गूळपोळी गावातील गरजूंना वाटप केलेल्या या किटमध्ये 5 किलो तांदूळ ,5 किलो गहू ,1 लिटर तेल, 2 किलो बटाटे , 100 ग्रॅम चहा, 1 किलो साखर, 100 ग्रॅम चटणी याचा समावेश आहे.
आपल्या परिसरातील एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही याची दक्षता आपण घेऊयात आपण सर्वजण कोरोना विरोधात लढू आणी जिंकू देखील. या वेळी मंडळाचे अध्यक्ष व रुग्ण हक्क परिषद बार्शी तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे, गुलाब शेख, शहाजी चिकणे, अल्ताफ शेख.आप्पा चौधरी रेखा चिकणे, सुनीता चौधरी विद्या पाटील,व चंद्रकांत बारवकर, शिवाजी चिकणे, अतुल चिकणे ,रवींद्र गायकवाड,रामहरी काळे,विशाल पवार,सुरज पवार यांनी गावातील एकल कुटूंबाना घरोघरी जाऊन धान्य किटचे वाटप करण्यात आले

Comments
Post a Comment