Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान होणार पक्षी सप्ताह: निबंध, चित्रकला, पक्षी निरीक्षण, छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

  सोलापूर,दि.30: पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर,पक्षी संरक्षण आणि संवर्धन कायदा अशा पक्ष्याबांबत बहुविध माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 5 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.  जागतिक कीर्तीचे पक्षी तज्ञ डॉ. सलिम अली आणि साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी  मारुती चित्तमपल्ली यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधून पक्षी सप्ताह आयोजित करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.त्याबाबतचा शासन निर्णयही नुकताच जारी करण्यात आला आहे. यानुसार सोलापुरात पक्षी संवर्धन कार्यशाळा, चित्रकला निबंध स्पर्धा, पक्षी निरीक्षक कार्यक्रम, पक्षी अधिवास स्वच्छता असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, असे श्री.धैर्यशील पाटील यांनी सांगितले.  पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाच्या दृष्टीने जलसंपदा,कृषि, पोलीस या विभागांची मदत घेण्यात यावी, असे ही शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.  पक्षी सप्ताहान...

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, मदतीचे प्रस्ताव शासनाला सादर

  सोलापूर,दि.30: जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 935 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, असेही त्यांनी आज सांगितले.   पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी  आज बैठक घेतली. जिल्हाधिकारी बहुउद्देशिय सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.  श्री.भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शेती, रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभागाकडील नुकसान यांची एकत्रित माहिती घेतली असता हे नुकसान सुमारे 935 कोटी 28 लाख रुपयांचे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सर्वांकश अहवाल शासनास पाठविण्यात आला असून जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील ...

मुंबई महापालिका बँक मध्ये भरती

 मुंबई महापालिका बँक मध्ये भरती डेप्युटी जनरल मॅनेजर - १ जनरल ,वय -४५ वर्षे असिस्टंट जनरल मॅनेजर - १ जनरल, वय - ५० वर्षे ब्रँच मॅनेजर - १ व्ही जे , १ ओ बी सी, वय - ५० वर्षे मॅनेजर आय टी - १ जनरल, वय - ३५ वर्षे असिस्टंट मॅनेजर आय टी -१ जनरल , १ एस सी , वय - ३० वर्षे एक्झेकेटीव्ह असिस्टंट - १ एस सी,  वय - ३० वर्षे पात्रता व अनुभवासाठी जाहिरात पाहावी.- येथे क्लिक करा.

हवालदार एकनाथ पार्टे यांचा मुंबई पोलीस आयुक्तांकडून सत्कार

महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर केला त्याचे वाईट वाटले. मी स्वत: कायदा रक्षक आहे. माझा पूर्णपणे कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे महिलेने केलेल्या गुन्ह्याचे तिला जरूर शासन मिळेल. यापुढेही आपले कर्तव्य चोखपणे करत राहणार, असा निर्धार हवलादर एकनाथ पार्टे यांनी केला. प्रतींनिधी/अमीर आत्तार - कोरोना संकटाचा काळ गेल्या ६-७ महिन्यांपूर्वी आला. संकट कोणतेही असो पोलीस कायम सयंमाने कर्तव्य बजावत असता याचा प्रत्यय हवालदार एकनाथ पार्टे यांच्या रूपात पाहावयास मिळाला. कर्तव्य असताना पार्टे यांच्यावर एका महिलेने हल्ला केला. मात्र त्यांनी आपला सयंम सोडला नाही , मुंबई पोलीस खाते शिस्तीला प्राध्यान देते, हे दाखवून दिली. या सयंमाचे कौतुक करत कुलाबा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त लता धोंडे यांनी  भररस्त्यात हवालदार एकनाथ पार्टे यांचा सत्कार केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही सत्कार केला.  २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १५ १५ सुमारास काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार एकनाथ पार्टे हे कॉटन एक्सचेंज चौक, सुरती हंटिलसमोर, काळबादेवी या पॉर्...

नाशिक महानगरपालिकेतील घंटागाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत महादेव खुडे यांचे आमरण उपोषण!

प्रतींनिधी /स्वप्नील भोईर - नाशिक पालिकेतील घंटागाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नाशिक पालिकेला सातत्याने निवेदन दिले ,परंतु  पालिकेने याबाबत कधीही याची  गंभीर दखल घेतली नाही.कामगारांना पूर्ण दिवस काम करुन किमान वेतन न देणे,हजेरी कार्ड,वेतनचिठ्ठी तसेच अत्यावश्यक सुविधा न पुरविणे....इ.प्रश्नांबाबत कामगारांना सातत्याने संघर्ष करावा लागत आहे.सिडको व पश्चिम भागातील सन.२०१६- १७ या कालावधीतील थकबाकी जवळपास १ कोटी रुपये आहे.२१ दिवसांच्या भरपगारी रजेचे पैसे २०११ पासून दिले नाहीत .पंचवटी भागातील २०१३ चे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नाही.कामगारांना १० तारखेच्या आत  वेतन द्यावे असे  कायद्याने बंधनकारक असताना ते कधीच देण्यात येत नाही.  कामगारांना हजेरीकार्ड व वेतनचिठ्ठी मिळत नाही त्यामुळे पूर्ण दिवस भरुनही पूर्ण वेतन मिळत नाही.महापालिका यासंदर्भात कोणतीही कायमस्वरुपी व्यवस्था न करता हात झटकत राहते. पंचवटी व सिडको भागात यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कामगार थांबले असताना महापालिकेने तथाकथित ठेकेदाराच्या दबावाखाली कामगारांवर खोट्या केसेस टाकायला लावल्या.    ...

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये पोस्टमन/मेलगार्ड/मल्टी टास्कींग स्टाफची भर्ती

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये पोस्टमन/मेलगार्ड/मल्टी टास्कींग स्टाफची भर्ती एकुण पदे-५९० पात्रता -  पोस्टमन/मेलगार्ड- १२ वी पास, वय-१८-२७ वर्षे मल्टी टास्कींग स्टाफ- १० वी पास, वय- १८-२५ वर्षे उच्च वयोमर्यादा- एससी/एसटी-५वर्षे, ओबीसी-३ वर्षे, दिव्यांगासाठी -१० वर्षे,  दिव्यांग - एससी/एसटी -१५ वर्षे, ओबीसी- १३ वर्षे अधिक व सविस्तर माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा. - https://s3.ap-south-1.amazonaws.com/rojgar.mahaswayam.in/user_uploads/admin/news/5f7dc0cf1f59b.pdf

निसर्गाच्या संकटातून शेतकरी कसा तरी सावरत च आहे, परंतु माणसाच्या नीच प्रवृत्तीतून माणूस कधी उभरेल काय माहिती ?

उस्मानाबाद /युसूफ सय्यद - उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील शेतकरी श्री शिवाजी धोंडिबा पाटील यांच्या शेतातील सोयाबीन काढणी नंतर बांधला ढीग घालून ठेवलेला होता, काल रात्री अज्ञात दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने त्या झाकून ठेवलेल्या 2 एकर फडातील सोयाबीन ला आग लावली, शेतकऱ्याने दुबार पेरणी करून कष्टाने आणलेले पीक स्वतःच्या डोळ्या पुढे राख झालेले पाहिले,ही घटना कोणी आणि का केली याची माहिती अद्याप भेटलेली नाही.आधीच अतिवृष्टी मुळे नुकसान झालेले असताना , शेतकर्‍यांनी अजून किती नुकसान सहन करावे , हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. 

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

मेष : नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. वृषभ : पैशाचा वापर विचारपूर्वक करावा. मोठा निर्णय घेताना एकवार पुन्हा विचार करावा. मित्रांच्या भेटीचे योग.   मिथुन : आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. तुमच्या कृतीला विरोध होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. कर्क : अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात. ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल. सिंह : आजचा दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.  कन्या : नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. आहारावर नियंत्रण हवे.  तूळ : ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.  वृश्चिक : आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील. मुलांची चिंता सतावेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.  धनु : कलेत प्राविण्य मिळवाल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मि...

उंदरगाव मध्ये पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन

माढा/राजकुमार माने -  रयत क्रांती संघटना व नवहिंदवी स्वराज्य कला क्रिडा व सांस्कृतिक बहु. संस्था, उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उंदरगाव गावामध्ये आज सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत पशुचिकित्सालय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लाळ्या , खरखुत, लसीकरण, तसेच गर्भधारणा तपासणी, वांजपणा तपासणी, तसेच विविध आजार यांची  तपासणी करण्यात आली. 100 जणावराना लसीकरण करण्यात आले. 25 जनावरांची गर्भधारणा तपासणी करण्यात आली. ह्या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून जगप्रसिध्द चित्रकार रत्नदीप बारबोले आणि उंदरगाव चे युवा नेते अभयसिंह मस्के लाभले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उंदरगाव चे उपसरपंच ऋषिकेश तांबिले, व युवा नेते रवी चव्हाण उपस्थित होते.शेतकऱ्यांसाठी हे लसीकरण आणि गर्भधारणा तपासणी शिबीर मोफत आयोजन करण्यात आले होते. रयत क्रांती संघटना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या पुढे ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत राहील .त्याप्रसंगी दीपक आरे,  रविकांत कोळेकर, उत्तम साळुंके, शंकर साळुंके, अस्लम शेख, वामन तांबिले, मारुती सरवदे, बाबासाहेब वाघमोडे, सुनील नाईकवाडे, ...

शेतकरी संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्येकारी अध्यक्ष पदि श्री नानासाहेब बच्छाव यांची निवड

[ संघर्षमय नेतृत्व, अनेक सामाजिक संस्थेमाध्यमातुन समाजसेवा ते शेतकरी संघर्ष संघटनेच्या सर्वोच्च जबाबदारीचा हा संघर्षमय नानासाहेब बच्छाव यांचा जीवनप्रवास...] शेतकरी चळवळीतील झुंजारवादि परिवर्तनाचे संघर्षमय वादळ म्हणजेच श्री नानासाहेब बच्छाव जनतेसाठी जगाव दुसऱ्यांसाठी झिजाव, अन्यायाविरुद्ध लढाव हेच नानासाहेबांकडून शिकाव.असे निर्भिडपणे शेतकरी लढ्यात योगदान देणारे श्री नानासाहेब बच्छाव यांची शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष मा. श्री हंसराज वडघुले पाटिल यांनी शेतकरी संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्येकारी अध्यक्ष पदि निवड केली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपञ ही देण्यात आले आहे. शेतकरी संघर्ष संघटनेची सर्वोच्च मोठी जबाबदारी श्री नानासाहेब बच्छाव यांचेकडे दिलेली आसुन सर्व संघटनात्मक बांधनीसह सर्व नियोजनाचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. कृतिशिल शेतकरी चळवळीतील झुंजारवादी उल्लेखनीय नेतृत्व.... शेतकरी कुटुंबातील नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे गावचे भुमिपुञ श्री नानासाहेब बच्छाव शेतकऱ्यांचे हक्कासाठी चा लढा सुरवातीपासुन लढत आहेत. मनात नेहमी गोरगरीबांचे कल्याणाची आस, अन्य...

भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसर्‍या मेळाव्यात ऑनलाइन सहभागी व्हा - श्री मा सुनील कायदे यांचे आवाहन

प्रतिंनिधी/बालाजी सोसे - भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा ऑनलाईन होणार असून या मेळाव्यात ऑनलाईन सहभागी व्हावे असे आव्हान. कायंदे यांच्या वतीने करण्यात आले. भाजप राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजाताई मुंडे मेळाव्याला संबोधित करणार आहे. भक्ती गडावरील दसरा मेळावा म्हणजे राज्यातील नव्हे तर देशातील अठरापगड जाती प्रेरणा स्थळ आहे. दिवंगत स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली होणारा दसरा मेळावा त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या व माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती भगवान गडावर या ठिकाणी होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑनलाइन दसरा मेळावा होणार आहे त्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार आहे .‌‌राष्ट्रसंत भगवान बाबा च्या प्रतिमेची मिरवणूक आपल्या गावात काढावी आपल्या गावातील कार्यक्रमस्थळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घ्यावे .दुपारी 12 वाजता मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडे मौजे सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जन्मस्थानी दर्शन  घेणार आहे त्यानंतर 12 वाजून 30 मि...

वंचित च्या नेत्या सौ सविताताई मुंडे शेतकर्‍यांच्या बांधावर

  वंचित बहुजन महिला प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सौ सविताताई शिवाजी मुंडे यांनी हिवरखेड पूर्णा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन साधना संवाद सिंदखेड राजा/बालाजी सोसे -सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत पाऊस वाऱ्यामुळे झालेल्या शेतीचं नुकसान पाहणी करण्यासाठी काल आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सौ सविताताई शिवाजी मुंडे यांनी हिवरखेड पूर्णा याठिकाणी  शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन भेट घेतली .आणि पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद  साधला  ताई यांनी शेतकऱ्याला त्वरित मदत द्यावी .अशी मागणी व विनंती केली .आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या मतदार संघाकडे थोडे लक्ष द्यावे अशी त्यांनी त्याठिकाणी विनंती केली. त्यावेळेस उपस्थित शेतकरी वसंत वाघमारे आणि बाबासाहेब कुठे जय भगवान महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि इतर शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते.

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

  मेष : मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवस जाईल  वृषभ : घरातील कामांमध्ये व्यस्त  व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल. मिथुन : बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा. कर्क : आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका. सिंह : प्रेमींना  व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो. कन्या : स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.  तूळ : उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.  वृश्चिक : आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा. धनु : धार्मिक गोष्टीत दिवस घालवल . वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल...

कोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त

बार्शी- बेलदार समाज बांधवांच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने  20 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 51 बाटल्या रक्त जमा झाले. कोरोनाशी युद्ध करण्याचा मानस ठेवून रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.  रक्तदानाच्या उद्घघाटनासाठी कामगार नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम बेलदार समाजाचे अध्यक्ष प्रेम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.   यावेळी मंचावर संतोष मोहिते, परमेश्वर पवार, शिवराम जाधव, अनिरुद्ध नखाते, प्रवीण मस्तुद उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम मोहिते, बालाजी मोहिते, सागर पवार, अजय मोहिते, सचिन पवार, सोमनाथ मोहिते, चंद्रकांत जाधव, नवनाथ मोहिते, संभाजी मोहिते, कृष्णा मोहिते, मोहन मोहिते, महेश जाधव, नारायण पवार, संदीप पवार, शशिकांत पवार, सागर शिरसागर, अजय हाके, श्रीकांत जाधव, राहुल मोहिते, स्वप्नील पवार, बंडू साळुंखे आदींनी कष्ट घेतले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचे वाटप

सोलापूर/जयकुमार सोनकांबळे :- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आषिशकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव,अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथे भिंत पडून मयत झालेले मंगेश गोपाळ अभंगराव यांच्या पत्नी अश्विनी मंगेश अभंगराव, गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी लता कोळी, राधा गोपाळ अभंगराव यांच्या मुलगी रतन शिरसाट, संग्राम जगताप (रा. भंडीशेगाव) यांच्या आई शोभा जगताप, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील सखाराम गायकवाड यांच्या पत्नी धनाबाई गायकवाड, माढा तालुक्यातील शिवाजी यादव यांच्या पत्नी वर्षा यादव, उद्धव खरात यांच्या पत्नी सोजरबाई खरात, कलावती विठ्ठल करळे यांचा मुलगा लाला करळे, शंकर ...

शासन खंबीरपणे उभे राहील - मुख्यमंञी ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्तांना दिलासा

  प्रतिनिधी अक्कलकोट - जयकुमार सोनकांबळे- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द,बोरी उमरगा, रामपूर, शिरशी येथे वादळी पावसामुळे व नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी करण्यासाठी आज सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी केले.नुकसानग्रस्त शेतकरी, पडझड झालेल्या नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील.कोणालाही वार्यावर सोडणार नाही.तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत.तुम्ही सुरक्षित राहा.तुमची काळजी शासन घेईल अशा शब्दात मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्तांना दिलासा दिलाय.नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधुन समस्या जाणून घेतल्या.         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी सांगवी खुर्द येथील घर वाहुन गेलेल्या अकरा शेतकऱ्यांना प्रत्येकी ९५ हजार शंभर रूपये असे दहा लाख ४६ हजार शंभर रूपये मदतनिधी धनादेश  दिले.तसेच  रामपुर येथील घरात पाणी शिरून पडझड झालेल्या पाच  नागरिकांना प्रत्येकी ३८०० रूपये असे एकुण एकोणीस हजार व बैल मृत पावल्याबद्दल रमेश ब...

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या.  2. वृषभ : मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. धीराने कामे करावीत. 3. मिथुन : घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. 4. कर्क : योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्‍यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल.  5. सिंह : कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. सर्वांशी गोडीने वागाल. 6. कन्या : विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे.  7. तूळ : घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. जुने वाद मिटू शकतील. 8. वृश्चिक : गुंतवणुकीसाठी योग्य काळ. पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्...

शिवार संसदच्या भावनिक हाकेला शेतकऱ्यांची साथ , अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या नाही..

  उस्मानाबाद:- मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मागील चार दिवसांपासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे ; पण सुदैवाने उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र अजुन तरी तसा अनुचित प्रकार घडलेला नाही. पाच दिवसापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिवार कडून आवाहन केले होते की, " आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा " या भावनिक हाकेला लगेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद ही दिला.  शिवार हेल्पलाइनवर शेतकऱ्यांनी कॉल करून आपल्या भावना व्यक्त केल्या. पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क सा...

बार्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा-किसान सभा

बार्शी- अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिल च्या वतीने तहसील कार्यालयासमोर ओला दुष्काळ जाहीर करा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.  आंदोलन दिनांक 19 ऑक्टोबर  रोजी करण्यात आले.    या आंदोलनात पुढील मागणी करण्यात आल्या, बार्शी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,  पिकांची, अवजारांची नुकसान भरपाई डी आर एफ वन एस डी आर एफ यांचे निकष बदलून झाली द्या, सोयाबीन, तसेच इतर पिकांना  प्रतिहेक्‍टरी पंचेचाळीस हजार रुपये तातडीने मदत करा,घराचे व शेतीचे विज बिल पूर्ण माफ करा, रेशन धान्य मिळावे,ओढे-नाले फुटलेले आहे त्याची दुरुस्ती  व्हावी,रस्ते महापुराने वाहून गेले आहेत त्यांची दुरुस्ती  व्हावी, श्रीपत पिंपरी येथील ओढ्यावरील पुलाची उंची वाढवावी, 2019 -2020 मधील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी द्या, बँकांकडून त्वरित कर्ज पुरवठा करा, पिक विमा मिळावा,पंचनाम्याचे घोडे नाचवत बसण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांची सरसकट मदत व्हावी, ज्या साखर कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम दिली नाही ती त्वरित मिळावी, चालू गळीत हंगामातील उसाला पाच हजार रुपये प्रमाणे प्रति टन भाव म...

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

1. मेष : घरामध्ये मंगलमय वातावरण राहील. कर्जाचे व्यवहार टाळावेत. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. जुन्या मित्रांकडून उत्तम सहकार्य लाभेल.  2. वृषभ : नातेवाईकांमध्ये व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी.  3. मिथुन : घरातील स्त्री वर्गाचा सल्ला उपयोगी पडेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. मोसमी आजार त्रस्त करू शकेल.  4. कर्क : भाग्यकारक दिवस. आपण घेत असलेल्या मेहनत, परिश्रमाचे चीज होईल. मुलांप्रति असलेला विश्वास आणखी मजबूत होईल. 5. सिंह : संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक अशांतता, खिन्नता, विचलन शक्य. पालकांच्या शुभाशिर्वादामुळे दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकेल. 6. कन्या : निर्भिडपणे कार्यरत राहाल. साहस आणि पराक्रमाच्या जोरावर कार्य पूर्णत्वास नेण्यास सक्षम व्हाल.  7. तूळ : शुभकारक दिवस. अधिकार आणि संपत्ती वृद्धिंगत होण्याचे संकेत. सेवाकार्य मनापासून कराल. 8. वृश्चिक : व्यापार विस्तारीकरणाच्या प्रयत्नांना यश येईलच, असे नाही. धैर्य आणि प्रतिभेचा वापर करून शत्रूवर विजय प्राप्त करू शकाल.  9. धनु : प...

समाजवादी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने अण्णाभाऊ व सहकाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा रणसंग्राम केला- कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे

बार्शी - बार्शी नगरपालिकेच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव , बार्शी  नगरपालिका या फेसबुक पेज वर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले.  हे व्याख्यान दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. अण्णाभाऊ व संयुक्त महाराष्ट्राचा लढा या विषयावर कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे पाचवे गुंफले गेले.  कॉम्रेड ठोंबरे यांच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेचा शेवट करण्यात आला. व्याख्यानात कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले,,, समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र निर्माण व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राची निर्मिती केली गेली.  संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे स्वकीयांनी स्वकीयांशी केलेला लढा आहे.  बलिदानाने रक्ताळलेली पाने या रणसंग्रामामध्ये आहेत.  या लढ्यामध्ये कॉंग्रेस पक्ष सोडून कम्युनिस्ट, समाजवादी, आरपीआय, शेकप हे सर्व पक्ष एकत्र होते.  सर्व कामगार संघटना यासोबतच कामगारवर्गाची संबंध असणारे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन या समाजाचे लोक होते सोबतच कामगार, विद्यार्थी, शेतकरी हेदेखील या लढ्याचा भाग होते.  बार...

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..👉

मेष : घरात सजावटीची कामे कराल. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल.  वृषभ : स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या.  मिथुन : दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. कर्क : हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्‍यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. सिंह : सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल.   कन्या : कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. चर्चेतून मार्ग काढता येईल.  तूळ : दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील.   वृश्चिक : लहान प्रवास घडेल. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्‍या घटना घडू शकतात.   धनु : हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मकर ...

अडचणींना सीमा असते का ?- एक प्रगतशील शेतकरी

बार्शी - भाजीपाला ,तूर ,सोयाबीन कांदा हे किती परवडतात हे शेतकऱ्यालाच माहित असत.या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आधीही कोणी केली नसेल एवढी मोठी  गुंतवणूक करून अर्ध्या एकरामध्ये 160 ×160 चे शेततळे खोदून त्यात मत्स्यपालनाच्या माध्यमातून एक नवा व्यवसाय ,नवी सुरुवात करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या मोठ्या भावाचं स्वप्न अस्मानी संकटामुळे उद्धवस्त झालंय. हा मत्स्यपालनाचा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो अनेकांचा मार्गदर्शक आणि नवा पायंडा पाडणारा ठरला असता. लेकरापेक्षा जास्त मायेनं , तळहाताच्या फोडासारखं जपलेलं स्वप्न स्वतः डोळ्यादेखत उद्धवस्त होताना त्याच्या मनाला काय वेदना होत असतील याची कल्पना करवत नाही .कोणत्या शब्दांनी सुरुवात करून त्याची समजूत काढावी कि अजून कष्ट करून उद्याचा दिवस चांगला आणूया ... अशा संकटाच्यावेळी वाटत कि अडचणीतून मार्ग काढून समृद्ध भविष्यकाळाची स्वप्न बघणे हा शेतकऱ्यांसाठी गुन्हाच ठरत असावा काय ?  एवढा मोठ नुकसान कस भरून निघेल ?  शासन -प्रशासन बघायला तरी येईल काय ?  डाव मांडावा कितीदा ?परिस्थितीने तो मोडावा कितीदा ?  प्रश्न संपणारच नाहीत ! मग उत्तरे तरी शोध...

लाडोळे तलावाचा कॅनोल फुटून पाण्यामुळे झालेल्या नुकसान पंचनामे करून भरपाई मिळावी

बार्शी -  लाडोळे  तलावाचा  कॅनोल फुटून पाणी शेतात घुसल्यामुळे सासुरे येथील शेतकरी जालिंदर साहेबराव आवारे व सत्यवान साहेबराव आवारे यांच्या जमीन गट नं 1 मधिल जमीन वाहुन गेली व मोठ मोठ्या तालीफुटून नुकसान झालं आहे.कांदा, सोयाबीन पिक वाहुन गेले आहे.त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी व फुटलेला कॅनोल तात्काळ दुरूस्ती कराण्यासाठी शाखा अभियंता यांनी त्यांच्या स्तरावरुन कार्यवाही करावी ,अशी मागणी जालिंदर साहेबराव आवारे, सत्यवान साहेबराव आवारे व इच्छांत सत्यवान आवारे यांनी शाखा अभियंता,पाटबंधारे उप विभाग बार्शी यांच्याकडे केली आहे. 

हेक्टरी एक लाख रुपये मदत करा - रयत क्रांती संघटना

माढा/राजकुमार माने - अतिवृष्टी व सीना माईला आलेल्या पुरामुळे सीना काठचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे.तसेच नदीकाठ जमिनी खचून वाहून गेल्यामुळे जमिनीचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. उसाच्या पिपाणीत गाळ जाऊन ऊस नष्ट झाला आहे.त्यामुळे उसाच्या पुन्हा लागणी कराव्या लागणार आहेत. फळबाग फळासाहित जमीनदोस्त झाल्या आहेत. विद्युत मोटारी, पाईप , केबल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे सीना काठच्या व सोलापूर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त भागातील पंचनामे त्वरीत करून तात्काळ हेक्टरी एक लाख रु नुकसान भरपाई मिळावी. ही विनंती खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

   मेष : काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.   वृषभ : जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.   मिथुन : कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. 4. कर्क : नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या.  5. सिंह : दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल.   कन्या : घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.  तूळ : व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात.  वृश्चिक : नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल.   धनु : आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना...

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचानामे करण्याचे बार्शी तहसीलदारांचे आदेश

 बार्शी - अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचानामे करण्याचे बार्शी तहसीलदारांचे आदेश  पंचानामे  करणाऱ्या कर्मचार्‍यांची यादी सोबत जोडली आहे. 

तुमच्या पिकाच्या नुकसानीची माहिती अशी पोहोचवा विमा कंपनीकडे ......

 सोलापूर :  गेल्या दोन तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.  त्यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यांनी अधिसूचित पिकाचे नुकसान झाले. असल्यास 72 तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनीस किंवा कृषी विभागास दयावी. नुकसान कळवताना सर्व्हे क्रंमाक, नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळवणे बंधनकारक आहे. शेतक-यांनी नुकसानीची माहिती कळवल्यास विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि संबंधित शेतकरी यांचा समावेश असणारी समिती नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल. ज्या शेतक-यांचे नुकसाने झालेले आहे अशा शेतक-यांनी आपल्या मोबाइल मधील गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance हे ॲप डाउनलोड करावे.  त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती दयावी. 18001037712 या टोल फ्री क्रमांकावर किंवा    customer.service@bharatiaxa.com या ईमेलवर माहिती दयावी असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

                        1. मेष : दिनक्रम व्यस्त राहिला, तरी प्रसन्नता लाभेल. दोन्ही बाजू समजून घेऊन नवीन कार्यारंभ करणे हिताचे ठरू शकेल. 2. वृषभ : धन, संपत्तीबाबतीत लाभाचे योग जुळून येऊ शकतील. व्यवसायात प्रगतीकारक दिवस. नवीन करार पूर्णत्वास जाऊ शकेल. 3. मिथुन : महत्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्या. निकाल आपल्या बाजूने लागतील. धावपळ करावी लागू शकेल.  4. कर्क : आपल्या बोलण्याच्या कौशल्याने प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नोकरीत उत्साही वातावरण राहील. राशी स्वामीचा भक्कम पाठिंबा लागेल.  5. सिंह : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. आजचा दिवस भाग्यकारक असेल. शुक्राचा पाठिंबा मिळेल.  6. कन्या : आपल्या कला गुणांमुळे कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मोठ्या वस्तू खरेदीचा घाट घालाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा करू शकाल.  7. तूळ : सामाजिक प्रतिष्ठा योग्य तऱ्हेने जोपासा. जवळच्या व्यक्ती आपल्याला आदर्श मानतील. आजचा दिवस समाधानकारक राहील.  8. वृश्चिक : सरकारी कामे मार्गी लागतील. जुन...

युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर

तुळजापूर/अक्षय वायकर -   “जागतिक हात धुणे दिवस” च्या निमित्ताने “हाताची स्वच्छता सर्वांसाठी” या   मोहिमे अंतर्गत  युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रात  घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम झूम ऑनलाइन (ॲपच्या माध्यमातून) आज संपन्न झाला.  या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यानी बक्षिस फटकावले. त्यामध्ये सिद्धाराम नागनाथ काम शेट्टी (जि. प. प्रशाला मुरूम तालुका उमरगा) याने चित्रकला पोस्टर मध्ये तृतीय क्रमांक तर प्रांजल दत्ता ढवळे इयत्ता 7 वी (सौ ताराराणी प्रशाला भूम) हिने वक्तृत्व (हात धुण्याचे महत्त्व) स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून 402 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुनम निकम इयत्ता नववी विद्यार्थिनी, डॉ. कमलादेवी आवटे. (सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य), कु. सिद्धी काळे...

अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांची आजच्या काळाला गरज- प्रा. संजय साठे

बार्शी - बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 बार्शी  नगरपालिका बार्शी या फेसबुक पेज वर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले.  हे व्याख्यान दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. अण्णाभाऊंची शाहिरी या विषयावर  प्राध्यापक संजय साठे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुंफले गेले. येथे प्राध्यापक संजय साठे हे विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी येथे प्राध्यापक म्हणून म्हणून काम  करतात ते साहित्यिक संशोधक आहेत. व्याख्यानात प्राध्यापक संजय साठे म्हणाले,, अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांच्या आजच्या काळाला गरज आहे कारण आजची  परिस्थिती ही शेतकरी श्रमजीवी विरोधी आहे. अण्णा भाऊंचा शाहिरी हा प्राण होता. वर्ण वर्ग वादाची जाणीव असलेले अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते.  अमर शेख, दत्ता गव्हाणकर यांच्यासोबत लाल बावटा कला पथकाची निर्मिती करत त्यांनी समाजपरिवर्तनाचा झेंडा हातात घेतलेला होता. मुंबईच्या सभा  संमेलनांमध्ये ते श्रमिकांपुढे शाहिरी गात.  शाहिरीच्या कवनामध्ये काल्पनिक ईश्वराला न...

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी दौरा

  तुळजापूर/अक्षय वायकर -  तुळजापूर तालुक्यातील कात्री रोड, अपसिंगा येथील ऋषिकेश पाटील यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जनावरे वाहून गेली आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.तसेच जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, शेतकरी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

जीवनावश्यक वस्तू साठी महिला संघटनेचे जोरदार निदर्शन

                                   रास्तभाव धान्य दुकानातून दसरा दिवाळीला 14 जीवनावश्यक वस्तू द्या.- कॉ.नसीमा शेख सोलापूर /दत्ता चव्हाण  :-   गेली सात महिने देशभरात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात थैमान घातलेल्या कोरोना महामारी आणि त्यामुळे केलेले लॉकडाऊन, विलगीकरण, प्रवासावरील निर्बंध यामुळे आधीच असलेली बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातच वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवाळी, दसरा तोंडावर आला असताना फटाके, रोषणाई, फराळाचे पदार्थ तर सोडाच साधे दोन वेळेच्या अन्नाला घरातील चिल्ली-पिल्ली आणि सर्वच कुटुंब महाग झाले आहे. त्यातल्या त्यात राज्य सरकारने सप्टेंबर २०२० पर्यंत एपीएल कार्डधारकांना केलेल्या ५ किलो धान्य वाटपामुळे थोडा हातभार लागला. दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यातील कित्येक कुटुंबांना जून २०२० पर्यंतच हे धान्य मिळाले. त्याकरता पुरवठाच कमी असल्याचे कारण रेशन दुकानदारांकडून देण्यात आले. तो पुरवठा त्वरित व्हावा अशी आमची मागणी आहे.  मात्र हे देखील पुरेसे नाही, हे आपण जाणत...

पिंपरी (सा ) गावातील नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा गावकर्‍यांचा आरोप

  प्रतिनिधी/शुभम काशीद- पिंपरी(सा) येथे प्रशासनाची कोणतीही मदत मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप...

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : छोटे प्रवास घडतील. छोट्या आजारांवर लगेच उपचार करा. एखादी विशेष व्यवस्था करण्यात दिवस व्यतीत होऊ शकेल.  2. वृषभ : अचानकपणे अनावश्यक पैसे खर्च होतील. घरात आनंदी वार्ता समजेल. ग्रहमानाच्या अनुकूलतेमुळे दिवस शुभ ठरू शकेल.  3. मिथुन : कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. अतिथींच्या येण्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. 4. कर्क : संपत्तीत भर पडू शकेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. व्यवसायासाठी प्रगतीकारक दिवस. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल.  5. सिंह : वैवाहिक जीवन सुखमय असेल. व्यापारी वर्गाने प्रामाणिकपणा, निष्ठा आणि मधु वाणीने सर्वांची मने जिंकू शकाल. 6. कन्या : एखादी नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नोकरदार वर्गासाठी दिलासादायक दिवस.  7. तूळ : चारही बाजूंनी मदतीचे हात पुढे येतील. एखादी भेटवस्तू मिळू शकेल. मान, सन्मान मिळतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. 8. वृश्चिक : तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. भविष्यात यातून फायदा मिळेल. दिवस आनंदात आणि उत्साहात व्यतीत होईल.  9. धनु : न्यायालयीन प्रकरणांत सकारात्मक वार्ता ...

शेतकर्‍यांनो आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा......

उस्मानाबाद: -सध्याच्या अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे. 

मानव्याला कवेत घेणारे अण्णाभाऊंचे साहित्य विश्व - डॉक्टर दत्तात्रय घोलप

बार्शी - बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 बार्शी  नगरपालिका बार्शी या फेसबुक पेज वर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले.  हे व्याख्यान दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. अण्णाभाऊंचे कादंबरी विश्व या विषयावर  डॉक्टर दत्तात्रय घोलप  यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे पहिले दुसरे गुंफले गेले. डॉक्टर दत्तात्रय घोलप हे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून काम  करतात ते साहित्यिक संशोधक आहेत. या व्याख्यानात डॉक्टर दत्तात्रय घोलप म्हणाले, अण्णाभाऊंचे साहित्य हे मानव्यालाला कवेत घेणारे आहे, अण्णाभाऊंचा बार्शीशी असणारा संबंध अमर शेखां मुळे घनिष्ठ झालेला आहे. कॉम्रेड शाहिद गोविंद पानसरे यांनी सुरू केलेले अण्णाभाऊंच्या नावाचे साहित्य संमेलन हे बार्शीत विचारांचा जागर घालणारे होते. बार्शी नेहमीच परिवर्तनाची प्रागतिक विचारांची वाट चोखाळणारी  राहिलेली आहे. लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अण्णाभाऊंनी लोकचळवळीचे रूप दिले.  शाहीरी बाण...

महिला अत्याचाराच्या घटना विरोधात भाजप आक्रमक

  सिंदखेडराजा /बालाजी सोसे -   सध्याच्या  सरकारच्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न  गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्याचार , विनयभंग आणि हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच  कोरोना महामारी सारख्या  अतिशय संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवर  अत्याचार आणि विनयभंग सत्र सुरूच आहे . .त्याकरिता आज सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर भाजप च्या वतीने मोर्चा काढून  निवेदन देण्यात आले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र मध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महा विकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचार घटनेचा वाचा फो‌डण्यासाठी एक दिवस आंदोलन करण्यात आलेलं होतं परंतु तरीही महाविकास आघाडी सरकार कुठली दखल न घेतल्यामुळे व पाऊल न उचलल्यामुळे आज दिनांक १२/१०/२०२० रोजी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्रात  महिलांवर होणारे अत्याचारा विरोधात तसेच त्याच्या सुरक्षिते साठी कडक  कायदा करावा . अशी मागणी करण्यात आली . यावेळी...