Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

RBI मध्ये पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

 RBI मध्ये पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! पोस्ट व जागा खालीलप्रमाणे : ● ऑफिसर ग्रेड-बी (General) - 270 पात्रता : कोणत्याही विषयात किमान 60 टक्क्यांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक SC, ST दिव्यांगांसाठी 55 %गुणांसह उत्तीर्ण आवश्यक कोणत्याही विषयात किमान ५५ %गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक  ● ऑफिसर ग्रेड-बी (DEPR) - 29 ● ऑफिसर ग्रेड-बी (DSIM) - 23 पात्रता : संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्री किंवा पीजीडीएम (Post Graduate Diploma) केलेला असावा. वयाची अट : किमान 21 वर्षे I कमाल 30 वर्षे MPhil, Ph.D. उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान 32 वर्षे I कमाल 35 वर्षे. आरक्षित वर्ग वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत : : दि. 15 फेब्रुवारी 2021 ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/ अधिकृत वेबसाईट : https://www.rbi.org.in/ 

NHM अमरावती अंतर्गत 46 पदांची भरती

  NHM अमरावती अंतर्गत 46 पदांची भरती पदाचे नाव : योग प्रशिक्षक पद संख्या : 46 जागा शैक्षणिक पात्रता :  Diploma in Yoga Education OR BA / MA in Yoga /YCB Certified Yoga Instructor / Teacher  नोकरी ठिकाण : अमरावती अर्ज पद्धती : ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत : 5 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता : National Health Mission District Office Amravati, District General Hospital Premises, Irwin Chowk, Amravati अधिकृत वेबसाईट : www.zpamravati-gov.in 

🪀 आता WhatsApp वरील chats Telegram वर मूव्ह करता येणार; कसं ते घ्या जाणून!

🧐 युजर्स WhatsApp बंद करुन Signal किंवा Telegram शिफ्ट होत आहेत परंतु त्यापैकी काहींना त्यांचे चॅट्स गमावण्याची भीती आहे.  🤷🏻‍♂️ अशा युजर्सना दिलासा देणारी बातमी आहे. कारण आता तुम्ही तुमचे WhatsApp chats Telegram वर मूव्ह करु शकता. 

CAG मध्ये बंपर भरती!

पदांची नावे : CAG ऑडीटर, अकाऊंटट ● ऑडीटर - 6409 ● अकाऊंटट - 4402 शैक्षणिक पात्रता :  ● मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ● निवडलेल्या भाषेमध्ये आवश्यक ती निपुणता अर्ज कसा करावा : उमेदवारांनी संकेतस्थळावर  जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल. CAG Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी पत्ता : Shri V S Venkatanathan, Asstt. C & AG(N), O/o the C&AG of India, 9, Deen Daya; Upadhya Marg, New Delhi - 110124 अर्ज भरण्याची मुदत : 19 फेब्रुवारी 2021

3 फेब्रुवारी आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करा

  आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या फाशीचा दिवस 3 फेब्रुवारी आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन जाहीर करावा या मागणीसाठी शासनाकडे आग्रह धरणार -आमदार अरुण (आण्णा) लाड सांगली -भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी 1820 ते 1832 या कालखंडात इंग्रज सरकारविरुद्ध प्रथमच बंडाचा झेंडा उभारला आणि महाराष्ट्राच्या एका भागात स्वतःचे राज्य निर्माण केले. अशा या लढवय्या क्रांती वीरास इंग्रज सरकारने तीन फेब्रुवारी 1832 रोजी पुणे येथील खडक माळ या ठिकाणी फाशी दिले. आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक संपूर्ण भारतासह महाराष्ट्राची एक स्वतंत्र अस्मिता ठरली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 3 फेब्रुवारी हा दिवस आद्यक्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या मागणीचा पाठपुरावा शासनस्तरावर करणार असल्याची ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण (आण्णा)लाड यांनी दिली.  काल आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आमदार मा.अरुण (आण्णा)लाड यांना भेटले व या मागणीसंबंधी चर्चा करुन निवेदन दिले. तेव्हा आमदार...

दिल्ली शेतकरी आंदोलनाला बार्शीत मोटारसायकल रॅलीने पाठिंबा

बार्शी- - अखिल भारतीय किसान सभा, बार्शी तालूका कौन्सिलच्या  वतिने 26 जानेवारी 2021 वार मंगळवार रोजी दिल्ली येथे केंद्र सरकारने संमत केलेले तिन कृषी कायदे रद्द करावे यासाठी चालू असलेले अंदोलन व टॅ्‍क्टर रॅलीस पाठिंबा दर्शवण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.  हि रॅली काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्वक वातावरणात काढण्यात आली.  हि रॅली भगवंत मैदाण येथून निघून बार्शी शहराच्या मुख्य रत्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर पोहचून तेथे सभेत रूपांत झाले.  यावेळी मोटारसायकवरून शेतकरी व कार्यकर्ते जय जवान जय किसान, तिन काळे कृषी कायदे रद्द करा अशा घोषणा देत होते. यावेळी झालेल्या सभेत काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, केंद्र सरकार हुकूमशाही पध्दतीने वाटचाल करीत आहे, देशातील सर्वात मोठा घटक शेतकरी हे कायदा रद्द करण्याची मागणी करीत असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, परंतू कोणतीही तमा न बाळगता हे अंदोलन कायदे रद्द मागे घेवूनच थांबेल. यावेळी किसान सभेचे काॅम्रेड लक्ष्मण घाडगे यांचेही भाशण झाले.   ...

🎮 बहुप्रतिक्षित स्वदेशी FAU-G गेम अखेर लॉन्च; फीचर्स आणि डाउनलोड बद्दल जाणून घ्या!

👨🏻‍✈️ चायनीज PUBG गेम ने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वेड लावले होते. चायनीज ॲप्स सरकारने बंद केल्यानंतर PUBG सुद्धा हद्दपार करण्यात आला. 

देशात महाराष्ट्र पोलिसांचा डंका

  दिल्ली - महाराष्ट्रा पोलीस दलाने शौर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करून 57 पदके मिळवून देशात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले आहे.शौर्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, राष्ट्रपती पोलीस पदक विशेष उल्लेखनीय सेवा आणि पोलीस पदक उत्कृष्ठ  सेवा यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते. दरम्यान, देशातील विविध राज्यांतील सुरक्षा दलाला ही पदके जाहीर झाली आहेत.  महाराष्ट्र पोलीस दलाला 13 शौर्य पदके, विशेष उल्लेखनीय सेवेची 4 तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 40 अशी एकूण 57 पदके मिळाली. 

..... तर रेशन होणार बंद !

  रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्यावे जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन; न केल्यास फेब्रुवारीचे धान्य मिळणार नाही सोलापूर: जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.             सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनांक 14 डिसेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांचे स्वस्त धान्य दुकानामध्ये आधार व मोबाईल लिंकिंगचे काम सुरू आहे. पुणे विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन लिंकिंगचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घे...

अभिनेता वरुण धवन लग्नाच्या बेडीत

अभिनेता वरुण धवनने अखेर त्याची लहानपणापासूनची मैत्रीण नताशा दलाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. रविवारी अलिबाग येथील एका रिझॉर्टवर या दोघांचा विवाहसोहळा अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थित सर्वांना कोव्हिड-19 चाचणी करणे सक्तीचे होते, अशी माहिती मिळते आहे. यावेळी वरुणने डिझाईनर कुणाल रावलच्या कलेक्शनमधली शेरवानी घातली होती तर नताशासुद्धा मनीष मल्होत्राने खास तयार केलेल्या लहंगामध्ये दिसली. वरुणने त्यांच्या लग्नाचे फोटो ‘Life long love just became official अर्थात ‘आयुष्यभराच्या प्रेमावर शिक्कामोर्तब’ अशा कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहेत.

NFRA मध्ये विविध जागांसाठी भरती

पदाचे नाव : कार्यकारी संचालक, चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पद संख्या : 26 जागा वयाची अट : 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. NFRA Bharti 2021 नोकरीचे ठिकाण : दिल्ली NFRA Recruitment अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अर्ज पाठविण्याचा पत्ता : सेक्रेटरी एन.एफ.आर.ए., 7 वा मजला हिंदुस्तान टाइम्स हाऊस, के.जी.मार्ग, नवीन दिल्ली – 110001 अर्ज करण्याची मुदत : दि. 11 आणि 12 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) ई-मेल पत्ता : manager-admn@nfra.gov.in अधिकृत वेबसाईट : https://nfra.gov.in/ 

DRDO मध्ये नोकरीची संधी

पदाची  सविस्तर माहिती : ● Graduate apprentice trainees - 80 जागा ● Diploma apprentice trainees - 30 जागा ● ITI apprentice trainees - 40 जागा वय मर्यादा  : खुला वर्ग - 27  वर्ष , OBC - 30 वर्ष, SC/ ST - 32 वर्ष नोकरीचे ठिकाण : बेंगळुर वेतन : 9000  रुपये अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि.29 जानेवारी 2021 ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा. अधिकृत वेबसाईट :  येथे क्लिक करा

"सांगलीमध्ये अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न."

सांगली/सुहेल सय्यद               सांगलीमध्ये नुकतीच अल्पसंख्यांकांची संविधानिक हक्क व अधिकार या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली, या कार्यशाळेचे आयोजन अल्पसंख्यांक कल्याण समन्वय समिती, सांगली शाखेतर्फे करण्यात आले होते.             कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे अभ्यासक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. विनोद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष झाकीर भाई शिकलगार हे लाभले.               संविधानाची प्रस्तावना वाचून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली; यावेळी बोलताना डॉक्टर विनोद पवार म्हणाले, भारतीय संविधानाच्या कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांना मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत, या अधिकारांचा वापर करून अल्पसंख्यांक समाजाने त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास साधून घेतला पाहिजे. आज संविधानाच्या मूल्यावर घाला घालण्याचे काम काही जातीयवादी संघटना करीत आहेत. अशावेळी अल्पसंख्यांकांनी आपले संविधानिक  हक्क व अधिकार जाणून घेऊन समाज...

पट्ट्या पडला पण अनेकांची मन जिंकून गेला

प्रतिंनिधी- आपण निवडणुकीत हरल्यानंतर हताश, निराश होतो. मात्र, लातूरमध्ये निवडणुकीत पराभूत झालेल्या एका युवा उमेदवाराने केलेले कृत्य बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी गावचा विकास शिंदे या युवकाने  काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशीब आजमावले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण गावातून विकास शिंदेला केवळ 12 मते मिळाल्याने त्याचा पराभव झाला.  तरीही त्याने निराश न होता त्याला मतदान करणाऱ्या 12 मतदारांचे गावात बॅनर लावून आभार व्यक्त केल्याने तो सोशल मीडियावर कमालीचा चर्चेचा विषय ठरला आहे.   दरम्यान, त्याने बॅनर उभारुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॅनरवर लिहिलेला मजकूर सर्वांना आश्चर्यचकित करणारा असून सध्या सोशल मीडियावर त्याचा हा बॅनर मोक्कार व्हायरल होत आहे. 

विद्यार्थी चळवळ काल आज आणि उद्या - एक चिंतन

  विद्यार्थी चळवळ काल आज उद्या   स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थी चळवळ     नामवंत तत्त्ववेत्ता प्लेटो याने अडीच हजार वर्षांपूर्वी असे म्हटले आहे की राजकारणाचा गैरवापर करून गोरगरिबांचे शोषण करणारा , अन्याय अत्याचार करणारा , गरिबाला अधिक गरीब व श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा शासक वर्ग मला मान्य नाही तर विद्यार्थ्यांनीच शिक्षण घेऊन , चिकित्सक राहून राजकारण करावे व अशाच नवतरुणांना गल्लीपासून देशा पर्यंतचे शाषक बनवावे. त्यानंतर आधुनिक काळात राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी म्हटलेय की दारिद्र्य , विषमता व अंधश्रद्धा या व अशा स्वरूपाच्या सर्व समस्यांचे मूळ समाजाच्या अडाणीपणातच आहे.हे अडाणीपण , अज्ञान नष्ट करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरं कोणतही बलवत्तर साधन नाही. म्हणूनच देशाला तिमिरातून तेजाकडे म्हणजेच प्रकाशाकडे न्यायचे असेल तर उद्याचे भविष्यकर्ते म्हणजेच विद्यार्थी व त्यास योग्य दिशा प्राप्त करून देणारे शिक्षण याला मानवी जीवनात खूप महत्त्व आहे.घडलेल्या इतिहासाचा व सध्याच्या भोवतालच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक , सांस्कृतिक , भौगोलिक परिस्थितीचा स्वतःच्या अनुकरणातू...

IPS कृष्ण प्रकाश यांना आयर्नमॅनचा पुरस्कार : वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवला

सांगली/सुहेल सय्यद  पोलिस दलातील पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS कृष्ण प्रकाश यांच्या नाव आता 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' नोंदवले गेले. त्यांनी 2017 साली जगातली सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी 'आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस' ही स्पर्धा जिंकली होती. अशी कामगिरी करणारे ते भारतातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत. भारतीय सैन्य, निमलष्करी दल किंवा पोलीस सेवेतील हे पहिलेच आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे. फ्रान्समधील आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस ही स्पर्धा अत्यंत अवघड अशी आहे. यामध्ये 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे असे प्रकार केवळ 16 तासात पूर्ण करायचे असतात.  यामध्ये खूप कमी लोकांनां यश येते. ही स्पर्धा जिंकण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. यावेळी तासगांव चे सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक निसार मुल्ला यांनी कृष्णप्रकाश यांच्या यशाबद्दल यांचा सत्कार केला. व निसार मुल्ला यांनी देखील पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णप्रकाश यांनी यांचा सत्कार केला. व कौतुक करून पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

📣 स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 6 हजार 506 जागांसाठी भरती

  ▪️परीक्षेचे नाव :  ● स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020

सिरम इन्स्टिट्यूट येथील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री आज करणार पाहणी

  मुंबई : सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अदर पुनावाला यांच्याशी संवाद केला असून आज  शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे आग लागलेल्या युनिटला भेट देऊन पाहणी करणार आहेत.  दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. दुपारी 3.30 च्या  सुमारास हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील.

24 जानेवारीला होणार , कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन व विकिस्त्रोतात वाचकार्पण ,परिसर शास्त्रज्ञ, पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते कार्यक्रम    सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे वाचकार्पण करण्याचा सोहळा परिसर शास्त्रज्ञ पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते रविवार, दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी11 वाजता ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.   मराठी भाषा पंधरवड्याच्या अनुषंगाने विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने या प्रकाशन व वाचकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,  अशी माहिती विद्यापीठातील  सामाजिक शास्त्रे संकुलांचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.  सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभणार आहे. झूम अॅपव्दारे हा प्रकाशन व वाचकार्पण सोहळा होणार असून त्यात मह...

भारत सरकार मिंट्समध्ये विविध पदांसाठी भरती

1) Supervisor - 10 जागा  पात्रता -  Diploma in Engineering वयाची अट - 18 ते 30 वर्ष वेतन - 26,000 ते  1,00,000 रुपये 2) Engraver III - 6 जागा पात्रता - Bachelor of Fine Arts with at least 50% marks. वयाची अट - 18 ते  28 वर्ष वेतन - 8,500 ते  20,850 रुपये 3) Junior Officer Assistant - 12 जागा  पात्रता - Graduates with at least 50% marks. वयाची अट - 18 ते 30 वर्ष वेतन - 8,350 ते  20,470 रुपये 4) Junior Bullion Assistant - 10 जागा पात्रता - Graduates with at least 50% marks and Computer Knowledge with typing. वयाची अट - 18 ते 30 वर्ष वेतन - 8,350 ते  20,470 रुपये 5) Junior Technician -16 जागा  पात्रता - ITI Certificate in Electronic Trade वयाची अट - 18 ते 25 वर्ष वेतन - 7,750 ते  19,040 रुपये शुल्क : ● Un-reserved, EWS & OBC Categories - 600 रुपये ● SC / ST / PWD Applicants - 200 रुपये नोकरीचे ठिकाण : Kolkata अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत* : दि. 19 फेब्रुवारी 2021 ऑनलाईन अर्ज करा :  येथे क्लिक करा.  अधिकृत वेबसाईट : ...

एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळून आल्यास काय घ्याल दक्षता ?

  मारापूर परिसर सतर्क भाग घोषित जिल्हाधिकारी शंभरकर यांची घोषणा सोलापूर -: जिल्ह्यातील मारापूर ता. मंगळवेढा येथील पक्षी बर्ड फ्लू सदृश रोगाने मरण पावल्याने हा परिसर नियंत्रित क्षेत्र तर मारापूर लगतच्या 10 किलोमीटर परिसर सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित  केला  आहे. कार्यक्षेत्रात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. संबंधित तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने सर्व कुक्कुट फार्म, परसातील कुक्कुट पक्षांची तपासणी करावी. पक्षी मृत झाल्यास नियंत्रण कक्षाला (9822809064, 9527769179) माहिती द्यावी. कुक्कुट पालकांनी पक्षी मृत अथवा आजारी असल्यास तालुका पशुसंवर्धन अधिकारी (7083175999, 9049394733) संपर्क करावा.  काय घ्याल दक्षता-        एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळून आल्यास मृत पक्षांच्या संपर्कात अन्य पक्षी किंवा प्राणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी. ·         आजारी पक्षाची वाहतूक किंवा विक्री करू नये. ·         सतर्क क्षेत्रात...

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

20 जानेवारी 2021 1. मेष : लहानांशी मैत्री कराल. जवळचा मित्र परिवार गोळा कराल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. जुन्या कामातून धनलाभ संभवतो. 2. वृषभ : योग्य ठिकाणी कल्पकता दाखवावी. व्यवसायाचे सखोल ज्ञान घ्यावे. व्यवहारचातुर्य ठेवावे लागेल. 3. मिथुन : अंगीभूत कलेचे मूल्यमापन केले जाईल. लिखाणास प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तप्रियता दाखवाल. 4. कर्क : स्मरणशक्तीला ताण द्यावा. दिवसभर विचारात गर्क राहाल. तुमच्या अनुमानास निश्चिती येईल. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. 5. सिंह : व्यापारात चांगला फायदा होईल. जोडीदाराशी गप्पा गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. कामातून समाधान शोधाल. 6. कन्या : जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मनातील चुकीचे विचार बाजूस सारावेत. नसत्या भांडणात पडू नका. त्वचा विकार जाणवू शकतात. 7. तूळ : नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा दर्शवाल. जरूर नसतांना उदारपणे वागू नका. डोळ्यांचे त्रास संभवतात. 8. वृश्चिक : जवळचे नातेवाईक भेटतील. मित्र-परिवाराबरोबर गप्पांमध्ये रमाल. उष्णतेचा त्रास संभवतो. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. 9. धनु : योग्य तर्क वापरावा लागेल. वक्तृ...

दहावी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी पोस्टात चालक पदासाठी भरती

  पद  व जागा : स्टाफ कार ड्रायव्हर I 12 जागा ( 4 पदे ओबीसी आणि 1 पद एससी, एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव) पात्रता व इतर  :  1) संबंधित उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.   2) या पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.   3) उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यातून पास होणाऱ्या उमेदवारांची या पदासाठी नियुक्ती केली जाईल.   4) मासिक वेतन : 19,900 रुपये  अर्ज पाठवण्याची मुदत : दि. 10 मार्च 2021 अर्ज पाठवण्याचा पत्ता :  'द सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, एस.के.अहिरे मार्ग, वरळी, मुंबई - 400018'  अधिक माहिती आणि अर्ज : येथे क्लिक करा

SBI मध्ये 'या' पदांसाठी थेट मुलाखत

   SBI मध्ये 'या' पदांसाठी थेट मुलाखत पदाचे नाव : फायर इंजिनीअर संख्या  : 16 जागा पात्रता : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून BE  किंवा UGC / AICTE मान्यता प्राप्त संस्थेतून बीटेक पास  वयाची अट : 40 वर्ष शुल्क : GEW ,EWS  आणि OBC  उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 750 रुपये आहे. SC,ST आणि दिव्यांगासाठी फी नाही.  वेतन : 23,300 रुपये ते 42,020 रुपये प्रति महिना. अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 27 जनवरी 2021 (मुदतवाढ)  मुदतवाढ झालेली पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-: https://bit.ly/3ijx6J5  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा.- : https://bit.ly/3suwsgq अधिकृत वेबसाईट :https://bit.ly/38RqIFP

कवठे एकंदमध्ये चुरशीने 81.34 मतदान.

सांगली/सुहेल सय्यद      सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने 81.34 मतदान झाले. प्रशासनाच्या चोक नियोजनामुळे व पोलिसांच्या बंदोबस्तामुळे सहाही वार्ड मध्ये शांततेत मतदान पार पडले. दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रात मतदानासाठी लोकांची गर्दी होती. 

हजरत सुब्हानी मेमोरियल ट्रस्ट व श्री रत्ना बहुउद्देशीय सेवा संस्था तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सांगली/सूहेल सय्यद सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये शाहि ईदगाह येथे हजरत सुब्हानी मेमोरियल ट्रस्ट यांचे सुब्हानी क्लिनिक व श्री रत्ना बहुउद्देशीय सेवा संस्था यांचे श्री रत्ना मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्यावतीने सर्वरोग निदान मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कांबळे, नगरसेवक संदीप आवटी, व सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांच्या हस्ते झाले.      आरोग्य शिबिरामध्ये 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली व पुढील उपचार सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. डॉ.गुरु बगली व डॉ. मोहम्मद उस्मान अली यांनी रुग्णांची तपासणी करून केले मोफत औषधे दिले.      यावेळी संजय देशींने, संतोष बामने, उमेश पवार, राम बिरादार, सामाजिक कार्यकर्ते महबूब आली मणेर, नजीर झारी, निहाल मनेर, मुक्ती सुफियान, तोहिद मोमीन, युनुस शेख ,हसन मोमीन ,शब्बीर मोमीन ,आसिफ मनेर ,जाफर  पिरजादे, सलीम मलिक , नूरज़हाभाभी मनेर, डॉ.आलासे व डॉ.युनुस मंगळवारे उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरणाबाबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लसीकरण समन्वयक डॉ.अनिरुद्ध पिंपळे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.बिरुदेव दुधभाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार आदी उपस्थित होते. पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 16 केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी ग्रामीण भागात बारा तर सोलापूर शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात एक...

आधार-मोबाईलशी लिंक न केल्यास फेब्रुवारीपासून धान्य मिळणार नाही

सोलापूर दि.12:- शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंकींग करुन घ्यावा. जे लाथार्थी मोबाईल आणि आधार क्रमांक लिंक करणार नाहीत त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून धान्य मिळणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी कळवले आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, शिधापत्रिकेत नोंद असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक 31 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा योजनेतील 82 टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे. मात्र काही लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बदलले आहेत.  अशा कार्डधारकांनी आपले स्वस्त धान्य दुकानदार आणि परिमंडळ कार्यालय अ,ब,क,ड,येथे संपर्क साधून लिंकीग करुन घ्यावेत.

CISF मध्ये असिस्टंट सबइन्स्पेक्टर पदासाठी भरती

  CISF मध्ये 690 जागांसाठी भरती पदाचे नाव : असिस्टंट सबइन्स्पेक्टर पदसंख्या : 690 जागा पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. उमेदवारांनी नियमित सेवेची पाच वर्षे पूर्ण करावीत ज्यात ग्रेड / 5 वर्षात मूलभूत प्रशिक्षण. यासह कॉन्स्टेबल / जीडी, हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / टीएम म्हणून एकत्रित नियमित सेवांचा समावेश असेल. शारीरिक पात्रता : ● पुरुष - 170 cm ● महिला -  157 cm ● छाती - 80 – 85 cm ● वयाची अट - 35 वर्ष नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.  अर्ज पद्धती : ऑफलाईन. अर्ज करण्याची मुदत :15 फेब्रुवारी 2021 अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

अनुष्का-विराटला कन्यारत्न...!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांना मुलगी  झाली आहे. विराटने ट्विटरद्वारे ही माहिती सांगितली आहे.आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातुन मायदेशी परतला होता. भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे.अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत असून आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे, आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल असे ट्विट विराटने केले आहे. 

सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश

  सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश  सोलापूर: कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्री (दि. 12 जानेवारी )  12 वाजल्यापासून ते 17 जानेवारी 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत.             डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक)- मंगळवेढेकर इन्स्टिटयुट कॉर्नर- हरिभाई देवकरण प्रशाला समोरील रस्ता- स्ट्रीट रोड- सिद्धेश्वर कन्या प्रशाला समोरील रस्ता-वनश्री नर्सरी विष्णू घाट- गणपती घाट- सरस्वती कन्या प्रशाला- भूईकोट किल्ल्याचा आतील परिसर- चार पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक)  अशा ठिकाणांसह आतील सर्व परिसरात संचारबंदी आदेश लागू राहील. परिसरातील रहिवाशांना संबंधित पोलीस ठाण्याकडून प्रवेशासंबंधात रहिवाशी पुराव्यासह पास प्राप्त करुन घ्यावे लागतील. इतर बाहेरील व्यक्तींना परिसरात प्रवेशास मनाई असेल. मंदिर परिसर भागात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या शासकीय वाहनास प...

ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती

ऑफिसिअल लँग्वेज विंग , लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट , मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टीस मध्ये सरळ सेवेने स्वीय सहायक पदावर भरती एकूण ५ रिक्त पदे  १. स्वीय सहायक (उर्दू) - १ (अनु. जमाती) २. स्वीय सहायक (कोकणी) - १ (अराखीव ), ३. स्वीय सहायक (नेपाळी) - १ (आर्थिक दृष्ट्या मागास), ४. स्वीय सहायक (संथाळी) - १ (अराखीव ), ५. स्वीय सहायक (तामिळ) - १ (इतर मागास वर्गीय) १. आवश्यक शैक्षणिक पात्रता - १२ वी पास  समकक्ष  २. १० मि .डिक्टेशन - १०० श. प्र . मि  ३. प्रादेशिक भाषेत ५५ मी. मध्ये डिक्टेशन  संगणक धारकास प्राधान्य  ४. इष्ट शैक्षणिक पात्रता - इंग्लिश टंकलेखन ३५ श. प्र . मि    वय : ३० वर्षापेक्षा जास्त नसावे   अनु . जाती /जमाती करीता ५ वर्षे शिथिल  इतर मागास वर्गीय करीता ३ वर्षे शिथिल  अधिक माहिती साठी संकेत स्थळ -  http://legislative.gov.in/docements/recruitment जाहिरात पाहा-  https://s3.ap-south-1.amazonaws.com/rojgar.mahaswayam.in/user_uploads/admin/news/5ff6dcf9def7c.pdf