सिंदखेड राजा/बालाजी सोसे - पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा शिवारामध्ये दिनांक २०ते२१/९/२०२० रोजी झालेल्या मुसळधार पाऊस वारा सोबत असल्याने शेडनेट झाले उध्वस्त यामुळे या परिसरामध्ये बीज उत्पादक शेतकरी आता अडचणीत आलेला आहे त्या शेतकऱ्याची खूप मोठे नुकसान झालेली आहे .त्यामुळे या परिसरातील संपूर्ण शेडनेटचे पंचनामे करून त्यांना मदत द्याव अशी मागणी येथील बीज उत्पादक शेतकरी करत आहे. या परिसरामध्ये या अगोदर मुख्य पिक मूग. पूर्णे उद्ध्वस्त झाला. आता कपाशी गेली .उडीद गेला .सोयाबीन गेली . मक्का गेली. आता शेतकऱ्यांच्या हाती काही नाही राहील शेतकऱ्यांनी काय करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला त्यामुळे सरसकटपणे पंचनामे करून शेतकऱ्याला थेट मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...


Comments
Post a Comment