Skip to main content

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता




तुळजापूर/अक्षय वायकर  : पर्यटक व इतिहासप्रेमी नागरीक आतुरतेने वाट पाहणा-या किल्ल्यातील नरमादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या पर्यटकांसाठी किल्ला बंद आहे.  गेल्‍या दोन आठवडयापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत  असून नळदुर्ग येथिल कुरनुर मध्यम (बोरी  धरण) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होवुन शनिवार पर्यंत 95 टक्के पाणी साठा झाला आहे. दरम्यान, पहिल्यांदाच सलग दुस-या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. 


 दि. 26 सप्‍टेंबर अखेरपर्यंत जवळपास 623 मिलीमीटर पाऊस झाल्‍याची नोंद झाली आहे. लवकरच नळदुर्ग येथील बोरी धरण भरण्‍याच्‍या मार्गावर असून हे धरण भरल्‍यास ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील ''नर-मादी'' हा धबधबा सुरु होण्‍याची शक्‍यता नागरिकांतून व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे इतिहासप्रेमी नागरिक व पर्यटक नर-मादी धबधबा वाहण्‍याची आतुरतेने वाट पाहत आहे. 

नळदुर्ग येथील कुरनुर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या पाणलोट क्षेत्रात शुक्रवार रोजी दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बोरी धरण पाण्याने भरले आहे. मात्र या धरणात जास्‍त झालेले पाणी सांडव्‍यातून सध्या वाहत नाहीत. त्यास आणखीन पावसाची गरज आहे. तरीही पाण्याचा ओघ सुरु आहे. एक ते दोन दिवसात सांडवे सुरु होऊन ते पाणी शहराच्या उत्तरेस असलेल्या बोरी नदीतून किल्ल्यात येईल. त्यानंतरच किल्‍ल्‍यातील प्रेक्षणीय स्‍थळ असलेल्‍या ''नर-मादी'' हा धबधबा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नळदुर्गचा भुईकोट किल्ला गेल्या काही वर्षापासून सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने शासनाकडून संगोपनार्थ घेऊन किल्ल्याचे रुपडे पालटले आहे. कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, जयधवल करमरकर, कै. भरत जैन यांच्या अथक प्रयत्नाने किल्ल्याच्या सुशोभिकरणामुळे व पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्याने गतवर्षी देश-विदेशातील पर्यटकांनी किल्ल्याला भेटी दिल्या आहेत. मात्र संसर्गजन्य कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यापासून पर्यटकांसाठी हा किल्ला बंद करण्यात आला आहे. दरम्यान, युनिटी कंपनीस काही नियम व अटी घालुन शासनाने त्वरित हा किल्ला पर्यटकांसाठी चालू करण्याची मागणी इतिहास प्रेमी नागरीक व पर्यटकांतुन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...