Skip to main content

अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांची आजच्या काळाला गरज- प्रा. संजय साठे



बार्शी - बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 बार्शी  नगरपालिका बार्शी या फेसबुक पेज वर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले.  हे व्याख्यान दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. अण्णाभाऊंची शाहिरी या विषयावर  प्राध्यापक संजय साठे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुंफले गेले. येथे प्राध्यापक संजय साठे हे विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी येथे प्राध्यापक म्हणून म्हणून काम  करतात ते साहित्यिक संशोधक आहेत.


व्याख्यानात प्राध्यापक संजय साठे म्हणाले,, अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांच्या आजच्या काळाला गरज आहे कारण आजची  परिस्थिती ही शेतकरी श्रमजीवी विरोधी आहे. अण्णा भाऊंचा शाहिरी हा प्राण होता. वर्ण वर्ग वादाची जाणीव असलेले अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते.  अमर शेख, दत्ता गव्हाणकर यांच्यासोबत लाल बावटा कला पथकाची निर्मिती करत त्यांनी समाजपरिवर्तनाचा झेंडा हातात घेतलेला होता. मुंबईच्या सभा  संमेलनांमध्ये ते श्रमिकांपुढे शाहिरी गात.  शाहिरीच्या कवनामध्ये काल्पनिक ईश्वराला न करता त्यांनी मायभुला, छत्रपती शिवरायांना नमन केले हा शाहीरीतला क्रांतिकारी बदल त्यांनी केला.  स्पेनचा फॅसीझम विरोधी पोवाडा तसेच स्टॅलिनग्राडचा चा पोवाडा हा जागतिक कम्युनिजमला अधोरेखित करत हिटलरचा पराभव मांडत कम्युनिस्ट चळवळीचा अभिमान व्यक्त करतात व त्यांची झुंजार वृत्ती त्यासोबतच त्यांचे देशावरती असणारे प्रेम ते या पोवाड्यामध्ये दाखवून देतात.  


पोवाड्यामध्ये लढलेल्या स्त्रियांचे ते कौतुक करतात त्यात ते म्हणतात "जगी शूर स्त्रिया फार झाल्या, झाल्या असतील कित्येक परी बिनजोड रुसी ललना." बर्लिनच्या पोवाडा मध्ये जागतिक लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांची निर्मिती करण्यासाठी झालेला लढा मांडतात.  बंगालचा पोवाडा हा दुष्काळावर आधारित असा आहे त्यात ते म्हणतात "शील कुल मुल विकून जगविली पोटाची आग" ही विदारक परिस्थितीचे वर्णन करत बंगालच्या लोकांना मदतीचा हात देण्याची हाक देतात. असा मानवतावादी दृष्टिकोन असणारे अण्णाभाऊ पंजाब दिल्ली दंग्याच्या बाबत धर्मांध  समाजकंटकांना उद्देशून म्हणतात "पंजाब झाला बेभान शिक हिंदू-मुसलमान वयाला पार विसरून आपापसात पाडती खून इंग्रजी गेले आग लावून"  याच पोवाड्यात ते भगतसिंगांची आठवण काढून भगतसिंगाचे वारसदार दंगा कसं काय करू शकतात असा सवाल करतात.  तेलंगणाचा लढा या पोवाड्यात अण्णाभाऊ येथील शेतकऱ्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात केलेल्या बंडाचा अभिमान बाळगतात व इतर कष्टकऱ्यांना तसा बंड करण्यास प्रेरित करतात.  


गिरणी कामगार या पोवाड्या मध्ये कामगारांची विदारक अवस्था ते मांडतात ते म्हणतात " बा कामगारा तुजपाशी अपारशक्ति नांदे मुंबई तळहातावर ती" यामध्ये श्रमिकाला त्याच्या शक्तीच्या आठवण करून देतात.  काळ्याबाजाराचा पोवाडा या पोवाड्यात नफेखोर भांडवलदार यांच्यावर कडवट टीका करून अण्णाभाऊ श्रमिकांची पिळवणूक कशी होते याचे वर्णन करतात.  त्यात ते म्हणतात " राबराबून  आम्ही पिकवितो शेत गाळीतो घाम, खाया नाही अन्न, झाले हैराण, कपड्याविना, तेलाशिवाय जाळतो दिवा.  अमळनेर ते अमर हुतात्मे हा पोवाडा हुतात्म्यांना अर्पण आहे.  लावण्यामध्ये अण्णाभाऊ "बदल ही दुनिया सारी" असे म्हणून संघटित होण्याची हात देतात.  . "शिवारी चला" ही रूपकात्मक रचना करत "सावकारशाहीचा चिवट केना, भांडवलशाहीचा पाडायचा रेंदा साम्राज्यशाही ची माकडे हाकलायची आहेत" यासाठी "बांधावरती लाल बावटा रोवण्याची" हाक देतात. अण्णाभाऊंची शाहिरी पोवाडे लावण्या हे सर्व काही साहित्य श्रमिकांना मार्क्सवादी पद्धतीने संघटित होऊन संघर्षाची हाक देतात.या व्याख्यानासाठी बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अॅड. असिफ भाई तांबोळी सोबतच तानाजी ठोंबरे, श्रीधर कांबळे यांनी मार्गदर्शन केले.   वकत्यांची ओळख पवन अहिरे यांनी केली तर आभार प्रवीण मस्तुद यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...