मंगळवेढा/अमीर अत्तार-आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे ढोल बजावे सरकार जगाओ आंदोलन मंगळवेढा तालुक्यातील पश्चिम भागात सर्वात मोठे तीर्थक्षेत्र तसेच महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून म्हणून ओळखली जाणारी सूक्षेत्र श्री. बिरोबा व महालिंगराया यांच्या पावन नगरी मध्ये हुलजंती येथील ग्रामपंचायत समोर आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्याचे माझी.उपसभापती मा. श्री. शिवाजीराव पटाप यांनी धनगर समाज बांधवांना घेवुन ढोल बजाओ सरकार जगावो आंदोलन पार पाडली यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते, दत्ता पेटर्गे, मंगळवेढा तालुका ग्राहक मंच तालुकाध्यक्ष अविनाश कोरे गौडाप्पा पाटील, नागेश मासाळ आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment