सिंदखेड राजा /बालाजी सोसे - सिंदखेड राजा तालुक्यामध्ये जय भगवान महासंघाचे नवे तालुकाध्यक्ष श्री माननीय जगन्नाथ उर्फ सोनू विश्वनाथ घुगे यांचे आज देऊळगाव मही येथे नियुक्ती करण्यात आली .त्यावेळी उपस्थित श्री माननीय शंकरराव उगलमुगले जय भगवान महासंघाचे विदर्भाचे अध्यक्ष, तसेच श्री माननीय सिद्धेश्वर आंधळे जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष ,गणेश भाऊ मुंडे जय भगवान महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ,दीपक भाऊ कायंदे पोलीस पाटील सोनदेव ,उमेश भाऊ सोसे दैवत फाऊडेशनचे विदर्भ उपाध्यक्ष, हे उपस्थित होते त्यावेळी उगलमुगले साहेब आंधळे साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि जय भगवान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यावर विश्वास ठेवून मी संघटनेचे पूर्णपणे काम करणार समाजासाठी एकनिष्ठा ने समाजाच्या पाठीमागे उभी राहणार असा विश्वास जगन्नाथ ऊर्फ सोनू यांनी विश्वास दिला आणि मान्यवरांचे आभार मानले.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment