नळदुर्ग/पुरोषत्तम बेले - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य बाबुराव (भाऊ) मधुकरराव चव्हाण यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र व अणदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य बाबुराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश जगदाळे यांच्या स्मरणार्थ आशिष जगदाळे यांच्यावतीने होर्टी ता. तुळजापूर येथील होतकरू व गरीब कुटुंबातील रितेश रणसुरे व रुपेश गायकवाड या दोन विदयार्थ्याना महत्वकांक्षी विदयार्थी दत्तक कार्यक्रमात आशिष जगदाळे यांच्यावतीने दत्तक घेण्यात आले. यावेळी दत्तक घेण्यात आलेल्या विदयार्थ्यांना जीवनावश्यक वस्तु, किराणा माल ,कपडे आदीसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. होर्टी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास होर्टीचे विद्यमान सरपंच संजय गुंजोटे, नळदुर्ग शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले ,अनिल भोसले, कै. देवरावजी चव्हाण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, शाम कनकधर ,सचिन मुळे, अमर पिच्चे, सुधाकर गायकवाड, विशाल मोटे ,योगेश माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment