बार्शी (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन काळात बार्शीतील उडान फाऊंडेशनने यावर्षीचा होणारा रमाजान ईदवरील खर्च टाळून गरजू कुटुंबांना किराना किटचे वाटप करून ईद साधेपणाने करणार असल्याचा संदेश दिला.
प्रतिवर्षी उडान फाऊंडेशन व
फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव जमील खान, उद्योजक युन्नुस् शेख, शब्बीर वस्ताद, शोएब काझी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ ईदसाठीचे लागणारे साहित्य गेली पाच वर्षे बार्शीतील गरीब कुटुंबांना वाटप करते. परंतू यावर्षी नायब तहसीलदार संजीवन मुंढे व पुरवठा अधिकारी ऋषिकेश धनवडे यांच्या हस्ते किराणा किटचे सामान देऊन सुरवात करण्यात आली.
यावेळी मंडळाचे सचिव जमील खान यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, फाऊंडेशनने लॉकडॉऊन जाहीर झाल्यापासून बार्शीतील सर्वधर्मिय पाचशे कुटुंबांना आतापर्यंत किराणा मालाचे किट दिले आहेत. तसेच भगवंत अन्नछत्रालय, आंधळकर अन्नछत्रालय, ऍड.असिफभाई तांबोळी अन्नछत्रालय यांना देखील मदत केली असल्याचे सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, उद्योजक युन्नुस् शेख, शकिल मुलाणी, शोएब काझी, शब्बीर वस्ताद, वसीम मुलाणी, हाजी शिकवलकर, तौसीफ बागवान, अल्ताफ शेख, मोईन, सादिक, अय्यूब शेख, बाबा शेख, रॉनी सय्यद, जिलानी शेख, मोहसीन पठाण, साजन शेख, मुन्ना बागवान, अबू शेख व इकबाल शेख यांनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment