माढा/राजकुमार माने - अतिवृष्टी व सीना माईला आलेल्या पुरामुळे सीना काठचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे.तसेच नदीकाठ जमिनी खचून वाहून गेल्यामुळे जमिनीचे ही प्रचंड नुकसान झाले आहे. उसाच्या पिपाणीत गाळ जाऊन ऊस नष्ट झाला आहे.त्यामुळे उसाच्या पुन्हा लागणी कराव्या लागणार आहेत. फळबाग फळासाहित जमीनदोस्त झाल्या आहेत. विद्युत मोटारी, पाईप , केबल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे सीना काठच्या व सोलापूर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त भागातील पंचनामे त्वरीत करून तात्काळ हेक्टरी एक लाख रु नुकसान भरपाई मिळावी. ही विनंती खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

Comments
Post a Comment