सोलापूर, दि.20 :- कोरोना विषाणूने बाधित असणाऱ्या रुग्णांबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. राजेश चौगुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. रुग्णांच्या संबंधितांनी त्याच्या सर्व प्रकारच्या शंका आणि समस्यासाठी डॉ. चौगुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे. डॉ.चौगुले यांचे संपर्क क्रमांक 9420761286,9923001444 असे आहेत.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...
Comments
Post a Comment