महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 43 दवाखान्यांचा समावेश जिल्ह्यात आतापर्यंत 705 कोरोना रूग्णांनी घेतला लाभ
सोलापूर : राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा प्रारंभ केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही योजना सर्वांसाठी खुली असून सोलापूर जिल्ह्यात 43 दवाखान्यात या योजनेचा लाभ 705 रूग्णांना मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तसेच रूग्ण गंभीर असेल तरच या योजनेतून मोफत उपचार मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे नि:शुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 8 लाख 13 हजार 278 कुटुंबांना योजनेचा लाभ मिळू शकतो. 2 जुलै ते 26 जुलै 2020 पर्यंत आतापर्यंत 1 लाख 56 हजार 954 रूग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, यामध्ये 705 रूग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे योजनेच्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला जगताप यांनी सांगितले. कोविड-19 साठी जिल्ह्यातील दवाखाने अधिग्रहित केले आहेत. यामध्ये 80 टक्के बेड हे ...