Skip to main content

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना



पंढरपूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे  तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.सोलापूर जिल्ह्यातील  पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे  नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली.

 यावेळी, आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषि अधिकारी गजानन ननवरे ,दिपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता  दत्तात्रय गावडे, महावितरणचे श्री.कासार  उपस्थित होते.
 यावेळी पालकमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टिने  पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड  झाली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यातील 54 गावांतील मोठ्या प्रामाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 6500 ते 7000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त 517 कुटुबांचे स्थलातंर करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  पुराच्या पाण्यामुळे काही गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याने विद्युत पुरवठा पुर्वरत करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

  अतिवृष्टिने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थित शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासनस्तरावरुन आवश्यकती मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.  

यावेळी आमदार भारत भालके यांनी नुकसानगस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या वतीने तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टिमुळे  विविध ठिकाणी नुकसान झालेल्या  भागांची  माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...