Skip to main content

शेतकरी संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्येकारी अध्यक्ष पदि श्री नानासाहेब बच्छाव यांची निवड



[ संघर्षमय नेतृत्व, अनेक सामाजिक संस्थेमाध्यमातुन समाजसेवा ते शेतकरी संघर्ष संघटनेच्या सर्वोच्च जबाबदारीचा हा संघर्षमय नानासाहेब बच्छाव यांचा जीवनप्रवास...]


शेतकरी चळवळीतील झुंजारवादि परिवर्तनाचे संघर्षमय वादळ म्हणजेच श्री नानासाहेब बच्छाव जनतेसाठी जगाव दुसऱ्यांसाठी झिजाव, अन्यायाविरुद्ध लढाव हेच नानासाहेबांकडून शिकाव.असे निर्भिडपणे शेतकरी लढ्यात योगदान देणारे श्री नानासाहेब बच्छाव यांची शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष मा. श्री हंसराज वडघुले पाटिल यांनी शेतकरी संघर्ष संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्येकारी अध्यक्ष पदि निवड केली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपञ ही देण्यात आले आहे. शेतकरी संघर्ष संघटनेची सर्वोच्च मोठी जबाबदारी श्री नानासाहेब बच्छाव यांचेकडे दिलेली आसुन सर्व संघटनात्मक बांधनीसह सर्व नियोजनाचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहेत.


कृतिशिल शेतकरी चळवळीतील झुंजारवादी उल्लेखनीय नेतृत्व....


शेतकरी कुटुंबातील नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे गावचे भुमिपुञ श्री नानासाहेब बच्छाव शेतकऱ्यांचे हक्कासाठी चा लढा सुरवातीपासुन लढत आहेत. मनात नेहमी गोरगरीबांचे कल्याणाची आस, अन्याय अत्याचाराविरोधात चीड, शेतकऱ्यांबद्दलची आपुलकी म्हणून ते आपल काम बाजुला ठेवत आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेटि देवून मदतीचा हात देत आहेत, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नेते माजी आमदार मा.पुंजाबाबा गोवर्धने यांच्या विचारांर प्रभावित होऊन नंतर शेतकरी वाचवा अभियान जिल्ह्यात त्यांनी जोमान सुरु केले, या कामी मीही अनेक सहकार्यांसह नानासाहेबांचे सोबतीला होतो..

नानासाहेब बच्छाव यांनी शेतकरी वाचवा अभियान सर्वांचे सोबतीन गावागावात पोहचवून समविचारी वैचारिक तरुण लोक संघटित केली, शेतकऱ्यांना प्रबोधन ते समुपदेशन यासाठी गावागावात दौरे केले. मग प्रश्न कोणताही तीथल्या अडचण सोडवल्या.

शेतकरी संपातील किसान क्रांती, सुकाणु समिती त्यांत  महत्त्वपुर्ण योगदान, स्वाभिमानीचे व्यापक दुध आंदोलनात सेट्रल जेलची सजा, ईतरही लढ्यात, आंदोलना वेळी अनेकदा  गुन्हे आरोप पण तरीही सातत्याने मार्गक्रमन करत नानासाहेबांचे अखंड काम चालूच ठेवले..

धाडसी, निर्भिड व हजर जबाबी सडेतोड व्यक्तीमत्व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ यामुळेच महाराष्ट्रभर सम विचारांचा मैञीचा गोतावळा निर्माण केला आहे. नानासाहेबांचे वैचारिक विचार थोर पुरुषांचे विचाराशी साम्यता साधणारे आहेत, याचा नेहमी अभिमान वाटतो. याचा प्रत्यय अनेकदा आलेल्या संकटावेळी आम्ही अनुभवला आहे. 

शेतकरी चळवळीतील अविरत निस्वार्थ  कार्याचा विचार करता योग्य व्यक्ती योग्य निवड आशीच त्यांची निवड असुन त्यांचे कार्यालाही गौरवांन्वित करणारी आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारे नानासाहेब बच्छाव यांना भावी वाटचालीला खुप-खुप हार्दिक शुभेच्छा... 


अमीर आत्तार 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...