीन कसू द्यावी.पवार कुटुंबीयांना संरक्षण द्यावे हल्लेखोरांना कडक शासन व्हावे , अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर बार्शी आदिवासी महासभेचे निमंत्रक कॉ. तानाजी ठोंबरे, समिती सदस्य कॉ.  भारत पवार, कॉ. प्रविण मस्तुद, कॉ. विकास पवार, कॉ. अजय पवार, कॉ.  शैला काळे,  कॉ.  महादेव काळे,  कॉ. अर्जून पवार,  नागेश काळे,  दिपाली पवार यांच्या सह्या आहेत.

50 रुपयांत जनहित याचिका दाखल करा.

प्रतिनिधी - सर्वसामान्य माणसांना जनहित याचिका म्हणजे काय ? ती कशी सादर करावी ? किती खर्च येतो ? ह्या सगळ्यांची सविस्तर माहिती देत आहेत  ,विधी विद्यार्थी बोधी रामटेके. नक्की पाहा सहकार्य - पाथ फौंडेशन , संविधान प्रचारक

संयुक्त महाराष्ट्राची अमर गाथा

प्रतिनिधी / सोलापूर -संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रगण्य नेतृत्व कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जीवनावर आधारित ABS न्युज चा विशेष कार्यक्रम संयुक्त महाराष्ट्राची अमर गाथा ,नक्की पाहा.

कोरोना , लॉकडाउन , पर्यावरण

प्रतिनिधी -जगभर कोरोना या विषाणू ने थैमान घातले आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केले आहे.लॉकडाऊन मुळे निसर्गात खूप सारे बदल दिसत आहे.ओझेंन वायू चा थर वाढला आहे , हवा साफ झाली. ह्या सर्वांचा पर्यावरणार झालेला परिमाण आपल्याला सांगत आहेत प्रा.विनायक साळुंखे ,सोलापूर विद्यापीठ.

जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली कोरोना प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

सोलापूर,दि.19- सोलापूर शहरामधील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील झोन क्रमांक 2 येथील किसान संकुल, विडी घरकुल, तुलशांती नगर तसेच झोन क्रमांक 3 मधील एकता नगर येथे आज जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व  महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील नागरिक आणि आरोग्य सेवकांकडून माहिती जाणून घेतली.           यावेळी प्रभागातील नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार हंचाटे, विठ्ठल कोठे, नगरसेविका कुंमुद अंकाराम, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगर अभियंता संदीप कारंजे,  अधिकारी नीलकंठ मठपती, शकील शेख आदी उपस्थित होते. प्रतिबंधित ठिकाणी सर्व्हे करत असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी परिस्थितीची माहिती घेतली. सर्व्हे करणाऱ्या कर्मचारी यांना काही अडचणी आहेत का? याची विचारपूस केली. तसेच या भागात सारी व कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्या भागातील जेष्ठ नागरिकांची तपासणी लावकरात लवकर करण्यात यावे, तसेच त्यांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात यावे, जेणे करून त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल, अ...

अंगणवाडी शिक्षिका शिवलिला यांचा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा

अक्कलकोट / प्रतिनिधी - सध्या भारतासह जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे.अशा जीवघेण्या कोरोनापासून गाव पातळीवर संरक्षणाचे काम अंगणवाडी सेविका व आशा वर्कर वर आहे. यामध्येच प्रतिवर्षी प्रमाणे शिवलिला दोडमनी मॅडम यांचा वाढदिवस आला.नुकताच काही महिन्यापुर्वी त्यांचा साखरपुढा झालेला आहे.त्यांचे होणारे पत्ती जयकुमार सोनकांबळे असुन त्यांचे शिक्षण बी.ए, एम.ए, बी.एड झालेत.शिवलिला मॅडम चे शिक्षण डी.एड, बी.ए झाले असुन ते अंगणवाडी शिक्षिका म्हणुन कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुकामधील चलगेरी या गावी कार्यारत आहेत.ते दोघे ही उच्च शिक्षित,उच्च विचारसरणी व साधा राहणीमान आहे.आपल्या प्रिय बायकोचा वाढदिवस जरा हटके आणि एकदम उत्साहात साजरा कराण्याचा ठरवले होते.पण शिवलिला मॅडमने आपल्या वाढदिवसाचा खर्च समाजाच्याच कामी यावा असे मत व्यक्त केले.म्हणुन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "आपणही समाजाचं काही देणं लागतो" या उदान्त हेतूने त्यांचा उच्च शिक्षित असलेला होणाऱ्या नवरदेवाने त्यांच्या वतीने जि.प.शाळेत काॅरटाईन असलेल्या लोकांना,चालत जाणाऱ्या मजुराना,कामगाराना असे अनेक गरजू ल...

छोट्या आस्थापनेतील मजुरांना लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन द्यावे – संविधान प्रचारक

प्रतींनिधी / बार्शी - छोटे दुकाने , व्यवसाय व हॉटेलमधील कर्मचारी व वेटर यांना कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन संबंधित मालकाने द्यावे ह्या आशयाचे निवेदन संविधान प्रचारक मनीष देशपांडे यांच्या वतीने मा.मुख्यमंत्री , जिल्हाधिकारी सोलापूर तसेच तहसीलदार बार्शी यांना ईमेल द्वारे   देण्यात आले. असे निवेदन सपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रचारक यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की लॉक डाऊन जाहीर करताना देशाचे मा.पंतप्रधान व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री यांनी आपल्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांचे पगार कापू नका असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना किमान वेतन दयावे असे आदेश दिले आहेत . त्यानुसार कामगार विभागाने तसे पत्रही काढले परंतु आज तालुका व जिल्हा स्तरावरील छोटी दुकाने , छोटे व्यवसाय व हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कामगारांना अनेक ठिकाणी त्यांच्या मालकांनी या लॉकडाउन च्या कालावधीतील किमान वेतन दिले नाही असे निदर्शनास येत आहे . पुन्हा त्याच मालकाकडे लॉक डाऊन नंतर कामावर जायचे असल्याने त्या भीतीपोटी कोणीही कामगार प्रशासनाकडे तक्रारीसाठी पुढे येणार नाही....

शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

       पंढरपूर, दि.18:- गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी  जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले. त्यांच्यावर आज मूळ गावी पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुळूज ग्रामस्थांनी व उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.            कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतराचे पालन करीत गावकरी अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. आज दुपारी 12:30 वाजता शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने  यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी आणण्यात आले. यावेळी  शहीद धनाजी होनमाने  यांचे मोठे बंधू विकास होनमाने यांनी अग्नी  दिला.           यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने आदींनी शहीद धनाजी होनमाने यांच्या कुटुबियांची भेट घेवून सांत्वन केले. शासना...