Skip to main content

अडचणींना सीमा असते का ?- एक प्रगतशील शेतकरी



बार्शी - भाजीपाला ,तूर ,सोयाबीन कांदा हे किती परवडतात हे शेतकऱ्यालाच माहित असत.या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आधीही कोणी केली नसेल एवढी मोठी  गुंतवणूक करून अर्ध्या एकरामध्ये 160 ×160 चे शेततळे खोदून त्यात मत्स्यपालनाच्या माध्यमातून एक नवा व्यवसाय ,नवी सुरुवात करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या मोठ्या भावाचं स्वप्न अस्मानी संकटामुळे उद्धवस्त झालंय.

हा मत्स्यपालनाचा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो अनेकांचा मार्गदर्शक आणि नवा पायंडा पाडणारा ठरला असता.

लेकरापेक्षा जास्त मायेनं , तळहाताच्या फोडासारखं जपलेलं स्वप्न स्वतः डोळ्यादेखत उद्धवस्त होताना त्याच्या मनाला काय वेदना होत असतील याची कल्पना करवत नाही .कोणत्या शब्दांनी सुरुवात करून त्याची समजूत काढावी कि अजून कष्ट करून उद्याचा दिवस चांगला आणूया ...

अशा संकटाच्यावेळी वाटत कि अडचणीतून मार्ग काढून समृद्ध भविष्यकाळाची स्वप्न बघणे हा शेतकऱ्यांसाठी गुन्हाच ठरत असावा काय ? 


एवढा मोठ नुकसान कस भरून निघेल ?

 शासन -प्रशासन बघायला तरी येईल काय ? 

डाव मांडावा कितीदा ?परिस्थितीने तो मोडावा कितीदा ? 

प्रश्न संपणारच नाहीत ! मग उत्तरे तरी शोधावी का ?


Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...