आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप
सोलापूर /विशेष प्रतींनिधी - सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले गटनेते चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे हे उपस्थित होते. यानंतर माननीय आमदार यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची त्यांच्या कार्यालयात तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सीओ श्री.दिलीप स्वामी यांची देखील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. आमदार लाड यांच्या वतीने जूळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी येथील शासकीय क्वारंटाइन सेंटर मधील महिला डॉक्टर तसेच रुग्णसेवक यांना १०० PPE कीट प्रदान करण्यात आले.यावेळी मनपा उपायुक्त धनराज पांडे, मनपा क्रीडाधिकारी...