Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

कामगार कायद्यांची मोडतोड व कामगार दिन

                            केंद्र सरकारने  गेल्या कित्येक वर्षाने श्रमिकांनी मोठ्या लढ्यातून मिळवलेले कामगार कायदे , लेबर कोड करून मोडण्याचा डाव आखला आहे.  या परिस्थितीत आपण देशात आंतराष्ट्रीय कामगार दिन साजरा करीत आहोत. या लेखात हे लेबर कोड काय आहेत व या लेबर कोडमूळे कामागरांना काय तोटे होणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाउन मूळे देशाभरात असणारा मजूर वर्गाचे भांडवली केंद्रापासून पलायन सूरू झाले. यामध्ये कित्येक कामगारांनी आपल्या अंगा खांद्यांवर, सायकलींवर वयस्कर माणसे , मुली, बायका यांना वाहून नेले. यात कित्येकजण मृत पावले, यामध्ये उपाशी मरण्याचा हिशोब देखील झाला नाही. याच काळात औरंगाबाद परिसरात रेल्वरूळावर आपल्या भाकरी पदरात बांधून घेवून जाणार्‍या मजूरांना रेल्वेने चेंगरलेले सर्व देशाने पाहिले. ही सर्व विदारक अवस्था लॉकडाउन काळात झाली. याच काळात लेबर कोड लागू केले गेले आहेत. लेबर कोड 01/04/2021 पासून लागू होणार आहेत.  कष्टकरी लॉकडाउने मरत असताना याच काळात कष्टकरी वर्गाने कित्येक वर्षाप...

मशिदीत केली रुग्णाच्या नातेवाईकाची राहण्याची सोय

  बार्शी/प्रतिनिधी- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोणा  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि परिसरामध्ये कोरोणा विषाणू ने  थैमान घातलेले  सध्या पाहायला मिळत आहे.  येथील सर्वच दवाखाने कोरोना रुग्णा साठी आरक्षित केले असून हजारोंच्या संख्येने रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र रुग्ण उपचार घेत असताना त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची आणि राहण्याची होणारी गैरसोय ही महत्त्वाची बाब होती हे लक्षात घेऊन बार्शीत बागवान मक्का  मशिदी ने पुढे येऊन या मशिदे मध्ये 100 बेडचे नातेवाईकांसाठी राहण्यासाठी सोय केली आहे.  अनेक जण कोरोणाच्या संकटास तोंड देत आहेत त्यात आता बार्शीतील शिवसेना  नेते भाऊसाहेब आंधळकर व बागवान मक्का मदीना चे सर्व विश्वस्त यांनी मिळून ही व्यवस्था केली आहे. बागवान मक्का मस्जिद यांच्या संयुक्त विद्यमाने मज्जिद च्या जागेमध्ये शिवसेनेने केली बार्शी शहर तालुक्याच्या बाहेरील भूम,  परांडा , उस्मानाबाद,  जामखेड खर्डा , अहमदनगर,  पुणे , मोहोळ,  करमाळा येथील को बीड पेशंटच्या 100 स्त्री...

महिला रुग्णांवर करणार महिला डॉक्टर उपचार , राज्यातील पहिलाच प्रयोग

  सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या सामान्य रूग्णालाही बेड उपलब्ध होत नसल्याचं वास्तव आहे. गावातल्या गावात कोरोना रूग्णांना उपचार मिळून रूग्ण त्वरित बरा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजार लोकसंख्येच्या गावात ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये महिला कोरोना रूग्णांवर महिला डॉक्टर आणि कर्मचारी उपचार करणार आहेत. महिला रुग्णांना पुरुष वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याशी अडचणी व इतर होणारा त्रास सांगणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील महिलांना याबाबत अधिक अडचणीचा सामना करावा लागतो. महिला कोरोना रुग्णांची ही अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेचे सी ई ओ दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील सध्या सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये महिला रुग्णांच्या सेवेसाठी महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात येण...

भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

  ३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक). आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों कुटुंब या व्यवसायात कार्यरत असून कित्येक कोट्यावधींची उलाढाल होते. कोटीच्या कोटी उड्डाणे चित्रपट घेतात असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात मराठी भाषिक चित्रपटांनी सुद्धा ही कोटींची उड्डाणे पूर्ण केली आहेत, त्यावरूनच या व्यवसायाची महती कळते. भारतीय चित्रपट मुर्हूतमेढ मुंबईच्या सँडहर्स्टरोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. दादासाहेबांसह अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पाहात होते. मात्र चित्रपट पाहतांना दादासाहेबांच्या मनात वेगळ्याच विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. च...

बार्शी बाजार समिती उभारणार १०० बेडचे कोविड सेंटर - सभापती रणवीर राऊत

बार्शी/प्रतिनिधी - बार्शी बाजार समितीच्या वतीने १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी बाजार समिती ची 30 एप्रिल रोजी तातडीची सभा बोलावण्यात आली आहे. या सभेमध्ये कोविड केअर सेंटर उभारणीच्या खर्चाच्या विषयास मंजुरी घेउन तसा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत पणन संचालक , पणन संचालक पुणे , महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कोविड सेंटर उभारण्यात येईल. अशी माहिती सभापती रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. बार्शी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जातात. ह्या उपाय योजना  सध्या अपुऱ्या पडत आहेत.  बार्शी बाजार समितीच्या फळे भाजीपाला विभागातील सेल हॉल १० हजार चौ.फू क्षेत्रफळाचे आहे. सदर जागेत १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याची क्षमता आहे. बार्शी बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये ५ डॉक्टर व 20 परीचालिका यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच बाजार समितीच्या वतीने लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून दि...

आसाम मध्ये भूकंपाचे झटके

गुवाहाटी/वृत्तसंस्था - आसाम मध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या अनुसार सकाळी 07:51 यांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 6.4 रिक्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र सोनित पुर जिल्ह्यात होतें. भूकंपाचे झटके आसामची राजधानी गुवाहाटी मध्ये जाणवले. भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध नाही. भूकंपाने रस्त्याला गेले तडे पाहण्यासाठी - येथे  क्लिक करा पंतप्रधानांची आसामच्या मुख्यमंत्र्यांशी भूकंपासंदर्भात चर्चा; सर्व प्रकारच्या मदतीचे पंतप्रधानांचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी राज्यातील काही भागात झालेल्या भूकंपासंदर्भात चर्चा केली. एका ट्विटमध्ये मोदी म्हणालेः “आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालजी यांच्याशी राज्यातील काही भगात झालेल्या भूकंपांसंदर्भात माझे संभाषण झाले. केंद्राकडून सर्व शक्य मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मी आसाममधील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. ”

नर्सने लगावली डॉक्टरांच्या कानशिलात

 रामपूर/वृत्तसंस्था - कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे.  आरोग्य कर्मचारी , डॉक्टर्स ,  नर्सेस आणि इतर लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतो आहे. एखादा रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांकडून रुग्णालयात तोडफोड झाली अशा घटना आपण ऐकत असतो पाहत असतो. व्हिडिओ पाहण्यासाठी हया लिंक वर क्लिक करा. काल रामपूर (उत्तर प्रदेश) मध्ये अशीच एक वेगळी घटना घडली.रामपूर जिल्हा रूग्णालयात काल एक डॉक्टर आणि एक परिचारिका यांच्यामध्ये  भांडण झाले.हा वाद इतका विकोपाला गेला की परीचालिकेने डॉक्टर च्या कानशिलात लावली.   यावर शहर दंडाधिकारी रामजी मिश्रा म्हणतात, "मी या दोघांशी बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे की ते तणावग्रस्त होते ,  दडपण आले होते. आम्ही याची चौकशी करू आणि या दोघांशी बोलू. हया यासंबंधीचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे.

मालवंडी येथे कोरोना जागृती रॅली

  बार्शी/प्रतिनिधी - एकात्मिक बाल विकास विभाग पंचायत समिती बार्शी च्या वतीने मालवंडी येथे कोरोना जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोरोना कालावधी मध्ये घ्यायची काळजी,हात धुण्याचे महत्त्व, सोशल डिस्टंसिंग चे महत्व तसेच लसीकरणाचे महत्त्व याबद्दल गावामध्ये जनजागृती करण्यात आली. मास्कचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे.जेणेकरून गाव कोरोना मुक्त होऊ शकेल याबद्दल या रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.मालवंडी चे सरपंच हनुमंत होनमाने , ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गवळी, रामलिंग घेवारे, शिवाजी पाटील, पर्यवेक्षिका अनुराधा मिस्किन ,भोसलेे सर , मुंडे सर, भारत होनराव, कुलकर्णी सर, नितीन पाटील यांनी या रॅलीमध्ये उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन केले.  रॅली यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका जयश्री उकरंडे, जिजाबाई यादव, रेणुका राजगुरू, दिपाली यादव , मदतनीस सुरेखा काटे, आशा क्षिरसागर, प्रभावती भागवते, राणुबाई सरवदे यांनी परिश्...

बार्शीत पक्षांच्या घरट्यांचे व चारापाणी डब्यांचे वितरण

  बार्शी/प्रतिनिधी  - जागतिक चिमणी दिनानिमित्त चार  सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे उपक्रम राबवून, पक्षांसाठी अन्न, पाणी व निवारा उपक्रमात पुठ्ठ्याच्या नळीची ४०० घरटी, ६०० चारापाणी डबे, ४८० पाण्याचे प्लास्टीकचे टब इत्यादींची निर्मिती व उपलब्धता करण्यात आली. या उपक्रमाचे ऑनलाईन उदघाटन ज्येष्ठ पक्षीमित्र आणि ३४ व्या पक्षीमित्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ.निनाद शहा, आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष, डॉ.जयंत वडटकर, अमरावती यांच्या हस्ते ऑनलाईन चित्रफित आणि मार्गदर्शनाद्वारे करण्यात आले.  वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या लिंगायत बोर्डिंग येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी वीरशैव लिंगायत समाजचे अध्यक्ष विलास रेणके, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास मस्के, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, अॅनीमल फ्रेंडस संघटनेचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या हस्ते पक्षीमित्र गोविंद बाफणा, प्राणीमित्र धन्यकुमार पटवा यांना प्रातिनिधीक स्वरुपात पक्षांची घरटी आणि चारापाणीडबे देवून वितरणाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजक संस्थांनी उपक्रमाबाबत व वितरणाच्या नियोजनाची माहिती...

पोलिसांनी दाखवली माणुसकी , वृद्धावर केले अंत्यसंस्कार

  पंढरपूर -सांगवी(पंढरपूर) येथील वृद्धाचा शेतात कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबातील सर्व लोक पॉझिटीव्ह असल्याने ते विलगीकरण कक्ष सेंटर पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल असल्याने त्यांचे अंत्यविधी करिता कोणी इसम पुढे येत नसल्याने करकंब पोलीस ठाण्याचे PSI श्री मुंडे यांनी पुढाकार घेऊन सदर मयताचा अंत्यविधी त्यांचे जवळचे नातेवाईक सुन व जावई यांचे उपस्थित केला. कोरोनाचा देशात प्रवेश झाल्यापासून अजतायागत पोलीस जनतेची सेवा करत आहेत. संचार बंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलीस काठ्यांचा प्रसाद येताना आपण पाहिले आहे. अनेक समाजसेवी संस्था व्यक्ती आजच्या घडीला मृत्यु रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेत आहेत. पंढरपुरातील त्या कोरोना रुग्णाच्या मृतदेहाला अग्नी देऊन आम्ही कशातच कमी नाही हे जणू महाराष्ट्र पोलिसांनी दाखवून दिले आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार मोफत लस

  मुंबई - राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे.त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी  यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली. केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५ वयाहून कमी असलेल्यांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविशिल्ड लस केंद्राला १५० रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना देणार आहे. कोव्हॅक्सिनची किंमतसुद्धा ६०० रुपये राज्यांना आणि खासगी रुग्णालयांकरिता १२०० रुपये असणार आहे, असेही ना. नवाब मलिक यांनी सांगितले.  मागच्या कॅबिनेटमध्ये या दरांबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होऊन राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर मा. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कालच तसे जाहीर केले आहे, अ...

एक भारत श्रेष्ठ भारत एनसीसीच्या नॅशनल कॅम्पमध्ये अनिशा नंदीमठने पटकावला द्वितीय क्रमांक

  श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाची कॅडेट आहे अनिशा प्रसाद नंदीमठ   बार्शी / प्रतिनिधी - एनसीसीच्या    वतीने आयोजित "एक भारत श्रेष्ठ भारत" ऑनलाइन राष्ट्रीय कॅम्प मध्ये बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील कॅडेट अनिशा प्रसाद नंदीमठ हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.   अधिक माहिती अशी की , एनसीसी नॅशनल निदेशालयाने महाराष्ट्र , केरळ व लक्षदीप एन . सी . सी निदेशालय यांच्या संयुक्तपणे या कॅम्पचे आयोजन केले होते. हा कॅम्प 16 एप्रिल 2021 ते 21 एप्रिल 2021 या दरम्यान पार पडला.   या कॅम्पमध्ये एकूण   365 कॅडेट सहभागी झाले होते . महाराष्ट्रातील सर्व बटालियन मधून कॅडेट सहभागी झाले होते. या कॅम्पमध्ये राज्यांचा इतिहास , भूगोल , संस्कृती , वारसा , सणवार , भाषा , लिडरची ओळख यांची देवाण-घेवाण झाली. कॅडेटनी चित्र दृष्य प्रणाली   (पीपीटी) व्दारे आपआपल्या राज्यांचा आभास निर्माण करून या राज्यांना भेट दिल्याची जाणीव निर्माण करून दिली.   तसेच बॅन ऑन सिंगल यूज प्लास्टीक अँड फिट इंडिया चळवळ सारख्या विषयांवर वैचारिक चर्चा घडवूण आणली ...

नागपूरची अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद

  क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन मुंबई : पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, अशा शब्दात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कौतुक केले .  अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. मंत्री श्री.केदार म्हणाले, अल्फियाला शासनाकडून 3 लाख रोख रक्कमेचा पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. तसेच पुढील स्पर्धांच्या सरावासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंडमधील जागतिक  यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे. अल्फिया पठाणने गुरुवारी पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली. ज्युनिअर आशियाई विजेती अल्फिया ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्य...

सरपंचांनी दिली कोरोना रुग्णांसाठी मोफत गाडी , संघटनेने केला सत्कार

  सरपंच परिषद राज्यातील सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील - अँड विकास जाधव प्रदेश सरचिटणीस      बार्शी/प्रतिनिधी - सरपंच परिषद  महाराष्ट्र यांच्या वतीने सरपंच परिषदेचे सरचिटणीस अँड विकास जाधव यांच्या हस्ते   तसेच रस्तापुरचे सरपंच दादासाहेब बरबडे,उंबर्गेचे सरपंच दादासाहेब विधाते यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील मांडेगाव ग्रामपंचायत मध्ये जाऊन मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे यांना कोरोनाच्या काळात स्वतःची गाडी कोरोना रुग्णासाठी मोफत रुग्णवाहिका म्हणून दिल्या बद्दल तसेच मागील वर्षी पासून कोरोनाचा गावात सिरकाव होवू नये म्हणून अतिशय प्रभावी काम केले होते ग्रामविकासात नाविण्यपूर्व व यशस्वी कार्यबदल  आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ग्रामसेवक प्रमोद बाबर,ग्रा, सदस्य बंडू  दळवी,तानाजी मिरगणे, विष्णु मिरगणे यांचा सह ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच परिषद प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष अनिल गिते, सरचिटणीस अँड विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरपंचाचा मानसन्मान वाढवण्यासाठी तसेच आदर्श निर्मा...

बार्शीतील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडीसिव्हिर इंजेक्‍शन वाढवून द्या –भाकप

  बार्शीतील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन , रेमडीसिव्हिर   इंजेक्‍शन   वाढवून द्या –भाकप     बार्शी / प्रतिनिधी – बार्शी तालूक्‍यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन , रेमडीसिव्हिर  इंजेक्‍शन व कोरोना लसीचे दोन्ही डोस वाढवून देण्‍याची मागणी भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या वतीने मा. जिल्‍हाधिकारी यांच्‍या कडे करण्‍यात आली आहे.   ई-मेल द्वारे मा.मुख्‍यमंत्री व मा. तहसिलदार बार्शी  यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.   निवेदनात म्‍हणले आहे , बार्शी तालूका हा उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयातील काही तालूक्यांच्या जवळचा आहे.   बार्शीत दवाखान्याची संख्या जास्त आहे. त्यामूळे सर्वच ठिकाणचे रुग्ण येथे येतात . बार्शी तालूक्‍यातील वाढणारे कोरोनाचे रुग्ण व बाहेरील रुग्ण असा दुहेरी ताण आहे . बार्शीत मृतांची संख्या देखील जास्त आहे. अशा परस्थितीत बार्शी तालूक्याचे लोकप्रतिनीधी मा. आमदार यांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन , रेमडीसिव्हिर   इंजेक्शन व कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस वाढवून मिळणे गरजेचे झाले , असल्याच्या मुद्या उपस्थित केला होता . त्या मुद्यांचे...

आ.प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पालकमंत्री करा - काँग्रेस कार्यकर्ते राकेश नवगिरे यांची मा. मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाकडे विनंती

  बार्शी / प्रतिनिधी – सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.विद्यमान पालकमंत्री यांना स्थानिक प्रश्नांची माहिती नसल्यामुळे तातडीचे निर्णय घेण्यास विलंब होतो आहे.आ.प्रणिती यांना स्थानिक प्रशासनाची नस माहिती असल्याने यंत्रणा हाताळण्यात वेळ लागणार नाही.म्हणून आ.प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पालकमंत्री करा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते राकेश नवगिरे यांची मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाकडे केली आहे.                                                                                                 महाविकास आघाडी चे सरकार आल्यापासून सोलापूरचे दोन पालकमंत्री बदलले आहेत.विद्यमान पालकमंत्र...

प्रवासासाठी आता लागणार ई- पास

  मुंबई - आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता:-  http://covid19.mhpolice.in  अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा. असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार करावी खतांची खरेदी - कृषी विभागाचे आवाहन

   सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी जास्तीत जास्त किरकोळ किंमतीने (एमआरपी) करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांच्या किंमतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून 0217-2726013 यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जयवंत कवडे यांनी केले आहे.  काही खत उत्पादक कंपन्यांनी खताची दरवाढ केली आहे. खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे दर ग्रेडनिहाय वेगवेगळे आहेत. विक्रेत्याकडे जुना व नवीन दोन्ही प्रकारचा रासायनिक खत साठा आहे. विक्रेत्यांना जुना शिल्लक साठी पूर्वीच्याच दराप्रमाणे एमआरपीनुसार विकणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करताना विक्रेत्यांकडे ई-पॉस मशिनवरील बिलाचा आग्रह धरावा. ई-पॉस मशिनवर जुन्यासाठीचे दर जुन्या दराने येतात, खरेदी केलेल्या खतांची पक्की पावती घ्यावी. शेतकऱ्यांनी ई-पॉस मशिनवरील बील, खताच्या पोत्यावरील एमआरपी आणि पक्के बील तपासून घ्यावे. याबाबत तक्रारी किंवा अडचणी असल्यास कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंव...

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक

                                                                                                                                                                                                            दिल्ली /वृत्तसंस्था -मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या मुलाचे गुरुवारी सकाळी निधन झाले. आपल्या मुलाचे निधन झाल्याची बातमी त्यांनी ट्विटरद्वारे दिली. ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की आशिष येचूरी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर,  परिचारिका व स्वच्छता कर...

कोरोना साथीच्या काळात भावनिक मनोबल वाढीसाठी मानस मैत्र हेल्पलाइन

   महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा  उपक्रम बार्शी /प्रतिनिधी –कोरोनाची रुग्णसंख्या देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे एका वर्षांनंतर ही समाज धास्तावलेला आहे. माध्यमांमधून जगभरातील कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या  बातम्या येत आहेत. कोरोनाचा शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर  परिणाम होत आहे. लोकांना   मानसिक आधार व भावनिक प्रथमोपचार मिळावा  यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा  यांच्या वतीने मानस मैत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. समाजातील काही लोक कुटुंबापासून दूर आहेत. अशा वेळी कोणाशीही  प्रत्यक्ष भेट न होणे , हे तणावाचे कारण असू शकते. कोरोना बाबत समाजमाध्यमातून उलट –सुलट माहिती पसरते आहे. अंत्यविधीच्या बातम्या भडक स्वरुपात सोशल मीडिया व टेलिव्हिजनच्या  माध्यमातून प्रसारित होत आहेत.या सर्वांमुळे लोकांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कशामुळे संसर्ग होऊ शकतो , काय केल्याने आपण कोरोना पासून स्वत:ल...

१० वी चे वाजले १२ ! परीक्षा रद्द वरुन संमिश्र भावना ; गुणांकन होणार कसे? हा प्रश्न

फोटो-प्रतिकात्मक    बार्शी/अब्दुल शेख – राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापांचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापांच्या गुणाने समाधानी नसतील.त्यांच्यासाठी परीक्षा घ्यायची की किंवा अन्य कोणत्या तर्‍हेने पुढ जायचं याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आता पहिली ते दहावी पर्यतचे विद्यार्थी परीक्षा न देता पुढील वर्गात जाणार आहेत.दहावी नंतर विद्यार्थ्यांना अकरावी , डिप्लोमा अशा अनेक अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.                                               दहावीच्या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण शिक्षण हे ऑनलाइन च्या माध्यमातून झाले आहे. काही काळ पारंपरिक पद्धतीने वर्ग सुरू झाले होते.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने ते बंद झ...

ब्रेकिंग न्यूज ! अखेर दहावीची परीक्षा रद्द

  मुंबई - राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी ची नियमावली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जाहीर करतील.  अशीही माहिती श्री टोपे यांनी दिली. बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.   या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. आज किंवा उद्यापासून कडक लॉकडाउन जाहीर होईल. मुख्यमंत्री लवकरच नियमावली जाहीर करतील.अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना

साथरोग नियंत्रण कायदा 1897 च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत खालील आदेश निर्गमित करण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रभर हे आदेश जाहीर केलेल्या तारखेपासून कोविडचे संकट आपत्ती म्हणून अधिसूचित केलेले आहे, तोपर्यंत लागू राहतील. अ - रेल्वेने महाराष्ट्रात येण्यासाठी प्रमाण कार्यप्रणाली कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन हे महाराष्ट्रात रेल्वेने येण्यासाठी किंवा महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करण्यासाठी आवश्यक घटक असेल. रेल्वेचे अधिकारी आणि स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरण यांची कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करण्याची संयुक्त जबाबदारी असेल. यामध्ये कोणत्याही अपवादाव्यतिरिक्त खालील बाबींचा समावेश आहे. ए.- प्रवासादरम्यान आणि रेल्वेस्थानकांवर सर्व प्रवाशांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. बी.-  रेल्वेत चढताना किंवा उतरताना सुरक्षित सामाजिक अंतर बाळगणे तसेच स्थानकावर कोणत्याही तपासणीच्या वेळीही ते अंतर राखणे सर्व प्रवाशांसाठी गरजेचे आहे. सी.-  सर्व स्थानका...

संभव फाऊंडेशन देतय रोज ४०० लोकांना दोन वेळच जेवण

  सोलापूर/ प्रतिनिधी- संभव फाऊंडेशन च्यावतीने शहरातील उपेक्षित हातावर पोट असणाऱ्या  झोपड्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या ४०० लोकांना जेवण वाटप करण्यात येत असून यात रस्त्यावर राहणाऱ्या बेवारस मनोरुग्ण,वयोवृध्द आजीआजोबा,बेघर लोक,भिक्षेकरी,स्थलांतरीत कामगार   यांना संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून  जेवणाची सोय करण्यात येत आहे शहरातील अनेक लोकांचा रोजगार बंद असून उदर्रनिर्वाह होत नाही आश्या लोकांना जेवण पुरवण्याचं कार्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.रोजच्या जेवणामध्ये दाळ खिचडी,व्हेज पुलाव,मसाला राईस,चपाती भाजी दिली जाते.    संभव फाऊंडेशनची टिम लोकांना मास्क,सॉनिटायझार सुरक्षित अंतर विषय मार्गदर्शक सुचना करत आहे.  संभव फाऊंडेशनचे स्वंयसेवक आस्मिता गायकवाड,आरती लांडे,रुपाली हुडेकरी,राणी सिरसट,वृषाली गायकवाड,शोभा शेंडगे,भाग्यश्री सोनवणे,रुपाली पाटिल,पवन व्हनकडे,प्रा.सचिन शिंदे,संतोष माने,चेतन लिगाडे,पंकज क्षीरसागर,आदीच योगदान या मध्ये आहे. समाजातील दानशुर लोकांची गरज असून येथील वंचित बेघर लोकांना पौष्टिक अन्न देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी...

रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करुन द्यावे - उच्च न्यायालयाकडे मागणी

  राज्य शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन औषध उत्पादक कंपनीचा साठा जप्त करुन रुग्णांना द्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत   बार्शी/प्रतिनिधी - जिवन जगण्याच्या अधिकाराचे रक्षण होणे कामी महाराष्ट्र शासनास राज्यातील रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन उप्लब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारे पत्र मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल यांना मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,आण्णा जोगदंड व मनीष देशपांडे यांच्या वतीने पाठविण्यात आले आहे.    सदर पत्रालाच जनहित याचिका समजून मा.उच्च न्यायालयाने पुढील मागणी संदर्भात योग्य ते न्यायाचे आदेश करावेत अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या कोरोना या रोगाने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या दैनंदिन वाढतच आहे.यावर उपचाराकरीता आवश्यक असलेले रेमडेसिवीर हे इंजेक्शन घेण्यासाठी वांवनु फिरावे लागत आहे तरी ते मिळत नाही. हे रेमडेसिवीर  इंजेक्शन न मिळाल्या कारणाने अनेकांचे जीव गेले आहेत.  सध्या हे इंजेक्शन आवश्यक असू...