Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

आरंभ संस्थेच्या वतीने PMT कर्मचाऱ्यांचा सत्कार

प्रतिनिधी/पुरूषोत्तम विष्णु बेले -भेकराई नगर व शेवाळवाडी येथील बस डेपोमधील पीएमटी कर्मचारी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता प्रवाशांची सेवा करीत आहेत. आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यकारणी सदस्य मयूर महाबोले यांच्या हस्ते या सेवेबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागनाथ कारंडे पीएमटी डेपो मॅनेजर भेकराईनगर व शेवाळवाडी, नितीन निकंबे व पीएमटी चालू झाल्यापासून वाहक, चालक परमेश्वर कराड एकही सुट्टी न घेता ड्युटीवर कार्यरत होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात डॉक्टर, पोलीस सफाई कामगार यांच्यासोबत आम्हा कर्मचाऱ्यांची दखल घेत आरंभ संस्थेनी आम्हाला यापुढेही सातत्याने काम करण्यास प्रोत्साहन दिले. याबद्दल भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी आरंभ संस्थेचे आभार मानले.

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : कामामध्ये अतिदक्षता बाळगा. आपल्या विचारांशी ठाम रहा. इतरांना मदत करून समाधान मिळेल. कार्यक्षेत्रात झालेला बदल स्वीकारावा लागेल.  2. वृषभ : आपण हातात घेतलेले काम पूर्ण होईल. इतरांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल.  3. मिथुन : आपला निर्णय इतरांवर लादू नका. उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.  4. कर्क : अडकलेली येणी वसूल होतील. समोरच्या व्यक्तीचा आदर करावा. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. अपचनाचा त्रास संभवतो. 5. सिंह : नवीन गोष्टींचे दडपण घेऊ नका. आपला आत्मविश्वास जागृत ठेवावा. मुलांच्या जबाबदार्‍या सक्षमतेने पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवावे. 6. कन्या : कामाचा आधी संपूर्ण अभ्यास करावा. गरज वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल.  7. तूळ : मनातील विचार इतरांना बोलून दाखवा. अडचणीच्या काळात मनातील व्यक्ती साथ देईल. उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल.  8. वृश्चिक : ठामपणे आपले व...

अवैध धंद्याच्या विरोधात SFI-DYFI ची 1 लाख सह्यांची मोहीम

  सोलापूर/शाम आडम : सोलापूर शहर अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेला आहे. याला इथले लोकसेवक, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याशी मिलिभगत असणारी प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. समाजाला अवैध धंद्यांचे विष पाजणारे लोक स्वतःला समाजसेवक संबोधतात. हीच या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. या अवैध धंद्यांच्या विळख्यातून श्रमिकाला कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी लोकप्रबोधनाची गरज आहे. म्हणून अवैध धंद्यांच्या विरोधात 2 ऑक्‍टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) तसेच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ(DYFI) च्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना समक्ष भेटून देणार असल्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे मंगळवारी (ता. 29) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माकपचे ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार श्री. आडम (मास्तर) बोलत होते.  श्री. आडम पुढे म्हणाले, ही लांब पल्ल्याची लढाई असून जनतेला विश्वासात घेऊन आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा पवित्रा अधिक आक्रमक करणार आहोत. सोलापूर हे कष्टकरी कामगारांचे ...

मराठवाडा विद्यापीठानं पुढे ढकलल्या परीक्षा, यामुळे ओढवली नामुष्की!

  प्रतिनिधी/अक्षय वायकर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू होणार होती. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार, 1 ऑक्टोबर 2020 पासून अंतिम वर्षाच्या परीक्षा निश्चित करण्यात करण्यात आल्या होत्या. परंतु विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐन परीक्षेच्या तोंडावर लेखणी बंद आंदोलन सुरू केल्यामुळे परीक्षा नियोजित तारखेला सुरू करणं, शक्य नाही. 1 ऑक्टोबरला सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे, अलं परीक्षा व मूल्यमापन मंडळानं सांगितलं आहे.

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

मेष : माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल.   वृषभ : हातातील कामाला यश लाभेल. शेजार्‍यांची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.  मिथुन : नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते.  कर्क : काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसर्‍याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक.  सिंह : इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करू शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल.  कन्या : आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा. लपवाछपवी च्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल.  तूळ : स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल.  वृश्चिक : आग्रहाला बळी पडू नका. मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. ...

बाबुराव चव्हाण यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा

नळदुर्ग/पुरोषत्तम बेले  - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य बाबुराव (भाऊ) मधुकरराव चव्हाण  यांचा  वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.   राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र व अणदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य बाबुराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश जगदाळे यांच्या स्मरणार्थ आशिष जगदाळे यांच्यावतीने होर्टी ता. तुळजापूर येथील होतकरू व गरीब कुटुंबातील रितेश रणसुरे व रुपेश गायकवाड या दोन विदयार्थ्याना महत्वकांक्षी विदयार्थी दत्तक कार्यक्रमात  आशिष जगदाळे यांच्यावतीने  दत्तक घेण्यात आले. यावेळी  दत्तक घेण्यात आलेल्या विदयार्थ्यांना जीवनावश्यक वस्तु, किराणा माल ,कपडे आदीसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. होर्टी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास  होर्टीचे विद्यमान सरपंच संजय गुंजोटे, नळदुर्ग शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले ,अनिल भोसले, कै. देवरावजी चव्हाण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, शाम कनकधर  ,सचिन मुळे, अमर पिच्चे, सुधाकर गायकवाड, विशाल मोटे ,योग...

SFI च्या वतीने भगतसिंग जयंती साजरी

सोलापूर - SFI सोलापूर जिल्हा कमिटी च्यावतीने आज 28 सप्टेंबर 2020 रोजी शहिद भगतसिंग जन्मदिनानिमित्त एसएफआय कार्यालय समाजमंदिर येथे अभिवादानाचे कार्यक्रम घेण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता सुरेश गायकवाड व उमेश तुम्मा यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.              कार्यकर्त्यांना व विद्यार्थ्यांना एस एफ आय चे माजी जिल्हा सचिव मीरा कांबळे, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहेत. सूत्रसंचालन जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी केले असून आभार प्रदर्शन सहसचिव श्यामसुंदर आडम यांनी केले.  यावेळी एसएफआयचे सहसचिव पल्लवी मासन, जि. क.सदस्य दुर्गादास कनकुंटला, पूनम गायकवाड, अश्विनी मामड्याल, प्रशांत आडम, लक्ष्मी रच्चा, अनिल बोगा, श्री आसादे, लक्ष्मीकांत कोंडला, प्रकाश म्हैत्रे, भावेश येदूर, युवराज सिरसाल, स्वप्नील  येदूर, निकील चिंताकिंदी, गौतम चिंताकिंदी, वरुण येमुल, चरण येमुल इ. विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगवी येथील कृषिकन्येने बनवलेल्या व्हिडिओची शेतकऱ्यांना होतेय मदत

                            डॉ. ज्योती झीरमिरे यांच्या यूट्यूब चॅनल चा स्तुत्य उपक्रम उस्मानाबाद:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात प्रचंड पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकाच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी ऑनलाइन दाखल करण्याचे निर्देश जिल्हा कृषी अधीक्षक व विमा कंपनी ने दिले आणि सर्व शेतकऱ्यांची अर्ज करण्याची घाई सुरू झाली. पण अँप नेमके कसे वापरायचे याविषयी खूप शेतकऱ्यांना अडचणी होत्या. ही अडचण ओळखून सांगवी ता. उस्मानाबाद येथील कृषिकन्या डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमीरे यांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक माहितीपर व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियात प्रसारित केला. सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत हा व्हिडिओ आहे, त्यामुळे दोन दिवसात तब्बल १ हजार शेतकऱ्यांकडून तो पाहिला गेला आहे. डॉ. ज्योती या शासकीय कृषी महाविद्यालय उस्मानाबाद येथिल बीएससी एग्रीकल्चर च्या माजी विद्यार्थिनी आहेत. नंतर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी , अंतर्गत शासकीय कृषीमहाविद्यालय  लातूर येथून एम ...

सिंदखेड राजा तालुक्याला मिळालेले नवे जय भगवान महासंघ चे तालुकाध्यक्ष

सिंदखेड राजा /बालाजी सोसे - सिंदखेड राजा तालुक्यामध्ये जय भगवान महासंघाचे नवे तालुकाध्यक्ष श्री माननीय जगन्नाथ उर्फ सोनू  विश्वनाथ घुगे यांचे आज देऊळगाव मही येथे नियुक्ती करण्यात आली .त्यावेळी उपस्थित श्री माननीय शंकरराव उगलमुगले जय भगवान महासंघाचे विदर्भाचे अध्यक्ष, तसेच श्री माननीय सिद्धेश्वर आंधळे जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष ,गणेश भाऊ मुंडे जय भगवान महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ,दीपक भाऊ कायंदे पोलीस पाटील सोनदेव ,उमेश भाऊ सोसे दैवत फाऊडेशनचे विदर्भ उपाध्यक्ष, हे उपस्थित होते त्यावेळी उगलमुगले साहेब आंधळे साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि जय भगवान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यावर विश्वास ठेवून मी संघटनेचे पूर्णपणे काम करणार समाजासाठी एकनिष्ठा ने समाजाच्या पाठीमागे उभी राहणार असा विश्वास जगन्नाथ ऊर्फ सोनू यांनी विश्वास दिला आणि मान्यवरांचे आभार मानले. 

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता

तुळजापूर/अक्षय वायकर  : पर्यटक व इतिहासप्रेमी नागरीक आतुरतेने वाट पाहणा-या किल्ल्यातील नरमादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या पर्यटकांसाठी किल्ला बंद आहे.  गेल्‍या दोन आठवडयापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत  असून नळदुर्ग येथिल कुरनुर मध्यम (बोरी  धरण) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होवुन शनिवार पर्यंत 95 टक्के पाणी साठा झाला आहे. दरम्यान, पहिल्यांदाच सलग दुस-या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.   दि. 26 सप्‍टेंबर अखेरपर्यंत जवळपास 623 मिलीमीटर पाऊस झाल्‍याची नोंद झाली आहे. लवकरच नळदुर्ग येथील बोरी धरण भरण्‍याच्‍या मार्गावर असून हे धरण भरल्‍यास ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील ''नर-मादी'' हा धबधबा सुरु होण्‍याची शक्‍यता नागरिकांतून व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे इतिहासप्रेमी नागरिक व पर्यटक नर-मादी धबधबा वाहण्‍याची आतुरतेने वाट पाहत आहे.  नळदुर्ग येथील कुरनुर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या पाणलोट क्षेत्रात शुक्रवार रोजी दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बोरी धरण पाण्...

पंकजाताई मुंडेंना भाजपच्या केंद्रिय कार्यकारणीत मोठं पद , ही जबाबदारी सोपवली

बीड/गजानन अघाव  : बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तथा माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे . नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीत पंकजाताईचं मोठ्या पदावर नाव घेण्यात आल आहे . भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा . जगत प्रकाश नड्डाजी यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीमध्ये पकजात मुंडे यांना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे .

संविधान आणि संविधान मधील मूलभूत अधिकार सोप्या शब्दात समजावून सांगणारे त्यामधील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे मानवाधिकार वकील असीम सरोदे

संविधान हे किती महत्वाचे आहे, संविधान अनुच्छेद कुठले, कुठे आणि कसे ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि भविष्यासाठी कसे वापरता येतात हे आपल्या दैनंदिन जीवनाच्या उदाहरणावरून सामान्य माणसाला तसेच शिक्षण न झालेल्या माणसाला सुद्धा सोप्या पद्धतीने समजून सांगणारे मानवाधिकार वकील असीम सरोदे आहेत.त्यांच्या कडून संविधान जनते साठी कसे वापरायचे आणि जनतेला कसे जामजावून सांगायचे  हे मी आणि अनेक महाराष्ट्र मधील नागरिक शिकले आहेत .   संविधान मधील अनुच्छेद २१ जीवन जगण्याचा अधिकार आणि  सन्मानाने जीवन जगणाच्या अधिकार तसेच व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे आपल्याला संरक्षण कसे आहे हे उदाहरणावरून समजावून बार्शी  मधील कर्मवीर जगदाळे मामा व्याख्यानमाला मध्ये त्यांनी सांगितले होते. त्याचाच अनुभव बघून मी बार्शी मधील अनेक वर्षे खराब रस्त्याची अवस्था याची तक्रार मानवाधिकार आयोगाला केली होती. छोट्या छोट्या गोष्टी जीवनाशी आणि मानवाच्या आधिकाराशी  निगडित आहे हे मी त्यांच्या कडून ऐकले होते त्यावरून रस्ता हा मूलभूत अधिकार आहे. खराब रस्त्यामुळे होणारे परिणाम आणि त्याचा परिणाम समाजाच्या जीवन...

लोकसहभागातून खंडाळी येथील स्मशानभूमीचा केला जात आहे विकास

ऑगस्ट महिन्यामध्ये खंडाळी येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करून त्यास जैविक कुंपण बसवल होतेे. गावातील सार्वजनिक कामासाठी प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी आव्हान केल्यानंतर गावाचा शाश्वत विकास कशामध्ये आहे या गोष्टी सर्वांच्या लक्षात येत आहेत. आज श्री. वंसतराव बाबासाहेब पौळ *  बजाज यांनी अँड विजयकुमार शेळके* यांनी  स्मशानभूमी येथे बसण्यासाठी बैठकी सीट बसवल्या आहेत.  याप्रसंगी  चेरमन श्री. व्यंकट पाटील , श्री.मोतीराम पौळ श्री. माधव  माने, श्री.नवनाथ पौळ  मेघराज पौळ,  पापा मिठापुरे  ,कालु रजाक शेख ,प्रा. दशरथ पौळ, यांची उपस्थिती होती.  अशा पद्धतीने सर्वांनी वस्तू व कामाच्या स्वरूपात योगदान दिले तर नक्कीच हळूहळू का होईना परिवर्तन होत जाईल  गावातील सर्व मंडळी सार्वजनिक कामात लोकसहभाग नोंदवत स्वेच्छेने नोंदवत आहेत हीच गोष्ट खंडाळी करासाठी अभिमानाची आहे. गावातील सर्व मंडळी सार्वजनिक कामात लोकसहभाग नोंदवणार नाहीत तो पर्यंत सरकारी कामात पारदर्शकपणा व गतिशीलता  येणार नाही. गावकरी स्वता कामसाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत तरी सरकारने देखील दहा पाऊले पु...

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेतरांचे लेखनी-आवजार बंद आंदोलन सूरू

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समिती च्या वतिने आज दिनांक 24 सप्टेंबर 2020 पासून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी  आस्वासित प्रगती योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ द्यावा व 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा व इतर मागण्या घेवून लेखनी बंद आवजार बंद अंदोलन सुरू झाले आहे.  या वेळी अंदोलनाला सूटा, मागासवर्गीय संघटना यांनी पाठींबा दिला. यामध्ये आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर युनिव्हर्सिटी ऑफिसर फोरम, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, आणि ’चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, महाविद्यालयीन महासंघ या संघटना एकत्र येवून हे अंदोलन करणार आहेत.  यासाठी मा. कुलगुरू पु.आ.हो. सोलापूर विद्यापीठ, मा़. उच्च षिक्षण सहसंचाल व ठिकठिकाणचे मा. प्राचार्य यांना निवेदणे सादर करण्यात आली आहेत.  यावेळी बार्शीमध्ये सर्व माहाविद्यालयांच्या गेटवर अंदोलने करण्यात आली करण्यात आली.  मा. उच्च षिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी या मागण्या मान्य न केल्यास पूढे 1 आॅक्...

लवंगी येथील भैरवनाथ शुगर चे बॉयलर पूजन , 5 लाख मे टन गाळप चे उद्दिष्ट - प्रा. शिवाजीराव सावंत

हुलजंती /अमीर आतार -  भैरवनाथ शुगर सातवा गळीत हंगाम ऊस उत्पादन शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावर सुरू करत असून  कारखान्याच्या उभारी पासून या तालुक्यात व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना आतापर्यंत विश्वास दाखवला असून त्याच विश्वासावर या कारखान्याचा चालू हंगाम पाच  लाख मे टन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बॉयलर चे अग्नी प्रज्वलित करण्यात आले  प्रारंभी चंद्रप्रभा माने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली . तसेच चंद्रकांत देवकर व सौ ज्योती देवकर यांच्या हस्ते  सत्यनारायणाची पूजा करण्यात आली  याप्रसंगी व्हाईस चेअरमन अनिल सावंत अविनाश वाडेकर विहाळ युनिट कार्यकारी संचालक केशव सावंत आलेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .  पुढे बोलताना चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की कारखान्याचे संस्थापक आमदार डॉक्टर ताना...

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

पंढरपूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे  तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.सोलापूर जिल्ह्यातील  पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे  नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली.  यावेळी, आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषि अधिकारी गजानन ननवरे ,दिपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता  दत्तात्रय गावडे, महावितरणचे श्री.कासार  उपस्थित होते.  यावेळी पालकमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टिने  पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड  झाली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यातील...

उंब्रज नरसिंह या गावांमध्ये लम्पी स्कीन डिसीज या रोगाची 2 जनावरे आढळल्यामुळे एकच खळबळ

सिंदखेड राजा/बालाजी सोसे - उंब्रज नरसिंह तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या गावांमधील शेतकरी कारभारी नागरे यांचे दोन बैल बाधित निघाले . लम्पी स्कीन डिसीज या बिमारी ने एकच खळबळ उडून दिल्याने उंब्रज नरसिंह आणि गावाच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे .त्यामुळे पळसखेड चक्का येथे आज दिनांक २५/९/२०२० रोजी सकाळी दहा वाजता किनगाव राजा येथील कार्यरत असणारे अधिकारी डॉक्टर विनायक गाडेकर पशुवैद्यकीय अधिकारी दवाखाना किनगाव राजा व त्यांचे सहकारी डॉक्टर ठाकरे यांनी पळसखेड चक्का येथील परिसरामधील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना (म्हणजे बैल,  गाय ,म्हैस व इतर जनावर) लसी दिल्या आणि त्या बिमारी ची संपूर्ण माहिती दिली .आणि या बिमारी मुळे जनावराला होणारे त्रास आणि खबरदारीची कशी घ्यायची यावर सविस्तर शेतकऱ्यांशी चर्चा केली .आणि बुलढाणा लाईव्हला बोलताना त्यांनी सर्व शेतकऱ्याला आवाहन केले. काळजीपूर्वक जनावराला लस घ्या असे त्यांनी त्यावेळी सांगितले. आणि या लम्पी स्कीन डिसीज या रोगामुळे या उंब्रज नरसिंह या गावाचा परिसरामधील पाच किलोमीटर पर्यंत असणारे सर्व गावातील जनावराला लस देणार असल्याची माहिती त...

हुलजंती मध्ये ढोल बजाओ सरकार जगाव आंदोलन

मंगळवेढा/अमीर अत्तार - आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे ढोल बजावे सरकार जगाओ आंदोलन मंगळवेढा तालुक्यातील पश्‍चिम भागात सर्वात मोठे तीर्थक्षेत्र तसेच   महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून म्हणून ओळखली जाणारी सूक्षेत्र श्री. बिरोबा व महालिंगराया यांच्या पावन नगरी मध्ये  हुलजंती येथील ग्रामपंचायत समोर आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्याचे माझी.उपसभापती मा. श्री. शिवाजीराव पटाप यांनी धनगर समाज बांधवांना घेवुन ढोल बजाओ सरकार जगावो आंदोलन पार पाडली यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते, दत्ता पेटर्गे,   मंगळवेढा तालुका ग्राहक मंच तालुकाध्यक्ष अविनाश कोरे गौडाप्पा पाटील, नागेश मासाळ आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

वलगुड मध्ये पिक विमा ॲप वापरण्याचे प्रशिक्षण-शिवार संसद चा स्तुत्य उपक्रम

उस्मानाबाद:-जिल्ह्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनी कडे ऑनलाईन अर्ज ॲप मध्ये भरण्याची बळीराजाची लगभग सुरू आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येत आहेत. खूप शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन नाही, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्यांनाही वापरायला अडचणी येत आहेत. नेमके अॅप कसे वापरायचे याचे दूरध्वनी शिवार हेल्पलाइनवर येऊ लागले. या अडचणीवर कशी मात करता येईल याचा विचार करून शिवार हेल्पलाइन व उमेश घाडगे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोप्प्या शब्दात व्हिडिओ ही जिल्ह्यातील समाज माध्यमातून प्रसारित केला गेला, त्याचा असंख्य शेतकऱ्यांना फायदा ही झाला आहे.तसेच तात्काळ वेळेची गरज ओळखून जिल्हा समन्वयक अशोक कदम यांनी वलगुड (ता. उस्मानाबद) गावात जाऊन तरुण शेतकऱ्यांना एकत्र केले व ॲपमध्ये नुकसानीचा दावा कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले. यावेळी गावातील तरुण शेतकरी आवर्जून उपस्थित होते. आम्ही अॅप वापरायचे शिकू व गावातील इतर शेतकऱ्यांना वापरण्यासाठी मदत करू असे आश्वासन गावकऱ्यांनी दिले आहे. नुकसानभरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास क...

एक मराठा लाख मराठा चा नारा दिल्लीत घुमला

पंतप्रधान व राष्ट्रपती यांना आरक्षणासाठी निवेदन ,कोरोनाचे नियम पाळुन आंदोलन संपन्न दिल्ली : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर  मराठा समाज आक्रमक झाला असुन मराठा समाज थेट दिल्लीत पोहचला असुन आज दिल्लीतील जंतर मंतर मैदान याठिकाणी मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदने देण्यात आली. कोव्हीडमूळे फक्त पाच सहा जणांचा आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती.यावेळी एक मराठा लाख मराठाचा नारा दिल्लीत घुमला. राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतिने हे आंदोलन करण्यात आले. संपुर्ण देशाला आंदोलन कसे असते याची जाणुव करुन देत, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. यानंतर आरक्षण भेटले होते. याचा मराठा समाजाला मोठा फायदा होत होता. परंतु आता या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे परत मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता थेट मराठे दिल्लीत दाखल झाले असुन आज जंतर मंतर येथे राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करत विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना देण्य...

शाही़नबाग - एनआरसी विरुद्ध आंदोलन चळवळीतील महिलेचा जगातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून १०० मध्ये सहभाग

दिल्ली : प्रसिद्ध माध्यमच्या माहिती नुसार उत्तर प्रदेश येथील बुलंदशहर च्या आजी रहीवाशी असुन त्यांच्या पतीचे मागील ११ वर्षी अगोदर निधन झालेले आहे व ते शेतकरी मजुर होते पण त्या सक्षम व कणखर मजबूतीने निस्वार्थ पणे एनआरसी विरुद्ध लढाईत डगमगल्या नाहीत.  सध्या बिलकीस आजी या दिल्ली येथील त्यांच्या मुला कडे सोबत राहत असल्याची विश्वासनिय  माहिती आहे.      जगातील सर्वात प्रतिष्ठित  इंटरनेशनल मॅगजीन ‘टाइम’ च्या या वर्षाच्या जगातील १०० प्रभावी लोकांची यादी जारी झाली असून या वर्षाच्या प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून एनआरसी मधील मुख्य आकर्षक व वयाच्या ८२ व्या वर्षी ही आंदोलनाची सक्षम, दमदार, प्रभावी व प्रभावशाली ज्यांनी प्रसिद्ध माध्यमातून व नवयुवती, नवतरुण, यांना लाजवेल अशी रोखठोकपणे भुमिका घेऊन लोकशाही व सनदशीर मार्गाने नवीदिल्ली येथील शाहिनब़ाग आंदोलन बसलेल्या आजी या आजही चेहऱ्यावर आक्रमक भूमिका घेऊन सर्वांना सोबत घेऊन उपोषण स्थळी बसलेल्या आजी ची दखल घेण्यात आली वयोवृद्ध  आंदोलनांमधील आकर्षक व हिम्मत, दमदार ,  बिलकिस आजी़ यांचा जगातील १०० व्यक्ती पैकी ...

मी शेतकऱ्यांचा मुलगा ,केंद्र आणि राज्य शासनाकडे शेतकर्यांच्या भावना पोचवणार - राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भावनिक साद

मी शेतकऱ्यांचा मुलगा ,केंद्र आणि राज्य शासनाकडे शेतकर्यांच्या भावना पोचवणार शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्याना राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भावनिक साद  प्रतिंनिधी/अमीर आत्तार - प्रत्येक वेळा शासनातील लोकं सोईनुसार धोरण राबवतात.केंद्र सरकार एकीकडे जीवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते,मग दुसरीकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय का करत आहांत?असा सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी   यांच्याकडे केला.करोना लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यात बंदी निर्णय मागे घेणे आवश्यक आहे.  गेल्या काही दिवसांत झालेले शेतकऱ्यांचे झालेले  नुकसान भरून द्यावे,कारण उत्पादन खर्च पण मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे.शेतकरी विधेयकात शिवार खरेदी करताना शेतकऱ्याला आर्थिक संरक्षणाची तसेच किमान आधारभूत किमतीची  mhp याबाबत कायद्यांत अंतर्भाव व्हावा .निर्यात बंदी रद्द झाले शेतकरी विधेयकात शेतकऱयांना संरक्षण शेतकऱ्याला संरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे जनआंदोलन हाती...

संभाजी ब्रिगेड स्नेहमेळावा व पदाधिकारी निवडी संपन्न

पुणे /अमीर आत्तार - २३ सप्टेंबर रोजी मौजे बलवडी येथे संभाजी ब्रिगेड सांगोला सर्व पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळावा, आढावा बैठक तसेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री अमरजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री दिपकदादा वाडदेकर, संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष शिवश्री लखनराज थिटे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील, शहराध्यक्ष राजू शिंदे, उपाध्यक्ष शरद गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल दिघे, संघटक नितीन रणदिवे, लखनराज थिटे, गणेश महांकाळ, पप्पू लेंडवे, शहाजी दिघे, रणजित शिंदे, रोहन शिंदे, मनोज मेटकरी, आकाश ठोकळे, पप्पू पवार, हनी कांबळे, नारायण कदम, सचिन महांकाळ यांच्यासह मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुरोगामी विचारांचे पाईक, संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेवेळी सांगोला तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले शिवश्री राजू मगर यांची संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच जिजाऊ कन्स्ट्रक...

बुलढाणा लाईव्ह च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि वनविभागाचे कर्मचारी थेट पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

सिंद्खेड राजा /बालाजी सोसे -पळसखेड चक्का शिवारामध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतीचे नुकसान पाहणी करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक जी एस ठाकरे थेट पोचले शेतकऱ्याच्या बांधावर बुलढाणा लाईव्ह ने प्रसिद्ध केलेली बातमीची अवघ्या चाळीस तासामध्ये घेतली दखल दिनांक ७/९/ २०२० रोजी सायंकाळी प्रसिद्ध झाली होती .त्यामध्ये शेतकऱ्यांनी बुलढाणा लाईव्ह कडे मांडलेल्या सर्व व्यथा व समस्या आज दिनांक रोजी १०/९/२०२० आज अकराच्या दरम्यान सकाळी पळसखेड चक्का शिवारामध्ये पांडूरंग गोविंदा सोसे विष्णू भिमराव सोसे बालाजी संतोबा सोसे गजानन  संतोबा सोसे यांच्या शेतावर जाऊन केली मकाची पाहणी आणि पंचनामा केला आणि त्यावेळी या समोर ज्या व्यक्तीची ऑनलाइन तक्रार असेल त्यांची सुद्धा पंचनामे करण्यात येईल त्यावेळेस उपस्थित वनविभागाचे अधिकारी वनरक्षक जी एस ठाकरे कृषी सहाय्यक डोईफोडे साहेब तलाठी जिने साहेब व नागरिक बाबुलाल महाराज खजुरे हे उपस्थित होते नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी एवढीच शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली आणि शेतकऱ्यांना थेट बुलढाणा लाईव्ह आणि कोरोनाच काळात सुद्धा वनविभागाचे कर्मचारी श...

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक, प्री मेट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा:- अझरुद्दीन सय्यद

प्रतिनिधी/हडपसर - प्रधानमंत्री १५ सूत्री कार्यक्रम नुसार केंद्र सरकार कडून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक, प्री मेट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील  विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असा अाहवान समाजसेवक अझरुद्दीन सय्यद यांनी केला आहे.   मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. इ. पहिली ते दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना "पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती" दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त पहिली ते पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक १००० रुपये तसेच इ. सहावी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. तसेच इ. अकरावी ते बारावी सहित ITI ,डिप्लोमा,पदवी व पदवीधर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६००० ये १२००० रुपये ची आर्थिक मदत "पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती"च्या स्वरूपात दिली जाते. याच बरोबर प्रोफेशनल व टेक्निकल अभ्यासक्रमात शिक्ष...

सततच्या पावसाने शेतजमीचे नुकसान

पळसखेड चक्का येथील सतत मुसळधार पाऊस झाल्यामुळे या शिवारातील छोटे-मोठे पाझर तलाव तसेच माती बांध व सिमेंट बांध पूर्ण वरफुल झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन पूर्णपणे चीभरडेली आहे.  सिंद्खेड राजा /बालाजी सोसे -सतत पावसामुळे या पळसखेड चक्का परिसरातील संपूर्ण माती बांध, पाझर तलाव ,सिमेंट बांध पूर्णपणे वरफुल झाल्यामुळे या परिसरामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे या गावातील 50 टक्के जमीन आज रोजी चिभडली आहे असाच पाऊस राहिल्यास संपूर्ण महाकाळ होईल जमीन पूर्णपणे चिभरडेली म्हणजे पाण्याखाली गेलीआहे परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांना आता काय करावं हे सुचत नाही त्यामुळे किनगाव राजा, पिंपळगाव लेंडी, शेलगाव राऊत, उंब्रज नरसिंह ,उगला,सावखेड तेजन .संपूर्ण परिसर वोला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे मूग गेला, उडीद गेला ,कपाशी गेली ,सोयाबीन गेली हाती काही नाही राहिलं आता फक्त सरकार मायबापांनी शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे सरसगट संपूर्ण पंचनामा करून थेट शेतकऱ्याला मदत द्यावी .अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे.

सततच्या पाऊस वार्‍याने शेडनेटचे झाले नुकसान

सिंदखेड राजा/बालाजी सोसे - पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा शिवारामध्ये दिनांक २०ते२१/९/२०२० रोजी झालेल्या मुसळधार पाऊस वारा सोबत असल्याने  शेडनेट झाले उध्वस्त यामुळे या परिसरामध्ये बीज उत्पादक शेतकरी आता अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याची खूप मोठे नुकसान  झालेली आहे .त्यामुळे या परिसरातील संपूर्ण शेडनेटचे पंचनामे करून त्यांना मदत द्याव  अशी मागणी येथील बीज उत्पादक शेतकरी करत आहे. या परिसरामध्ये या अगोदर मुख्य पिक मूग. पूर्णे उद्ध्वस्त झाला. आता कपाशी गेली .उडीद गेला  .सोयाबीन गेली . मक्का गेली. आता शेतकऱ्यांच्या हाती काही नाही  राहील शेतकऱ्यांनी काय करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला त्यामुळे सरसकटपणे  पंचनामे करून शेतकऱ्याला थेट मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे. 

जऊळका या गावात ओढ्याचे नाल्याचे पाणी शेतात घुसून पिकाचे मोठे नुकसान

सिंदखेड राजा/बालाजी सोसे -  सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक २०/ते२१/९/२०२० सकाळी पहाटे पर्यंत मुसळधार पावसाने धुमशान घातला आणि आजसुद्धा या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस चालूच आहे .असून जऊळका गावाला त्याचा फटका बसलेला आहे. शेतातील ओढे नाले तुडुंब भरल्याने पाणी शेतात गेले आणि होत्याचं नव्हतं झालं.जिवापाड जपलेली पिक डोळ्यादेखत वाहून गेले आता जागायचा कस हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे याअगोदर मूग हे पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने  शेतकऱ्याकडे फक्त आता सोयाबीन आणि कपाशी राहिलेली होती ती पण आता पूर्ण खाली पडल्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा धक्का बसलेला आहे शेतकऱ्याचे मुख्य पीक कपाशी . मूग.आणि सोयाबीन आहे आता सर्वच गेल्याने जऊळका येथील शेतकरी दामोधर सांगळे, अशोक सांगळे, समाधान बुधवत, स्वप्निल सांगळे, यांनी आमच्याशी संपर्क साधून आपल्या ए बी एस न्यूज  इकडे व्यथा मांडली आणि आमचे पंचनामे करून आम्हाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.

सिटू चे वीजबिल माफीसाठी अनोखे आंदोलन

        सरकार देश विकू पहातय सावधान ! - कॉ.नरसय्या आडम मास्तर सोलपूर/शाम आडम -जे गद्दार भांडवलदार,उद्योजक या  देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि देशाला बुडवून फरार झाले अशा दिवाळखोरांना देशात आणून शिक्षा देण्याऐवजी त्यांच्यासारख्या भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी करून आरती देऊन ओवळत आहेत. मात्र गोरगरिबांचे फक्त लॉकडाऊन च्या काळातील वीज बिल माफ करण्यास सरकार तयार नाही. लोकांना खोट्या स्वप्नांची खोटी दुनिया दाखवून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरणाचा सपाटा चालवून देश विकायला निघाले सावधान ! अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर धरणे आंदोलनात जनसमुदायला संबोधित करताना केले.  बुधवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी जुनी मिल कंपाऊंड येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने लॉकडाऊन च्या काळातील सरसकट वीजमिल माफ करावे ही मागणी घेऊन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली तर महासचिव  अँड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफ करा. अशा घोषणांचे डोक्यावर प्रतिकात्मक विजेचा गोळा असणारे मुकु...

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर पंढरपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

पंढरपूर - पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर पंढरपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे कार्याध्यक्ष राकेश साळुंखे यांनी दिली.  कार्यक्रमात  विद्यार्थ्यांनी भविष्यात असेच समाज उपयोगी कार्यक्रम घेत राहू आणि कर्मवीर भाऊरावांच्या विचाराने गोर गरीब विद्यार्थ्यांनच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचा न्याय व हक्कासाठी ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कायम कटिबध्द राहील हा निर्धार केला.   या कार्यक्रमाला उपस्थित मा श्री राक्षे सर,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष राकेश साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष सुजित गायकवाड,जिल्हा सरचिटणीस सौरभ ऐवळे, पंढरपूर शहर अध्यक्ष संकेत घोघरदरे,शहर कार्याध्यक्ष अमृता शेळके, शहर सचिव ओंकार जगताप,शुभम साळुंखे,जयदीप माने, विशाल पवार आदी मान्यवर व  पदाधिकारी उपस्थित होते. 

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अति विचार करत राहू नये.  2. वृषभ : जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल. 3. मिथुन : चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मन प्रसन्न राहील. 4. कर्क : मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल.  5. सिंह : आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. विरोधक नामोहरम होतील. 6. कन्या : प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. 7. तूळ : बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.  8. वृश्चिक : आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारा...

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षेतर कर्मचारी यांचे लेखणी काम-आवजार बंद आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक कृती समिती च्या वतिने दिनांक 24 सप्टेंबर 2020 पासून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन षिक्षकेतर कर्मचारी  आश्वासित प्रगती योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ द्यावा व 7 वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा व इतर मागण्या घेवून लेखनी बंद आवजार बंद अंदोलन करणार आहेत.  यामध्ये आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर युनिव्हर्सिटी ऑफिसर फोरम, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, आणि ’चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, कॉलेज कर्मचारी युनियन, महाविद्यालयीन महासंघ या संघटना एकत्र येवून हे अंदोलन करणार आहेत.  यासाठी मा. कुलगुरू पु.आ.हो. सोलापूर विद्यापीठ, मा़. उच्च शिक्षण सहसंचाल व ठिकठिकाणचे मा. प्राचार्य यांना निवेदणे सादर करण्यात आली आहेत.  यावेळी बार्शीमध्ये सर्व माहाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदणे सादर करण्यात आली.  मा. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी या मागण्या मान्य न केल्यास पूढे 1 आॅक्टोबर 2020 पासून विद्यापीठे व महाविद्या...

अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित

अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित स्वावलंबनाचे धडे, तुम्ही दिले हो ना जातीसाठी, ना धर्मासाठी, शिकवलं फक्त मानवतेसाठी अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित स्वाभिमानानं जगायला, तुम्हीचं शिकवलं गोर-गरीब शेतकऱ्यांची, लेकर शिकू लागली अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित कमवा आणि शिका या योजनेने आई-वडिलांच्या डोक्यावरचा ताण कमी झाला खेड्यातल्या पोरांना शिक्षण दिलं रयतेनं अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित शिक्षणाबरोबर तुम्ही समाज प्रबोधन केलं तोच वारसा आम्ही जपतोय, अण्णा तुमच्या कृपेने, रयत झाली या शिक्षित               नाव: रविशंकर लता गुरुनाथ जमदाडे                   मु.पो.तावशी    ता.पंढरपूर जि.सोलापूर                    मोबाइल नंबर: 9763632750

मराठा क्रांती गीत

एक मराठा , लाख मराठा , क्रांती मराठा,  शांती मराठा , संबोधती कुणबी मराठा रे | तुकोबा शिवरायाचे वारसदार आम्ही , क्रांतीचा इतिहास आम्हाला रे  || बहुगणसंख्या हमारी वरदान ,यही हमारा अभिमान रे | मुक मराठा बोलू लागला , व्होट हमारा , राज तुम्हारा अब नही चलेगा रे|| राजसत्ता धर्मसत्ता ,शिक्षणसत्ता ,  मीडिया होगी हमारे हाथ रे | कलमकी तलवार , मुँह की जुबान , साहित्य क्षेत्र में प्रभाव ,यही हमारे आयुधे रे || हम है क्षत्रिय , हम है ब्राहमण ,सब वर्णोंका बाप , हम है बड़े भाई रे | दलित ,आदिवासी , महिला , मुस्लिम ,शीख ,इसाई यह सब श्रमिक ,हमारे भाई बहन रे || बोलो महाराष्ट्र मराठा , भारतीय मराठा , एकसंघ मराठा , सविधानभक्त मराठा रे | बोलो किसान मराठा , जय जवान मराठा , कष्टकरी मराठा ,विज्ञानवादी मराठी रे || जात ,प्रांत  का झगडा  ,देव धरम  का झगडा ,  हम आपस में नहि लढेगे रे | उठला मराठा ,पेटला मराठा , समजले आता , खेड्यातून शहराकडे चला रे || आता एकच लक्ष , दिल्लीचे तख़्त ,एकच जेंडा एकच पक्ष जागतिक विचार करा रे | आता एकच नेता , त्याव...