Skip to main content

Posts

आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटप

सोलापूर /विशेष प्रतींनिधी - सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले गटनेते चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे हे उपस्थित होते. यानंतर माननीय आमदार यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची त्यांच्या कार्यालयात तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सीओ श्री.दिलीप स्वामी यांची देखील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. आमदार लाड यांच्या वतीने जूळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी येथील शासकीय क्वारंटाइन सेंटर मधील महिला डॉक्टर तसेच रुग्णसेवक यांना १०० PPE कीट प्रदान करण्यात आले.यावेळी मनपा उपायुक्त धनराज पांडे, मनपा क्रीडाधिकारी...
Recent posts

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश

मुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख वाढवून आता 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2021-2022 या चालू वर्षातील, दिनांक 01 जुलै 2021 ते दिनांक 31 डिसेंबर 2021 या सहा महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. यासाठी, प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये 100/- एवढे आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी विहीत अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली,वर्सोवा, मुंबई - 61 येथे दिनांक 30 जून 2021 पर्यत सादर करावे, असे...

थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा

शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामभाऊ लाड यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करा - आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी सांगली  /विशेष प्रतिंनिधी - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील ,क्रांती अग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांचे सहकारी,सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड (भाऊ)यांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र च्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. काल 21 जून 2021रोजी पलूस येथे घेण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे भविष्यकालीन धोरण ठरवण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दगडू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रारंभी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन क्रांतिवीर रामचंद्र लाड तथा भाऊ हे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत . त्यामुळे कॅप्टन भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा ठराव करण्यात आला व भ...

शावळ येथे वृक्षारोपण,फादर्स डे चे औचित्य साधत भोसले परिवारांचा उपक्रम

  सोलापूर / मनमोहन भोसले - अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे फादर्स डे चे औचित्य साधत डॉ मेंटन फाउंडेशन यांच्या सौजन्याने व कै भीमराव तुळशीराम भोसले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुंदर भोसले यांनी केले होते. यावेळी गावचे सरपंच सोमलिंग तामदंडी ,ग्रामसेवक संतोष म्हेत्रे ,सदस्य संजय भोसले ,  सदगुरू महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा रुपाली गणेश पाटील ,शिवबा फाऊंडेशन संस्थापक सिद्धेश्वर सर्जेराव सुरवसे,जिजाई कन्स्ट्रक्शन शावळ अध्यक्ष  भीमा गोरख सुरवसे,श्रीमंत भोसले, नितीन चव्हाण,मनमोहन भोसले, प्रेमनाथ भोसले , परमेश्वर भोसले, समर्थ भोसले आदी उपस्थित होते.

Jobs - बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी

 बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रत्नागिरी भरती २०२१. पदाचे नाव: कार्यालय सहाय्यक आणि वॉचमन कम माळी. रिक्त पदे: 02 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. अर्ज करण्याची पद्धद्त : ऑफलाईन. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुन 2021. वेबसाइट - https://bankofindia.co.in/ जाहिरात -  येथे क्लिक करा अर्ज पाठवण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालय, आरोग्य मंदिर जवळ, रत्नागिरी – कोल्हापूर महामार्ग, शिवाजी नगर, रत्नागिरी 415639.

संभव फाऊंडेशन व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३ हजार रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

  शहर प्रतिनिधी /सोलापूर  - आज जगभरात कोरोना विषाणू ची महामारी सुरू असताना लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत, सर्वत्र शासनाने लागु केलेल्या संचारबंदी मुळे होतकरू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली असून यात कष्टकरी विडी कामगार, घरेलू कामगार महिला, फेरीवाले, बांधकाम कामगार समूहाचे पण तितकेच हाल होताना दिसत आहेत. सोलापूर शहरातील तळागाळातील गरीबां पर्यंत मदत पोहचुन सेवा पुरवणारी संभव फाऊंडेशन गेल्या काही दिवसांपासून लॉक डाउनच्या काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेत ही अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे कार्य सुरू ठेवले असून या मध्ये आटा, डाळ, तेल, साखर, हळद, मीठ व मास्क असे जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून पोटाची खळगी भरण्यासाठी दोन हातांशी धडपडणाऱ्या सोलापूर शहरातील  तीन हजार चारशे होतकरू, कष्टकरी गरजवंताना सदर किट चे वाटप करण्यात आले.  हे रेशन किट जुने विडी घरकुल, नवीन विडी घरकुल कुंभारी, मुळेगाव, कुमठे, दोड्डी, बेलाटी, मिलींद नगर, एस.टी बस स्टँड, जुना बोरामणी नाका, गांधी नगर, रविवार पेठ, मोदी, सुत मिल, हब्बु वस्ती, माने वस्ती, जवळकर...

कोवीड 19 गेम चेंजर या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय झाली पोस्टर स्पर्धा

  बार्शी/प्रतिनिधी - श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शीच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने' कॉव्हिड 19, द गेम चेंजर' या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती.  महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी काढलेल्या 50 पेक्षा जास्त पोस्टर्सचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.  या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनीही यात भाग घेतला आणि 18 पेक्षा जास्त पोस्टर नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन झा आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रो. डॉ. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायलॉस्ट सोसायटी, इंडिया  यांच्या हस्ते झाले.  त्यांनी कोरोनावरील अतिशय माहितीपर व्याख्यान दिले. प्रथम स्नेहा नलवडे,  द्वितीय स्वेता जाधव, तृतीय भूमिती माने व विशाखा शिराळकर या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार करण्यात आला.  यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्षा मा. सौ. वर्षाताई झाडबुके यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे आयोजन एसबीझेडएम, मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख श्रीमती अरुषा नंदीमठ...