राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, UNICEF व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन उद्घाटन झाले.
करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी अशा एकूण१० हजार व्यक्तींची ऑनलाईन उपस्थिती होती. राज्यातील ९ वी ते १२ वीच्या ६६ लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होणार आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१ हजार व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची https://mahacareerportal.com या पोर्टलवर माहिती उपलब्ध आहे.तसेच अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदींचीही पोर्टलवर माहिती मिळणार आहे.

Comments
Post a Comment