Skip to main content

अंगणवाडी शिक्षिका शिवलिला यांचा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा


अक्कलकोट / प्रतिनिधी - सध्या भारतासह जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे.अशा जीवघेण्या कोरोनापासून गाव पातळीवर संरक्षणाचे काम अंगणवाडी सेविका व आशा वर्कर वर आहे. यामध्येच प्रतिवर्षी प्रमाणे शिवलिला दोडमनी मॅडम यांचा वाढदिवस आला.नुकताच काही महिन्यापुर्वी त्यांचा साखरपुढा झालेला आहे.त्यांचे होणारे पत्ती जयकुमार सोनकांबळे असुन त्यांचे शिक्षण बी.ए, एम.ए, बी.एड झालेत.शिवलिला मॅडम चे शिक्षण डी.एड, बी.ए झाले असुन ते अंगणवाडी शिक्षिका म्हणुन कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुकामधील चलगेरी या गावी कार्यारत आहेत.ते दोघे ही उच्च शिक्षित,उच्च विचारसरणी व साधा राहणीमान आहे.आपल्या प्रिय बायकोचा वाढदिवस जरा हटके आणि एकदम उत्साहात साजरा कराण्याचा ठरवले होते.पण शिवलिला मॅडमने आपल्या वाढदिवसाचा खर्च समाजाच्याच कामी यावा असे मत व्यक्त केले.म्हणुन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "आपणही समाजाचं काही देणं लागतो" या उदान्त हेतूने त्यांचा उच्च शिक्षित असलेला होणाऱ्या नवरदेवाने त्यांच्या वतीने जि.प.शाळेत काॅरटाईन असलेल्या लोकांना,चालत जाणाऱ्या मजुराना,कामगाराना असे अनेक गरजू लोकांना अन्न-धान्य,पाणी व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
      ह्या कोरोनाच्या महामारीत आपण देखील अश्या प्रकारची लाख मोलाची मदत करून ह्या वैश्विक महामारिचा पराभव करावा असे आव्हान शिवलिला दोडमनी व जयकुमार सोनकांबळे यांचा वतीने करण्यात आले.सोनकांबळे परिवार हे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविण्यास अग्रेसर असतात.ही त्यांची विशेष खासीयत.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...