Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

कासारवाडी रोड जवळील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून केला शेतरस्ता

बार्शी/प्रतिनिधी - स्वखर्चातून व लोकवर्गणी गोळा करून तसेच स्वतःच्या शेतातील पाच पाच फूट जमीन देऊन कासारवाडी रोड परिसरातील शेतकऱ्यांनी एक किलोमिटर लांबीचा रस्ता तयार केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कासारवाडी रोड भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधुन लातूर मुंबई रेल्वे लाईन गेल्याने पूर्वापार चालत आलेले रस्ते बंद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाणे- येणे अवघड झाले होते. त्यामुळे रस्त्यामुळे काही प्रमाणात कलह निर्माण झाले होते. कासारवाडी रोड भागात शेती व शेतकरी प्रभाकर बारबोले यांनी सर्व शेतकऱ्यांना वाटेचे महत्त्व पटवून दिले. होय नाही म्हणत अखेर सर्व शेतकऱ्यांनी खर्चातून लोकवर्गणीतून पैसे गोळा केले. स्वतःच्या शेतातील ५ - ५ फूट जमीन दिली. शेतकऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये लोकवर्गणी जमा करून सुमारे दोनशे टीपर दगड मुरूम टाकून १ किलोमीटर लांबीचा रस्ता शेतीकामासाठी स्वखर्चातून तयार केला. या कामासाठी या भागातील शेतकरी प्रभाकर बारबोले, हनुमंत ताटे , प्रसाद मनगिरे , बजरंग नरुटे , केदार कुरंडे , अनिल राउत, उल्हास माने, हनिफ मुल्ला आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेत सुमारे एक लाख 90 हजार ...

बार्शीत लसीकरणत वशिलेबाजीचा आरोप , पारदर्शकता आणण्यासाठी ठिय्या आंदोलन

  बार्शी/प्रतिनिधी - बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत आहे. लसीकरण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश नेवाळे यांनी बार्शी तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागील काही दिवसांपासून बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणाचा गैरव्यवहार, तसेच वशिला लावून लसीकरण होत असल्याचे निदर्शनास आल्याने दि ३१ मे पासून जोपर्यंत लसीकरणाचा पुरवठा सुरळीत होत नाही.अधिकारी पारदर्शकता बाळगत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती उमेश नेवाळे यांनी दिली.              आंदोलनाबाबत माहिती देताना ते असे म्हणाले की, आमच्या भागातील तसेच बार्शीतील वयस्कर लोकांच्या लसीकरणासाठी रांगा लागलेल्या पाहून आम्ही काही तरुणांना सोबत घेऊन लसीकरणासाठी रांगेत उभारलो असता लसीकरण केंद्रावर असे आढळून आले की शहरातील मान्यवर, लोकसेवक, नगरसेवक, व्यापारी व राजकीय लोकांशी संबंधित असलेले बडे हस्ती नागरिकांच्या...

भिवंडी तालुक्यातील कांबेमध्ये गेल्या ७-८ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई

  कांबे गावातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत  भिवंडी तालुक्यातील कांबे गावामध्ये गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरु आहे. यासंदर्भात शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन यांनी कांबे गावात होणारा पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात कपात केल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच ग्रामपंचायत कांबे च्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन असल्याने व त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप "पाणी हक्क संघर्ष समिती, कांबे" चे मुख्य निमंत्रक अजिंक्य गायकवाड यांनी केला आहे.         गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने २०१५ साली कांबे गावामध्ये एक करोड सात लाख रुपयांची निधी नवीन पाण्याची टाकी व गावात नवीन लाईन टाकण्यासाठी मंजूर करण्यात आली होती. हे काम अद्याप पर्यंत अपूर्णच असून नवीन टाकी व नवीन लाईन सुरु करण्यात आलेली नाही. तरीसुद्धा ग्रामपंचायत कांबे व पंचायत समिती चे पाणीपुरवठा अधिकारी यांनी सं...

हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन साजरा

   सुहेल सय्यद/सांगली - हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन कवठे एकंद मध्ये साजरा करण्यात आला. या ऑनलाईन वेबिनोर ला महाराष्ट्रातून 176 लोकांनी नोंदणी केली होती. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक क्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र समाजामध्ये याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावेत यासाठी जागतिक पातळीवर दरवर्षी 28 मे हा मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.      कार्यक्रमच्या प्रमुख वक्त्या डॉ. दीपशिखा दिवाकर स्त्री रोग तज्ञ  मध्यप्रदेश ह्या होत्या. यांनी मासिक पाळी म्हणजे काय, तसेच मासिक पाळी मध्ये घ्यायची काळजी, PCOD, मोनोपोज, गर्भाशयाच्या गाठी तसेच आहार कसा असावा या विषयवार मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, जो पर्यंत आपण या विषयावर उघडपणे बोलणार नाही चर्चा करणार नाही तो पर्यंत समाजातील अंधश्रद्धा व अज्ञानपना हा दूर होणार नाही यासाठी युवकांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे.       या कार्यक्रमासाठी राज्यभरातून महिलांनी उपस्थिती दर्शवली या मध्ये कवठे एकंद च्या उपसरपंच...

चंद्रपुरच्या दारुबंदीसाठी नशाबंदी चे कार्यकर्ते एकवटले

  जालना :- प्रतिनिधी  चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा नशाबंदीसाठी काम करणाऱ्या सामाजिक  कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे . तसेच दारूबंदी उठवण्याचा शासन निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे . या मागणीमध्ये सामाजिक कार्यकत्यांसह राज्याच्या नशाबंदी मंडळानेही उडी घेतली आहे . नशाबंदी मंडळाच्या चिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या की , काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने नेमलेल्या देवताळे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली होती . महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले आणि महिलांनी दिलेल्या दीर्घ संघर्षाची धार अधिक तीव्र झाली होती . मात्र महाविकास आघाडीच्या नव्या निर्णयामुळे दारूविरोधी लढणाऱ्या राज्यातील सर्व महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले आहे . पाच वर्षे हजारो महिलांनी केलेल्या प्रदीर्घ अशा आंदोलनाचा कार्यकर्त्यांचा सरकारने अपमान केला आहे . चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचे कारण तेथे अवैध दारू वाढली हे देण्यात आले आहे .असे कारण देणे हे सरकारने स्वतःच्याच अपयशाची कबुली देणे असल्याचे नशाबंदी कार्यकर्त्यांचे म...

चला पाळीवर बोलू थोडं..

                                              वर्षानुवर्षे विटाळाचा विषय  बनवला गेल्याने तिरस्कार वाट्याला आलेल्या मासिक पाळी या विषयावर आधुनिक म्हणावल्या जाणाऱ्या जगात आजही मनमोकळं बोलता येणं शरमेची गोष्ट आहे, चार चौघात मोठ्याने बोलण्याचा हा विषय नाही. अनेक स्त्रीयांना पण तेच वाटतं. त्यामुळं पिरियड आला असं न म्हणता प्रॉब्लेम आला अस म्हणणं कधी त्या शिकल्या कळलंच नाही. सृजनाची चाहूल घेऊन येणारा रक्ताचा लाल रंग विटाळ बनून गेला इथं. पाळीमुळे मानवी वंश पुढे जात असला तरी पाळी येणाऱ्या स्त्रीच्या स्पर्शाने माणसे बाटु लागली आणि तिच्या वाट्याला मग या दिवसांत बाहेर बसणं आलं. पाळी खरोखर स्त्रीची अडचण करून टाकली या समाजाने. मग विटाळाला सन्मान द्यायचा प्रश्नच निकालात निघाला. विटाळाच्या वाट्याला आदर नाही अस्पृश्यताच येते न मग. आजही तिचं बाहेर बसणं, तिच्यामुळे बाटणं आपल्याकडे सुरूच आहे. त्यातही या विषयावर बोलणं आपल्याकडे टॅबु असल्याने पाळीला शास्त्रीय दृष्टीने समजनू घेऊन त्यानुसार क...

म्यूकरमायकोसिसच्या बुरशीच्या वाढीचा वेग नेहमीपेक्षा दिडपट

  सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या संशोधनातून माहिती आली समोर  बार्शी/ प्रतिनिधी: - म्युकर मायकोसिसला कारणीभूत ठरलेली  बुरशी प्रक्रिया करून प्रयोग शाळेत वाढविण्यात येत असताना, सदर बुरशी  नेहमीपेक्षा  दिडपट वेगाने वाढत असल्याचे ,सूक्ष्मजीव शास्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांनी सांगितले. बुरशी प्रयोगशाळेत वाढविण्यासाठी ३ ते  ४ % साखरेचे प्रमाण,५ ते ५.५ असा   अँसिडीक पीएच(सामू) व २५ ते ३० डिग्री सेंटिग्रेड तपमान हे तीन घटक आवश्यक असतात.हे लक्षात घेऊन बुरशीच्या प्राथमिक वाढीसाठी "समृद्धी पोषक माध्यम"(इन रिचमेन्ट  न्युट्रीयंट मेडीयम)वापरले जाते व नंतर पोषक माध्यम वापरून पुढील प्रयोग केले जातात.        या पद्धतीने जेंव्हा आम्ही रुग्णातील क्लिनिकल सॅम्पल मधील बुरशी वाढविण्याचा प्रयोग केला  तेंव्हा अत्यंत कमी वेळात बुरशीची वाढ झालेली आढळून आली.नेहमी जेवढी बुरशी वाढायला साधारण ४५ ते ४८ तास लागतात, तेवढयाच प्रमाणात बुरशी वाढायला फक्त ३० ते ३२ तास लागल्याचे य...

तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने पाळला काळा दिवस

बार्शी /प्रतिनिधी -अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारने संमत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत ही मुख्य मागणी घेऊन निषेध व्यक्त करत काळा दिवस पाळून मा. तहसीलदार यांना निवेदन दिले. हे निवेदन 26 मे 2021 रोजी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले. यामध्ये तीन कृषी कायदे रद्द करा, कामगार विरोधी चार लेबरकोड मागे घ्या, रेशन, बेरोजगार भत्ता, व कोरोनाची लस तातडीने द्या या मागण्या देखील मा. पंतप्रधान यांना करण्यात आल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया समोर काळे फुगे हवेमध्ये सोडून निषेध नोंदवला. यावेळी कॉम्रेड प्रवीण मस्तूद, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड धनाजी पवार, कॉम्रेड भारत भोसले, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड पवन आहिरे हे उपस्थित होते.

आमच्यावर उपकार नको, आमचा रोजगार द्या!- कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

  सोलापुरात २५ हजार कामगारांनी काळे वस्त्र, काळ्या फिती, काळे झेंडे दाखवून केला केंद्र सरकारचा निषेध! सोलापूर दि.२६:- भारतीय जनता मोठ्या आशेने देशाचा विकास होईल या भ्रमात भाजप सरकारला एकहाती सत्ता दिली. यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन ‘सबका साथ सबका विकास’ हि घोषणा देऊन जनतेची निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रवित्रा घेतला आणि या घटनेला आजमितीस ७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ७ वर्षाच्या कालावधीत आपला देश कॉर्पोरेटस कंपन्या आणि बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा विक्रम मोदी सरकारने केलेला आहे. रेल्वे, विमान, जल वाहतूक, पोस्ट, एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, खनिज संपत्ती या  सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण, जीएसटी, नोटबंदी, शेतकरी व कामगार विरोधी कायदे पारित केले. राष्ट्रीय उत्पन्नात घट आणि महागाईत वाढ झाली. खाद्य तेलाचे भाव तिप्पट झालेले आहे. कृत्रिम साठेबाजीला अप्रत्यक्ष खतपाणी घातले जात आहे. भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. कारण कोरोनाचा धोका दिसत असताना सुद्धा या ठोस अमलबजावणी न करता कामात ढिलाई दाखविल्यामुळे आज देश याचे...

बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस हा बुरशीच्या दोन प्रजातींमुळे

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांचे संशोधन बार्शी / प्रतिनिधी :बार्शी तालुक्यात आढळून आलेल्या  म्युकर मायकोसिसने  बाधित रुग्णाचे  ऑपरेशन यशस्वीपणे बार्शी येथील लीला नर्सिंग होम चे इ एन टी सर्जन डॉ तरंग शहा यांनी केले.या रुग्णाचे क्लिनिकल सॅम्पल चे संशोधन बार्शी येथील सूक्ष्मजीव शास्त्राचे संशोधक डॉ सुहास कुलकर्णी व सौ अमृता शेटे मांडे यांनी केले असता, सदर म्यूकर मायकोसिस हे बुरशीच्या दोन प्रजातींच्या प्रादुर्भावामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णातील सायनसच्या क्लिनिकल सॅम्पल मधील बुरशीचे प्रक्रियेनंतर मायक्रोस्कोप खाली सूक्ष्म निरीक्षण केले असता त्या मध्ये दोन प्रकारच्या बुरशींच्या प्रजाती सापडल्याचे सौ अमृता शेटे मांडे यांनी सांगितले.      रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये आढळलेल्या दोन्हीं प्रजाती भिन्न प्रकारच्या  व एकत्रित आढळल्या आहेत.प्रजाती क्रं१ही ८०% तर प्रजाती क्रं २ ही २०%प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.हे निरीक्षण रुग्णाच्या आरो...

माझगाव डॉकसाठी प्रशिक्षण प्रशिक्षक पदाची भरती

                                                                                                                                                                                                                                                          ...

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगामध्ये विवीध पदांची भरती

  पदाचे नाव - जेष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक ) १  शिक्षण- एलेक्ट्रीकॅल इंगीनीर डिग्री , ७ वर्षाचा अनुभव  पदाचे नाव - नियामक अधिकारी (तांत्रिक ) ४  शिक्षण -डिग्री इन एलेक्ट्रीकॅल , ३ वर्षाचा अनुभव  पदाचे नाव - अप्लिकेशन डेवेलोपर -१  शिक्षण - कॉम्पुटर इंगीनीर / इन्फरमेशन तेक्नोलोजी , ३ वर्षाचा अनुभव  पदाचे नाव - हार्डवेयर इंजिनियर -१ शिक्षण - डिप्लोमा कॉम्पुटर सायन्स /इन्फरमेशन तेक्नोलोजी , ३ वर्षाचा अनुभव  वय - ४० वर्षे अधिक माहितीसाठी या सोबत जोडलेली जाहिरात पहावी  https://bit.ly/3oOXduC

ट्रान्सजेंडर व्यक्तीला सरकारतर्फे 1500 रुपयांची मदत जाहीर

  ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी 8882133897 हेल्पलाइन क्रमांक सुरू   देश कोविड 19 विरोधात लढा देत असताना उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ट्रान्सजेंडर समुदायाच्या लोकांवर या महामारीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. देशातील सध्याची परिस्थिती या उपेक्षित समाजाला अन्न आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांच्या भीषण कमतरतेला आणि बिकट परिस्थितीला तोंड द्यायला भाग पाडत आहे.   ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निर्वाह भत्ता सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्यांनी सरकारची मदत आणि पाठिंबा मिळविण्याकरिता व्यथा कथन करणारे दूरध्वनी आणि ईमेल केले आहेत. ट्रान्सजेंडर्सच्या कल्याणासाठी नोडल मंत्रालय असलेल्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने प्रत्येक ट्रान्सजेंडरला त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरित आधार म्हणून 1500 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत ट्रान्सजेंडर समुदायाला त्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यास मदत करेल. ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था आणि समुदाय आध...

सोयाबीन बियाणे खरेदी व लागवड करताना काळजी घेण्याचे शिवार हेल्पलाइन कडून आवाहन

   पुढील नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय उस्मानाबाद :- लवकरच खरीप २०२१ चा हंगाम जवळ येत आहे. शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बियाणे उगवण क्षमतेबद्दल गोंधळ उडाला होता. या वर्षी प्रशासनाने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना काही उपाय पण सुचवले आहेत.        शेतकऱ्यांनी संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून सोयाबीन बियाणे खरेदी केल्यानंतर सात दिवसाच्या आत सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करावी.  उगवण शक्ती मध्ये ७० टक्के पेक्षा कमी बियाणे उगवून आले तर तात्काळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना संपर्क करावा. याविषयी कृषी निविष्ठा विक्रेत्यांमार्फत सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे. जर ०७ दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासणी केली नाही आणि तसेच बियाणे पेरले व त्यामुळे जर काही अडचण आली तर याबाबत शेतकऱ्यांना बियाणे उगवणूक संदर्भात कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही अशा आशयात विक्रेते शेतकऱ्यांकडून लेखी स्वरुपात लिहून घेत आहेत.       बियाणे हे लागवड करण्याच्या ०८ ते १० दिवसापूर्वी खरेदी करावे. सोयाबीन हे...

पालकांनो सजग रहा, लसीकरण करून घ्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा सल्ला

  सोलापूर,दि.22 : सध्या कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याची दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. मोठ्या माणसांसोबतच लहान मुलांना कोरोना संसर्ग होत आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीच्या केसेस कमी आहेत. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे, यामुळे पालकांनी ‘माझी मुले..माझी जबाबदारी’ ओळखून अधिक सजग राहून लसीकरण करून घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद....             कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केवळ एक टक्का तर दुसऱ्या टप्प्यात 10 टक्के मुलांना बाधा झाल्याचे दिसून येत आहे. वयस्करांमध्ये कोरोनामुळे आजार बळावत असून काही लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. वयस्क आणि लहान मुलांना कोरोनाची लक्षणे सारखीच असतात.             कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि गॅस्ट्रोची लक्षणे दिसून येत आहेत. मुलांना ...

चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

डेहराडून -पद्मविभूषण ने सन्मानित प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि चिपको आंदोलनाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी कोरोना  संक्रमण तसेच वयोवृद्ध आणि विविध रोगांनी ग्रस्त असल्या  कारणाने उत्तराखंड येथील  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान या ठिकाणी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. श्री बहुगुणा यांना 8  मे रोजी कोरोना संक्रमित झाल्यानंतर एम्स ऋषिकेश या ठिकाणी आणण्यात आले होते. आज दुपारी बारा त्यांनी वाजता अंतिम श्वास घेतला. गुरुवारी एम्सचे जनसंपर्क अधिकारी हरीश थपलीयल  यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. याच दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि दुपारी त्यांचे निधन झाले. राज्यपाल बेबी  रानी मौर्य , मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत , विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह महेश जोशी , पूर्व राज्यमंत्री धिरेंद्रा प्रताप आदींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

गडचिरोलीत पोलीस - नक्षलवाद्यां चकमकीदरम्यान पोलिसांकडून मोठी कारवाई

                                                                                                                                                                              वृतसंस्था - गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारवाली  झालेल्या चकमकीमध्ये १३ नक्षलवादी मारले गेले आहेत. गडचिरोली पोलीस महाउपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की चकमक सकाळी पाच वाजता झाली.  चकमकीच्या वेळी नक्षली एटापल्ली कोटमी गावाच्या जंगलामध्ये बैठक घेण्यासाठी एकत्रित आले होते. त्यांनी सांगितलं  की गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र पोलीस च्या c-60 बटाल...

कोरोना रुग्णांच्या मदती सरसावला सलमान , ही केली घोषणा..

  गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं सलमान खान  मुबई/वृत्तसंस्था - बॉलीवूड दबंग स्टार सलमान खान गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं आहे. कोरोना महामारी ने देशात हाहाकार माजवला आहे. अशा कठीण काळात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच सलमान खान कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सलामन ने 500 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स ऑर्डर दिली आहे. दिसेन सिद्दिकी द्वारा इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या एका फोटोला सलमान री-पोस्ट करत ही माहिती दिली आहे. फोटोमध्ये खूप सारे ऑक्सिजन कंसंट्रेटर्स दिसत आहेत त्यामध्ये दोन व्यक्ती आपसात बोलताना दिसत आहेत. 500 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स मुंबई ला पोहोचले आहेत. सलमानने फोटो शेअर करत लिहिले आहे की हे ऑक्सिजन कंसंट्रेटर्स फ्री मध्ये दिले जाणार असून वापरानंतर माघारी द्यावेत. त्यासोबतच सलमानने हेल्पलाइन नंबर शेअर केला आहे

मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सुदर्शन न्युज वर कारवाई करण्याची मागणी

उस्मानाबाद - मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बदल तसेच समाजामध्ये तेढ निर्माण केले  म्हणून सुदर्शन टीव्ही व त्याच्या संपादकवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी मौलाना जाफरअली खान पठाण यांनी केली. सविस्तर वृत पुढीलप्रमाणे सुदर्शन न्युज चॅनेल मध्ये दिनांक 13/5/2021 रोजी बिनधास्त बोल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक व सुदर्शन न्युज चॅनेल चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी बिंदास बोल या कार्यक्रमांमधून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची मदिना शहर सौदी अरेबिया येथे स्थित असलेली मस्जीद व मझार  मुस्लीम धर्मीयांचे दुसरे सर्वात मोठे धार्मिक पवित्र स्थान आहे.ते मिसाईल रॉकेटच्या सहाय्याने नष्ट केले जात असल्याचे ॲनिमेतेड दृश्य दाखवून आम्हा मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला . म्हणून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी  मागणी मौलाना जफरअली खान मोहम्मदअली खान पठाण यांनी पोलीस निरीक्षक , शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे.

सोलापूर ग्रामीणमध्ये कृषीविषयक दुकानांना दुपारपर्यंत सवलत

  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश सोलापूर, दि .20 :   कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने जीवनाश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे, मात्र शेतकऱ्यांचा खरीप हंगाम महत्वाचा असल्याने पोलीस आयुक्तालय हद्द वगळून ग्रामीण भागातील कृषीविषयक दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कोरोनाचे नियम पाळून सुरू राहतील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.             शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आणि राज्य शासनाच्या कृषी आयुक्तांच्या पत्रानुसार कृषी दुकानांच्या वेळेत शिथिलता आणली आहे. यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद हद्दीत कृषीविषयक बियाणे, खते, किटकनाशके, शेतीशी निगडीत असलेली कृषी सेवा केंद्र सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात चालू राहतील. कृषीविषयक दुकाने चालू ठेवताना पाळावयाचे नियम              कृषीसेवा केंद्र चालक, काम करणारे कामगार, शेतकरी यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. केंद्राच...

बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये विविध पदांसाठी भरती

प्रयोग शाळा तंत्रज्ञ कंत्राटी भरती एकूण पदे - ८९  पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ  शिक्षण - बी एस सी  आणि  डी एम एल टी  वय - वय वर्ष 18 ते ६५ वर्षे  मानधन - 18000  औषध निर्माता कंत्राटी भरती एकूण पदे - ९६  पदाचे नाव - औषध निर्माता  शिक्षण - डी फार्म  व बी फार्म  अर्ज करण्याचे ठिकाण -                       कार्यकारी आरोग्य अधिकारी                                           सार्वजनिक आरोग्य खाते , एफ / दक्षिण विभाग कार्यालय                             तिसरा मजला , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळ ,मुंबई -400 012  अधिक माहिती साठी या सोबत जोडलेली जाहिरात पहावी - प्रयोगशाळा तंत्रज्ञ  - https://bit.ly/3fyPbBH औषध निर्माता- https://bit.ly/340jVGI

मुंबई उच्च न्यायालय मध्ये मनुष्य बळाची कंत्राटी पद्धतीने भरती

  मुंबई उच्च न्यायालय मध्ये मनुष्य बळाची कंत्राटी पद्धतीने भरती एकूण पदे - ४०  सिनियर सिस्टीम ऑफिसर - १७  सिस्टीम ऑफिसर - २३  ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख -13 मे 2021  ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख- 27 मे 2021  अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी . -  येथे क्लिक करा   www.bombayhighcourt.nic.in या वेब साईट वर अप्लाय करावा

तौते चक्रीवादळ - भारतीय नौदलाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरूच

मुंबई, 19 मे -भारतीय नौदलाकडून मुंबई आणि गुजरात किनाऱ्यांजवळ सुरु असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेचा आज तिसरा दिवस. भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने सध्या P-305 या नौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोध आणि बचावासाठी कार्यरत आहेत. ही नौका 17 मे रोजी मुंबईपासून 35 मैलांवर बुडाली होती. या शोध आणि बचाव मोहिमेत आयएनएस कोची, कोलकाता, बियास, बेतवा, तेग या जहाजांसह P8I हे सागरी गस्ती विमान, चेतक, एएलएच आणि सीकिंग ही हेलिकॉप्टर्स कार्यरत आहेत. बचावलेल्या 125 जणांना सोडण्यासाठी आणि चार कर्मचाऱ्यांचे मृतदेह पोहोचविण्यासाठी 19 मे रोजी बंदरात दाखल झालेले आयएनएस कोची हे जहाज लगेचच संध्याकाळी पुन्हा शोधमोहिमेसाठी समुद्रात नेण्यात आले. आयएनएस कोलकाता हे जहाज 19 मे च्या रात्री मुंबई बंदरात पोहोचणार असून P-305 नौकेवरील तसेच 'वरप्रदा' या कर्षक नौकेवरील बचावलेल्या व्यक्तींना ते बंदरावर सोडणार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान हाती लागलेले 18 कर्मचाऱ्यांचे मृतदेहही यावेळी बंदरात पोहोचवले जाणार आहेत. गुजरात किनाऱ्याजवळील सागरी भागातील मोहीम संपवून आयएनएस तलवार हे जहाजही आता, मुंबईजवळ P-305 नौकेवरील बेपत्ता कर्मच...

विवेकानंद युवा मंडळाच्या 'ऑनलाईन मोटिव सेशन' द्वारे रुग्णांना मनोधैर्य

  उस्मानाबाद - सध्या कोरोना आजारमुळे अनेक लोक त्यांचे मनोधैर्य खचून बसले आहेत. त्यात रुग्ण व त्यांचे नातेवाईक देखील खूप नैराश्यात असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवून, रुग्णांना ताकदीनिशी या आजाराशी लढा देण्याचा संदेश देत विविध विषयांवर जनजागृती करत विवेकानंद युवा मंडळाद्वारे 'ऑनलाइन मोटिव सेशन' या उपक्रमाद्वारे खूप महत्त्वाचे कार्य बजावणे सुरू आहे. सलग १५ दिवस चालणाऱ्या या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ञ मंडळी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी हे देखील या 'ऑनलाइन मोटिव सेशन' उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये विवेकानंद युवा मंडळाचे कार्यकर्ते विविध विषयांवर सेमिनार देत आहेत. युवकांनी चालविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व शासकीय कार्यालयामार्फत कौतुक होत आहे, या ऑनलाईन मोटिव सेशन कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांचे मार्गदर्शन मिळाले. यासाठी विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, महेंद्रप्रताप जाधव, स्वप्नील देशमुख, सुमित जानराव, क्रांतिसिंह काकडे व आदी युवा कार्यकर्त्या...

मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करण्यात यावा

  बार्शी/ प्रतिनिधी- महाविकास आघाडी सरकारने 7 मे रोजी मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा यासाठी सिविल राइट्स प्रोटेक्शन सेलच्या वतीने बार्शी चे तहसीलदार सुनील शेरखाने यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे निर्णय घेतले जातात ही गोष्ट लाजिरवाणी असून मागासवर्गीयांच्या विरोधात व राज्यघटनेच्या विरोधात आहे. सन २०१७ सालापासून थांबविण्यात आलेली मागासवर्गीयांची पदोन्नती तात्काळ सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा.राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांची पदोन्नती भरली जाणारी 70 हजार पदे भरली जाणार आहेत त्याचा फायदा अन्य प्रवर्गातील उमेदवारांना आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा. या मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यामार्फत पाठवण्यात आले. यावेळी सिविल्स राइट्स प्रोटेक्शन सेलचे महाराष्ट्र राज्य सचिव सत्यजित जानराव , सोलापूर जिल्हाध्यक्ष अंगद गा...

पबजी गेमचे रजिस्ट्रेशन सुरू, प्री रजिस्ट्रेशन केल्यास मिळणार रिवॉर्ड

गेल्या वर्षी केंद्र सरकारने डेटा सुरक्षेच्या मुद्यावरून काही चिनी ॲप्लिकेशन्स बंद केले होते. यामध्ये पबजी मोबाईल गेम चा देखील समावेश होता. तरुणाईकडून विशेष पसंती दिली जाणारा हा गेम आता पुन्हा येणार आहे. जून महिन्यात हा गेम लॉन्च होण्याची शक्यता आहे. 18 मे पासून गुगल प्ले स्टोअरवर बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया असं नाव बदलून पुनरागमन झालेल्या गेमचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. या गेमचे फ्री रजिस्ट्रेशन केल्यास रिवॉर्ड मिळणार असून हे रिवॉर्ड केवळ भारतीयांसाठी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ज्या युजर्सचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना आपल्या पालकांचा मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य असेल.

विनाकारण फिरणाऱ्याला 500 रूपये दंड वापरलेले वाहन पोलीस घेणार ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

    सोलापूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रेक द चैनअंतर्गत संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. तरीही ग्रामीण भागातील नागरिक विनाकारण फिरत आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आपत्ती व्यवस्थापन बंदोबस्त/नाकाबंदी लावण्यात आली आहे. होमक्वारंटाईन कोरोनाबाधित रूग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कोविड टेस्टिंग रूग्णालये, प्रयोगशाळा, हॉटस्पॉट गावे, हाय अलर्ट गावे याठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. या आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून जिल्ह्यात कोणताही नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय फिरत असल्याचे आढळून आल्यास 500 रूपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाला दिले आहेत. शिवाय अत्यावश्यक...

कथा एका नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या डॉक्टरची..

  नि:स्वार्थ सेवा : कोरोना योद्धा डॉ.आरती धुमाळ नवी मुंबई… लोकअर्थाने नियोजनबद्ध शहर. वैद्यकीय सुविधांची प्रचंड रेलचेल. तरीही कोरोना आजाराचा अवाढव्य खर्च कसा पेलवणार या विवंचनेतच सामान्य माणूस हतबल होतो. अशाच अत्यंत कठीण काळात साथ मिळाली ती डॉ.आरती गणेश धुमाळ ह्या समाजव्रती डॉक्टरांची. आणि सुरु झाली कोरोना युद्धात सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी. डॉ.धुमाळ या नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी बेलापूर इथल्या हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात मानद वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात घाबरलेल्या रुग्णांशी त्या स्वतः भरपूर गप्पा मारायच्या. सुसंवादातून त्यांची भीती घालवून आणि मग त्यांना योग्य ते औषधोपचार करायच्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या केस पेपरवर आवर्जून त्या स्वतःचा फोन नंबर लिहून ‘काहीही शंका असेल तर मला कधीही फोन करा’ असे आवर्जून सांगत. कोरोनाचा रुग्ण म्हटलं की, सगळेजण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र डॉ.धुमाळांनी कधीही रुग्णांपासून लांब पळण्याचा प्रयत्न केला नाही. त्या रुग्णाला घरी गेल्यावरही फोन करून त्याच्या तब्येतीची विचार...

युनुसची मुलगी ॲनी म्हणाली, अब्बू जब देखो तब कंप्युटरपे लगे रहते है

  अमरावती  : अब्बू जब देखो तब कंप्युटरपे लगे रहते है… कोरोना साथीच्या काळात गत वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या युनुस शहा यांची ॲनी अस्मिर ही चार वर्षांची चिमुकली सांगत होती. कोरोना साथीच्या काळात आयसीएमआर व आरोग्य यंत्रणेसाठी डेटा संकलनाची व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्‍या युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी झाली. श्री.शहा हे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत आहेत. कोविडबाधितांवरील उपचारांना गती देण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेचे काम विविध पातळ्यांवर सुरु असते. सीएस ऑफिसमधील सहकाऱ्‍यांना कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल वेळोवेळी मिळवणे, याद्या तयार करणे, त्यासाठी लॅब, रुग्णालये व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय राखणे, आयसीएमआर पोर्टलसाठी डेटा संकलन करणे, त्यात वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन तशा नोंदी घेणे अशी अनेकविध कामे अव्याहतपणे करावी लागतात. दवाखान्यात नवे रूग्ण येणे, नव्या चाचण्या, नवे निष्कर्ष प्राप्त होणे, नव्याने काही दुरुस्त्या कराव्या लागणे हे सातत्याने सुरुच असते. या सगळ्या नोंदी त्या-त्या वेळीच घ्याव्या लागतात. त्यामुळे ...