Skip to main content

शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार




      पंढरपूर, दि.18:- गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी  जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले. त्यांच्यावर आज मूळ गावी पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुळूज ग्रामस्थांनी व उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
           कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतराचे पालन करीत गावकरी अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. आज दुपारी 12:30 वाजता शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने  यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी आणण्यात आले. यावेळी  शहीद धनाजी होनमाने  यांचे मोठे बंधू विकास होनमाने यांनी अग्नी  दिला.
          यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने आदींनी शहीद धनाजी होनमाने यांच्या कुटुबियांची भेट घेवून सांत्वन केले. शासनाच्या वतीने शहीद धनाजी होनमाने यांना श्रध्दांजली वाहिली. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद होनमाने यांनी दाखविलेले शौर्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची जाणिव प्रत्येकामध्ये राहील, अशा शब्दांत पालकमंत्री भरणे यांनी  श्रध्दांजली वाहिली.  तसेच शासनाकडून सर्वप्रकारची मदत कुटूंबियास केली जाईल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
          कोल्हापूर परिक्षेत्राचे  विशेष  पोलिस महानिरीक्षक सुहास वारके जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक किरण अवचर ,अरुण पवार, श्री. भस्मे  यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
        पोलिस दलांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुहास वारके यांनी शासनाच्या आणि पोलिस दलांच्या वतीने शोकसंदेश वाचून दाखवला.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...