Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

मोफत तांदूळ आणि चणा डाळ योजनेला नोव्हेंबर पर्यत मुदतवाढ- पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

प्रतिनिधी- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

तासाभरात मिळतोय प्रवासाठीचा ई-पास ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

\ सोलापूर : कोरोना विषाणूच्या काळात सोलापुरात अडकून पडलेल्या मजूर, गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पास काढावा लागतो. पूर्वी चार-पाच दिवस लागणारा कालावधी आता एका तासावर आला असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरदिवशी दोन ते अडीच हजार अर्ज प्राप्त होत असून 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.           लॉकडाऊनमुळे सोलापूर ग्रामीण भागात अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक, भाविक आणि नोकरदार यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी 1 मे 2020 पासून ऑनलाईन ई-पास दिला जात आहे.           ई-पासविषयी अधिक माहिती देताना उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मोहिनी चव्हाण यांनी सांगितले की, आज 23 जून 2020 दुपारी 12 वाजेपर्यंत ग्रामीण भागात एक लाख 29 हजार 880 अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आले आहेत. 1 लाख 11 हजार 731 अर्जांना मंजुरी दिली असून 17 हजार 478 अर्ज नाकारले आहेत. मंजूर अर्जामध्ये सुमारे 97 हजार अर्ज हे सोलापूर जिल्ह्यातून इतर...

रेशनकार्ड नसणाऱ्यांनाही मिळणार तांदुळ आणि हरभरा

जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन             सोलापूर ,  दि.17   :   जिल्ह्यातील रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाला मे आणि जून महिन्यासाठी मोफत प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि प्रती कुटुंब एक किलो हरभरा देण्यात येणार आहे. याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 19 जूनपासून धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.             केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय पॅकेजअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि कोणत्याही योजनेत समाविष्ठ नसलेल्या रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. सोलापूर शहरात 110 केंद्रामार्फत सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना तर जिल्ह्यातील 943 केंद्रातील 1 लाख 4169 एवढ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.             सोलापूर शहरातील अ ,  ब ,  क आणि ड परिमंडळातील रहिवा...

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक मुंबई - सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या  वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते व ते कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते  त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज  डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा . शक्यतो अधिकृत व ...

पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त ,

गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. २९ : पंधराव्या वित्त आयोगामधून सन २०२०-२१ या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. या निधीपैकी १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गावांच्या विकासासाठी थेट ८० टक्के निधी चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधी मागील वर्षी समाप्त झाला. आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरित केला जातो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळत असल्याने यामुळे गावांमधील...

‘मिशन बिगिन अगेन’मधील सवलती कायम ठेवत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

दिव्यांग कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात कार्यालयीन उपस्थितीत सूट मुंबई  – राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह दि. 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयाची अधिसूचना शासनाने आज निर्गमित केली. या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. व्यक्तिगत व्यायाम, दुकानांमधील खरेदी या बाबी संबंधित व्यक्तींच्या नजीकच्या परिसरात करता येतील. यासाठी सामाजिक अंतर,व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील. कार्यालयीन कामकाजासाठी जाण्यायेण्यास प्रतिबंध राहणार नाही. कोविड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना मास्कचा वापर :  सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान चेहरा झाकून घेणारी साधणे/ मास्क वापरणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर पाळणे(सोशल डिस्टंसिंग ) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी...

इंधन दरवाढी विराेधात एसएफआयचे निषेध निदर्शने

सोलापूर- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय केंद्रीय कमिटी च्यावतीने २९जून हा दिवस 'देशव्यापी निषेध दिन' पाळण्याची राष्ट्रीय हाक देण्यात आली. त्या अनुषंगानेच महाराष्ट्रासह सोलापुरात इंधन दरवाढी विरोधात निदर्शन करण्यात आले.इंधन दरवाढ तातडीने मागे घ्या. हि प्रमुख मागणीचा फलक हातात घेऊन सोमवार २९जून रोजी केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आले.

इंधन दरवाढी विराेधात माकपा ची निदर्शने

सोलापूर - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पॉलीटब्युरोच्यावतीने २९जून हा दिवस 'देशव्यापी निषेध दिन' पाळण्याची राष्ट्रीय हाक देण्यात आली. त्या अनुषंगानेच महाराष्ट्रासह सोलापुरात इंधन दरवाढी विरोधात शहरात विविध ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शाखांच्यामार्फत इंधन दरवाढ तातडीने मागे घ्या. हि प्रमुख मागणी घेऊन सोमवार २९जून रोजी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली व माकपचे जिल्हा सचिव अ‍ॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदवण्यात आले.

प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायलचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजोक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत...

हम ‘मिलकर’होंगे कामयाब! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

‘मिलकर’च्या माध्यमातून दान आणि काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईकरांना आवाहन क्राउड फंडिंगसाठीच्या http://www.milkar.org संकेतस्थळाचे उद्घाटन मुंबई :- मला तुम्ही विचाराल की देव कुठे आहे तर मी म्हणेन देव मदत करणाऱ्या सर्व हातांमध्ये आहे. सगळे मिळून जेव्हा काम करतात तेव्हा यश हे मिळतेच. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने आपण कोविड विषाणूविरुद्धचे हे युद्ध जिंकूच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते क्राऊड फंडिंग प्रणालीच्या https://milkar.ketto.org/covid19 या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. मिलकर संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी एकत्र आलेल्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेसचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. मुंबईकरांनी पुढे येऊन ‘मिलकर’ व्यासपीठाच्या माध्यमातून काम आणि दान करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिका, कॉर्पोरेट हाऊसेस आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन हे व्यासपीठ विकसित केले असून ते भुकेल्या व्यक्त...

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अनिर्बंध वावर रोखणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांचा मुख्यमंत्र्यांकडून  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा मुंबई दि २९: कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे राहील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनी २ किमी अंतराचे निर्बंध टाकले त्यामागे मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखणे हाच उद्देश आहे असे स्पष्ट केले. पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू यांनीही या बैठकीत सहभाग घेऊन सूचना केल्या. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर राजीव, बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी  देखील उपस्थित होते. आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही पण कोणतेही...

सोलापुरात ९३ वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत. घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती. भाऊ मृत झाल्याचे तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब १३ जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे. आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. या ठिकाणी वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण दिले जात हो...

कोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला गृहमंत्र्यांचे साकडे

आषाढी एकादशी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी पंढरपू र - आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट देऊन सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. महाव्दार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाला कोरोनामुक्तीचे साकडे घातले. “विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोनामुक्तीची” असे सांगत संपूर्ण जगातून, भारत व महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव आणि शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच सुरू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या” या शब्दांत हे साकडे घातले. पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन गृहमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केले. गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांना वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाक...

मेंढपाळांच्या बकऱ्या-मेंढ्या चारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारने कुरण करावे - अॅड असीम सरोदे

'मेंढपाळांच्या मानावीहक्कांचा जाहीरनामा' मेंढपाळांसोबत राज्यभर जनसूनवाई घेऊन तयार करणार प्रतिनिधी - शेळ्या-मेंढ्यां सरकारी जागेवर चरण्यावरून मेंढपाळांवर गुन्हे दाखल होणे थांबले पाहिजे. वनविभाग व पोलिसांनी मेंढपाळांचे असे गुन्हेगारीकरण न करता सरकारने प्रत्येक जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी धनगरांना स्वंतत्र जागा व चराई कुरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मानवीहक्क विश्लेषक अॅड असीम सरोदे यांनी केली. ते महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या समस्यांवर दिनांक 25 जून रोजी आयोजित झूम मीटिंगमध्ये बोलत होते. या ऑनलाइन मीटिंगमध्ये भटक्या विमुक्त जाती-जमातींचे अभ्यासक, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते नागेश जाधव, संविधान प्रचारक कार्यकर्ते मनीष देशपांडे तसेच मेंढपाळ यांच्या समस्या आणि मागण्या यासाठी कार्य करणारे मेंढपाळपुत्र अंकुश मुढे, आनंद कोकरे,अर्जुन थोरात,नवनाथ गारळे,सौरभ हाटकर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

जनतेची लूट करणे हा केंद्र सरकारच्या भांडवली धोरणांचा भाग

कोरोना महामारीच्या काळात माणसे धास्तावलेली आहेत. बेरोजगारीने संपूर्ण जगच संकटात सापडलेले असताना , आपल्याा सारख्या प्रगतिशील देशाची याहून वेगळी काय अवस्था असणार आहे. आधीच्या  बेरोजगारीत भयानक अशी भर पडली आहे. खाण्यापिण्याचे वांदे होत असताना , रोजचा दिवस कसा काढायचा ? असा विचार कित्येक गरीब करीत आहेत. याच चिंतेतून लॉकडाउन काळात झालेली मजूर वर्गाची पायपीट देशाने पाहिली आहे. मजूरांच्या बाजूने अनेक पक्ष संघटना उभा राहिल्या. त्यात वेगवेगळ्याा स्वयंसेवी संस्था व पुरोगामी पक्ष कार्यकर्ते तर दुसर्‍या बाजूला  आपल्या  घरात कोणता मेनू करायचा ? या चिंतेत मग्न होते.  काही मजूरांचा भाकरी बांधून सुरू झालेला प्रवास रेल्वे च्या पोलादी चाकांखाली संपला{आपल्या डोळ्यासमोर औरंगाबाद रेल्वे अपघाताची घटना समोर येईल. }.या घटनेनंतर देखील मजूर वर्गाची पर्वा  केली गेली नाही.  रस्त्यावर च कित्येक महिलांनी मूलांना जन्म दिला. आईच्या दुधावर जगणार्‍या लेकरांना कडेवर, डोक्यांवर, सायकलवर ठेवून जाणारी बिचारी माणसे संपूर्ण देशाने पाहिली.लॉकडाउन च्या  काळात श्रमिकांनी जे सहन केले , त...

शहीद सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

साकुरी गावात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह हजारो नागरिकांनी घेतले भावपूर्ण अंतिम दर्शन  शहीद सचिन मोरे ‘अमर रहे अमर रहे’ ‘भारत माता की जय’ घोषणा आणि साश्रू नयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप मालेगाव, दि. 27 : इंजिनिअरिंग रेजिमेंट-115 मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले शहीद वीरजवान सचिन विक्रम मोरे यांच्यावर त्यांच्या मूळगावी साकुरी झाप  (ता.मालेगांव जिल्हा नाशिक) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, कृषि तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ.भारती पवार, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक डॉ.आरती सिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवान सचिन मोरे यांना श्रध्दांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने  प्रारंभी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.  राज्य शासनाच्या वतीने  पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तर ज...

शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी

गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून ग्वाही बार्शी : पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पानगाव (ता.बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन श्री.देशमुख, श्री.टोपे, श्री.भरणे यांनी आज सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत, संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबाबाबत माहिती  दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने मागणी केली होती.यावर श्री. देशमुख म्हणाले, आम्हाला शहीद काळे यांचा अभिमान आहे. शासन खंबीरपणे कुटुंबाच्या पाठिशी आहे.  ...

राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली. यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील तिसऱ्या, पाचव्या  व सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एकरकमी न भरता तीन हप्त्यात सत्र समाप्ती परीक्षेपूर्वी भरायची सवलत दिली आहे. विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीची बैठक होऊन त्यात शुल्क भरण्यासाठी सवलत देण्याचा ठराव करण्यात आला. कोरोनामुळे राज्यात उद्भवलेल्या आपत्तीमुळे कृषी व संलग्न अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आगामी शैक्षणिक वर्षात शुल्क भरण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत कृषिमंत्र्यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि अधिष्ठाता यांना निर्देश दिले होते.

मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई दि 26 – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, ‘कोरोना’मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही.

आशा सेविका व आशा गट प्रवर्तकच्या मानधनात वाढ - रणसंग्रामच्या निवेदनाची घेतली दखल

रणसंग्राम फाऊंडेशन च्या लक्षवेधी निवेदनाची सरकारने घेतली दखल ; कुंडल येथील आशा सेविकांनी मानले अजितदादांचे आभार. सांगली - जेष्ठ समाजसेविका अँड. मनिषा रोटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कुंडल ता. पलुस येथील रणसंग्राम फाऊंडेशन तसेच ज्ञानदर्शन वार्ता व्दारा राज्यभरातील आशा सेविका यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 7 वा वेतन आयोगानुसार मानधन मिळणेबाबत लक्षवेधी निवेदन ई मेल व्दारा पाठविण्यात आले. या लक्षवेधी निवेदनाचा पाठपुरावा राज्यभरातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध संघटनांनी करत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन मागण्यांचे गा-हाणे दिले होते. या निवेदनाची दखल घेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा कर्मचारी यांना 2000  व आशा गतप्रवतक  याना 3000 रुपय मानधन वाढ देण्यात आली.या निर्णयानंतर कुंडल येथे अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यांनी साखर वाटत आनंद साजरा केला. रणसंग्राम फाऊंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे की,  जगभरात आणि देशात, आपल्या महाराष्ट्राला कोरोनाच्या महामारीचा प्रचंड मोठा विळखा बसला आह...

सलून,केशकर्तनालये आणि ब्युटी पालर्स सुरु करण्यास परवानगी

मुंबई दि २४ – शासनाने मिशन बिगिन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात केशकर्तनालये, सलुन्स आणि ब्युटी पार्लस दि. २८ जून २०२० पासून सुरु करता येतील. राज्यातील उर्वरित भागांमध्येसुध्दा केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लगेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे. •  केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येईल. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल. •  दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. •  ग्राहकाला सेवा दिल्...

पाणी फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण चे डिजीटल प्रशिक्षण

औरंगाबाद - पानी फाउंडेशनतर्फे आता डिजीटल माध्यामातून प्रशिक्षण घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने यंदा महाराष्ट्रभरातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण होणे शक्य नव्हते. याआधी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी तुम्ही गावकरी प्रशिक्षणासाठी केंद्रावर यायचे. मात्र आता समृद्ध गाव स्पर्धेच्या नव्या पर्वात प्रशिक्षणच थेट तुमच्या घरांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग अवलंबत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची सुरूवात केली. १५ ते १७ जून २०२० यादरम्यान महाराष्ट्रभरातील समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या ४० तालुक्यांमध्ये 'झाडे पृथ्वीला वाचवू शकतात' हे प्रशिक्षण कृषी अधिकारी डी. एल. मोहिते यांनी घेतले. पावसाळ्याच्या सुरूवातीला वृक्षारोपण कसे करावे याची शास्त्रीय माहिती देणाऱ्या या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काहींनी आपल्या घरातच मोबाईलवर हे प्रशिक्षण पाहिले तर कारंजा तालुक्यातील दोनद बु आणि खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव सारख्या अनेकांनी  social Distance चे पाल...

वीजबिल माफ करा- भाकप ची मागणी

बार्शी - भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 26 जून 2020 रोजी विजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मा. अधिक्षक अभियंता, सोलापूर यांना मा. कार्यकारी अभियंता बार्शी यांचे मार्फत हे निवेदन  देण्यात आले आहे.  निवेदणाची प्रत मा. मुख्यमंत्री यांना ही मेल करण्यात आली आहे.  हे निवेदन मा. तहसिलदार, बार्शी यांचे मार्फत काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. निवेदनात म्हणले आहे, कोविंड मुळे सामान्य नागरिकांचे जगने मुश्कील झाले आहे.अशातच महावितरणकडून रिडिंग न घेता सरसकट आव्वाच्या सव्वा विजबिले पाठवली आहेत.कोरोना महामारीमुळे रोजगार नाही.याच काळत विजदरवाढ करून सर्व सामान्यांची लूट केली जात आहे त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटच्या या काळात सर्वांची विजबिले माफ करावीत अशी मागणी करण्यात आली आहे.  निवेदण काॅम्रेड प्रविण मस्तुद, काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड पवन आहिरे कॉ. बालाजी शितोळे यांनी दिले.

पिंपरी येथे शहीद जवान सुनील काळे यांना वाहिली श्रद्धांजली

बार्शी- बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र शहीद मेजर सुनील काळे यांना जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले.त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण भारत देशातून दुःख व हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी (सा) येथे  बुधवारी सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मेजर सुनील काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पिंपरी गावचे सुपुत्र मेजर हनुमंत वायकर व मेजर बळवंत वायकर यांनी पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली.पद्माकर काटमोरे,राजेश काशीद,चेतन काशीद,मनोज काटमोरे यांनी मेजर सुनील काळे यांची शौर्यगाथा व देशासाठी दिलेले बलिदान स्पष्ट करीत शब्द सुमनांनी आदरांजली वाहिली.मेजर बळवंत वायकर व ग्रामस्थ यांनी अमर रहे अमर रहे मेजर सुनील काळे अमर रहे हा घोष केला.हिस्सार,हरियाणा येथे देशसेवा बजावत असलेले मेजर हनुमंत वायकर यांनी सुनील काळे यांना आलेले वीरमरण कोणताच भारतीय विसरणार नाही,शूर धाडशी जवानाला आज देश मुकला आहे असे मत आदरांजलीपर भाषणातून व्यक्त केले.देशातील युवकांनी पुढे येत देशसेवा करण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे. मेजर सुनील काळे यांच्याकडून प्रेरणा घेत यापुढेही उत्तमोत्तम ...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

सोलापुरात एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करणार- पालकमंत्री भरणे

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्याचबरोबर शहरात तुर्तास लॉकडाऊन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर श्री. भरणे यांनी ही माहिती दिली.  बैठकीस  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते. श्री.भरणे यांनी सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचा का याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली. मात्र सोलापूर शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन न करण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला, असे सांगितले.  सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यातून स...

मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर :- जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह आणि घर व घराच्या परिसरात अटी शर्तींच्या अधिन राहून लग्न समारंभास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत. या आदेशात त्यांनी नमूद केलेल्या अटी पुढीलप्रमाणे – 1.लग्न समारंभाच्या ठिकाणी एकावेळी मंगल कार्यालयामधील कर्मचारी, उपस्थित सर्व व्यक्ती, बँन्ड /वादक, भटजी, डेकॉरेटर व इतर यांच्यासह एकूण संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. 2.मास्क आणि सुरक्षित अंतराचे (social Distancing) पालन करणे बंधनकारक राहील. 3.लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुनच प्रवेश देणे आवश्यक राहील. 4.मंगल कार्यालयामध्ये एअर कंडीशनचा वापर करू नये, मंगल कार्यालयात सर्व बाजूने हवा खेळती  राहील अशी व्यवस्था करावी. 5.मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तु / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करावे. 6.लग्नसमारंभ सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00या कालावधीतच आयोजित करावा. 7.कोणतीही आजारी व्यक्ती लग्न स...

पीक कर्जाने दिली नवी आशा!

शहादा तालुक्यात मौजे कुसुमवाडीच्या आदिवासी महिला कनीबाई सांबरसिंग ठाकरे यांना जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या पीक कर्ज मेळाव्यात 1 लाख 14 हजाराचे कर्ज अवघ्या तीन तासात मंजूर करण्यात आले. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनादेखील मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सेन्ट्रल बँकेने आयोजित केलेल्या मेळाव्याची माहिती तलाठी राजेंद्र रोकडे यांनी कोतवालामार्फत कुसुमवाडीत पोहोचविली. कनीबाई यांना घरपोच माहिती मिळणे हा सुखद धक्का होता. कनीबाई या 66 वर्षाच्या विधवा आहेत. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी भावाच्या मुलाला काही वर्षापूर्वी दत्तक घेतले. स्वत:च्या पाऊणे दोन एकर जमिनीवर त्या स्वत: मुलासोबत राबतात. यापूर्वी 1993 मध्ये त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर ते फेडता न आल्याने कर्ज घेता आले नाही. कष्टाने शेती करून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला होता. मागील कर्जमाफी योजनेत त्यांचे जुने कर्ज माफ झा...

अधिकाऱ्यांशी चर्चा करू; सोलापूरच्या लॉकडाउनचा निर्णय उद्या जाहीर करु

सोलापूर -सोलापूर शहर व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या व कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणायचा कसा? असाच प्रश्न सर्वसामान्यांसह जिल्हा प्रशासनालाही पडला आहे. 15 दिवसांसाठी सोलापूर शहर व परिसरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तयार केला आहे. या प्रस्तावाबाबत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जे जे प्रयत्न आवश्‍यक आहे ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. पंधरा दिवसाच्या कडक लॉकडाऊन बाबत उद्या (गुरुवारी) मी सोलापुरात आल्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान, पालकमंत्री भरणे उद्या (गुरुवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी 11 वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता ते सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच...