सिंदखेड राजा/बालाजी सोसे - सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक २०/ते२१/९/२०२० सकाळी पहाटे पर्यंत मुसळधार पावसाने धुमशान घातला आणि आजसुद्धा या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस चालूच आहे .असून जऊळका गावाला त्याचा फटका बसलेला आहे. शेतातील ओढे नाले तुडुंब भरल्याने पाणी शेतात गेले आणि होत्याचं नव्हतं झालं.जिवापाड जपलेली पिक डोळ्यादेखत वाहून गेले आता जागायचा कस हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे याअगोदर मूग हे पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याकडे फक्त आता सोयाबीन आणि कपाशी राहिलेली होती ती पण आता पूर्ण खाली पडल्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा धक्का बसलेला आहे शेतकऱ्याचे मुख्य पीक कपाशी . मूग.आणि सोयाबीन आहे आता सर्वच गेल्याने जऊळका येथील शेतकरी दामोधर सांगळे, अशोक सांगळे, समाधान बुधवत, स्वप्निल सांगळे, यांनी आमच्याशी संपर्क साधून आपल्या ए बी एस न्यूज इकडे व्यथा मांडली आणि आमचे पंचनामे करून आम्हाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...


Comments
Post a Comment