सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे ‘ जागर पत्रकारितेचा’ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त माध्यम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा समारोप कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना मिळावे या उद्देशाने दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने अशा माध्यम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात व्याख्याने, कार्यशाळा यांचा समावेश असतो. यावर्षीही 1 जानेवारी ते 6 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने हा माध्यम सप्ताह साजरा होणार आहे. यात मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. 1 जानेवारी रोजी ‘ऑनलाईन पत्रकारिता’ या विषयावर मयूर गलांडे ( लोकमत, मुंबई), ‘पर्यावरण पत्रकारिता’ या विषयावर तरुण भारत संवाद चे संपादक रजनीश जोशी ( सोलापूर) यांची व्याख्याने होणार आहेत. 2 जानेवारी रोजी ‘संपादकीय पानाचे महत्व’ विषयावर तरुण भारत सोलापूरचे ...
ABS News Marathi Latest News in Marathi, मराठीतील टॉप हेडलाईन्स, Breaking News in Marathi, आजच्या मराठी बातम्या, मराठी लेटेस्ट न्यूज, आजच्या महत्त्वाच्या बातम्या, लेटेस्ट मराठी न्यूज - ABS News Marathi ABS News Marathi: Latest Marathi News Headlines - news covers Latest Marathi News including Maharashtra, India, Solapur, ahmednagar Mumbai, Pune & all