Skip to main content

छोट्या आस्थापनेतील मजुरांना लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन द्यावे – संविधान प्रचारक



प्रतींनिधी / बार्शी - छोटे दुकाने,व्यवसाय व हॉटेलमधील कर्मचारी व वेटर यांना कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन संबंधित मालकाने द्यावे ह्या आशयाचे निवेदन संविधान प्रचारक मनीष देशपांडे यांच्या वतीने मा.मुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी सोलापूर तसेच तहसीलदार बार्शी यांना ईमेल द्वारे  देण्यात आले.असे निवेदन सपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रचारक यांच्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की लॉक डाऊन जाहीर करताना देशाचे मा.पंतप्रधान व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री यांनी आपल्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांचे पगार कापू नका असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना किमान वेतन दयावे असे आदेश दिले आहेत . त्यानुसार कामगार विभागाने तसे पत्रही काढले परंतु आज तालुका व जिल्हा स्तरावरील छोटी दुकाने,छोटे व्यवसाय व हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कामगारांना अनेक ठिकाणी त्यांच्या मालकांनी या लॉकडाउन च्या कालावधीतील किमान वेतन दिले नाही असे निदर्शनास येत आहे . पुन्हा त्याच मालकाकडे लॉक डाऊन नंतर कामावर जायचे असल्याने त्या भीतीपोटी कोणीही कामगार प्रशासनाकडे तक्रारीसाठी पुढे येणार नाही.हे गृहीत धरून प्रशासनाने मा.तहसीलदार व पोलीस यंत्रणेमार्फत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावरील कापड दुकाने, सराफ दुकाने व इतर दुकाने हॉटेल व छोटे व्यवसाय या ठिकाणी अशाप्रकारे लॉकडाउन च्या कालावधीतील वेतन देण्यात यावे असे पत्ररूपाने आदेश द्यावेत. यासाठी तालुकास्तरावर मा . तहसिलदार व मा.पोलिस निरीक्षक यांनी संयुक्तपणे मोहिम राबवावी अशा सुचना दयाव्यात व छोट्या आस्थापनेतील मजुरांना लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन मिळवून द्यावे अशी मागणी मा.मुख्यमंत्री जिल्हाधिकारी सोलापूर यांना या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.


Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...