Skip to main content

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकचा कामगार धोरण विरोधी निषेध व मागण्या


बार्शी -  कोरोना लाॅक डाउन काळात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्र सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 22 मे 2020 रोजी देशव्यापी कामगार विरोधी धोरण निषेध दिन पाळत मागण्या मागण्यात आल्या.  यावेळी कार्यत्यांनी आपल्या हातात पोस्टर घेवून मागण्या मागीतल्या.  मा. पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मा. जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा यांना मेलव्दारे निवेदण पाठवण्यात आले आहे.

या निवेदणात म्हटले आहे,  केंद्र राज्य सरकारांनी कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचे निर्णय रद्द करावेतण् कामाचे तास पूर्वीप्रमाणेच आठ तास करण्यात यावेत, लॉक डाऊन कालावधीचे वेतन कामगारांना विनाकपात अदा करा, पत्रकारांना 10 हजार रूपये निर्वाह भत्त द्याव सुरक्षा द्या, लॉक डाऊन मुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावीएत्यांना अन्न पाणी व औषध उपचार औषधोपचाराची व्यवस्था करावी, आयकर लागून नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला साडेसात हजार रुपये थेट रोख मदत द्यावी, सर्व गरजूंना रेशन दुकानातून स्वस्त अन्नधान्य व व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, महागाई भत्ता गोठविण्याचा निर्णय रद्द करा, सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी व व्यवस्थेसाठी जी.डी.पी.च्या ५ टक्के खर्च करा, सर्व मजूरांना प्रवास भत्ता दहा हजार रूपये द्या, मनरेगा ताकदीने राबवा, तिची मोडतोड थांबवा, कामाचे दिवस वाढवा, वेळेत वेतन द्या, षहरी भागात रोजगार आणि निवार्याची सोय करा, कोणत्याही अटी शर्ती विना रेशन द्या,ग्रामीण भागातील गरिब लोक व शेतकर्यांच्या समस्या सोडवा, वृध्द, विधवा आणि अपंग यांना पेन्शन द्या दिल्या जाणरर्या रकमेत वाढ करा, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार करा, केंद्र व राज्य कर्मचारी यांचा महागाई भत्ता गोठवलेला परत चालू करा, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोगाचा लाभ द्या या मागण्या करण्यात आल्या आहे.
 
 या निवेदणावर भाकप राज्य कौन्सिय कार्य सदस्य काॅम्रेड तानाजी ठोंबरे, काॅम्रेड ए.बी.कुलकर्णी, काॅम्रेड प्रविण मस्तुद, काॅम्रेड शौकत शेख, काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, काॅम्रेड पवन आहिरे, यांच्या सह्या आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...