"देशावरील कोरोना संकटावर
सहकार्याने मात केली पाहिजे
माणसाकडून माणसासाठी
मदतीचा सदैव हात पाहिजे"
बार्शी (प्रतिनिधी - शुभम काशीद) - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून तसेच कुटुंबाची कोणतीही पर्वा नकरता चोवीस तास कर्तव्यावर राहणाऱ्या पोलिस बांधवांना श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगावचे सहसचिव हेमंत गडसिंग यांचे वतीने पांगरी पोलिस स्टेशन व वैराग पोलीस स्टेशन येथील एकूण 100 पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी पांगरी पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन हुंदळेकर,वैराग पोलिस स्टेशनचे एपीआय बजरंग कापसे,सहसचिव हेमंत गडसिंग,शैलजाताई गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,संचालक विलास मिरगणे,पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर गव्हाणे,सीआयडीचे अर्जुन कापसे,रेश्मा सुतार,सौदागर जाधव,उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखत खाकी वर्दीतला देवदूत बनून देखील उत्तम काम करीत आहेत. निराधाराला आधार,तहानलेल्याना पाणी, भूकेलेल्याना अन्न, मुक्या जनावरांना चारा देऊन एक माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत. मात्र कोरोनाचा धैर्याने सामना करीत असताना राज्यात 1000 च्यावरती पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.पोलीस बांधवांची कार्यतत्परता व सुरक्षितता समोर ठेवून सहसचिव हेमंत गडसिंग यांनी 100 सॅनिटायझर व 100 मास्कचे वाटप केले.संस्थेच्या सचिवा सखुबाई गडसिंग, सहसचिव हेमंत गडसिंग व नर्मदेश्वर शिक्षण परिवाराने कर्मवीर गडसिंग (गुरुजी) यांचे आदर्श विचार व संस्कार पुढे ठेवत सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यात नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शेवटी विं.दा.करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी बराचकाही अर्थ सांगून जातात
"देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता
देणाऱ्याचे हात घ्यावे"

Comments
Post a Comment