माढा/राजकुमार माने - रयत क्रांती संघटना व नवहिंदवी स्वराज्य कला क्रिडा व सांस्कृतिक बहु. संस्था, उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उंदरगाव गावामध्ये आज सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत पशुचिकित्सालय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लाळ्या , खरखुत, लसीकरण, तसेच गर्भधारणा तपासणी, वांजपणा तपासणी, तसेच विविध आजार यांची तपासणी करण्यात आली. 100 जणावराना लसीकरण करण्यात आले. 25 जनावरांची गर्भधारणा तपासणी करण्यात आली. ह्या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून जगप्रसिध्द चित्रकार रत्नदीप बारबोले आणि उंदरगाव चे युवा नेते अभयसिंह मस्के लाभले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उंदरगाव चे उपसरपंच ऋषिकेश तांबिले, व युवा नेते रवी चव्हाण उपस्थित होते.शेतकऱ्यांसाठी हे लसीकरण आणि गर्भधारणा तपासणी शिबीर मोफत आयोजन करण्यात आले होते. रयत क्रांती संघटना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या पुढे ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत राहील .त्याप्रसंगी दीपक आरे, रविकांत कोळेकर, उत्तम साळुंके, शंकर साळुंके, अस्लम शेख, वामन तांबिले, मारुती सरवदे, बाबासाहेब वाघमोडे, सुनील नाईकवाडे, तुकाराम पाटील, विष्णू सुतार , संजय नाईकवाडे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी रयत क्रांती चे पंडित साळुंके, संतोष कोळी, अमोल तांबिले, नितीन रंगा चव्हाण, औदुंबर लवटे, नितीन बापूराव चव्हाण, प्रवीण चव्हाण,आबासाहेब कोळेकर, उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment