प्रतिंनिधी/बालाजी सोसे-भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा ऑनलाईन होणार असून या मेळाव्यात ऑनलाईन सहभागी व्हावे असे आव्हान. कायंदे यांच्या वतीने करण्यात आले. भाजप राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजाताई मुंडे मेळाव्याला संबोधित करणार आहे. भक्ती गडावरील दसरा मेळावा म्हणजे राज्यातील नव्हे तर देशातील अठरापगड जाती प्रेरणा स्थळ आहे. दिवंगत स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली होणारा दसरा मेळावा त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या व माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती भगवान गडावर या ठिकाणी होणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑनलाइन दसरा मेळावा होणार आहे त्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार आहे .राष्ट्रसंत भगवान बाबा च्या प्रतिमेची मिरवणूक आपल्या गावात काढावी आपल्या गावातील कार्यक्रमस्थळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घ्यावे .दुपारी 12 वाजता मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडे मौजे सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जन्मस्थानी दर्शन घेणार आहे त्यानंतर 12 वाजून 30 मिनिटांनी मा पंकजाताई गोपीनाथ मुंडे सर्व राष्ट्रसंत भगवान बाबा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबा प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला संबोधित करणार आहे. भगवान भक्ती च्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमांमधून संबोधित करणार आहे .असे आवाहन सुनील तोताराम कायंदे यांनी केले करण्यात आले .
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment