बार्शी - लाडोळे तलावाचा कॅनोल फुटून पाणी शेतात घुसल्यामुळे सासुरे येथील शेतकरी जालिंदर साहेबराव आवारे व सत्यवान साहेबराव आवारे यांच्या जमीन गट नं 1 मधिल जमीन वाहुन गेली व मोठ मोठ्या तालीफुटून नुकसान झालं आहे.कांदा, सोयाबीन पिक वाहुन गेले आहे.त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी व फुटलेला कॅनोल तात्काळ दुरूस्ती कराण्यासाठी शाखा अभियंता यांनी त्यांच्या स्तरावरुन कार्यवाही करावी ,अशी मागणी जालिंदर साहेबराव आवारे, सत्यवान साहेबराव आवारे व इच्छांत सत्यवान आवारे यांनी शाखा अभियंता,पाटबंधारे उप विभाग बार्शी यांच्याकडे केली आहे.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

Comments
Post a Comment