Skip to main content

लवंगी येथील भैरवनाथ शुगर चे बॉयलर पूजन , 5 लाख मे टन गाळप चे उद्दिष्ट - प्रा. शिवाजीराव सावंत



हुलजंती /अमीर आतार -  भैरवनाथ शुगर सातवा गळीत हंगाम ऊस उत्पादन शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावर सुरू करत असून  कारखान्याच्या उभारी पासून या तालुक्यात व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना आतापर्यंत विश्वास दाखवला असून त्याच विश्वासावर या कारखान्याचा चालू हंगाम पाच  लाख मे टन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बॉयलर चे अग्नी प्रज्वलित करण्यात आले  प्रारंभी चंद्रप्रभा माने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली . तसेच चंद्रकांत देवकर व सौ ज्योती देवकर यांच्या हस्ते  सत्यनारायणाची पूजा करण्यात आली  याप्रसंगी व्हाईस चेअरमन अनिल सावंत अविनाश वाडेकर विहाळ युनिट कार्यकारी संचालक केशव सावंत आलेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . 
पुढे बोलताना चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की कारखान्याचे संस्थापक आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगती पत्ता कडे वाटचाल करीत आहे 
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागात बेरोजगार तरुणांना भैरवनाथ शुगर कारखाना माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या व गावच्या व्यवहार चांगला होत असल्यामुळे कारखाना परिसरात तासगावचा साखर कारखान्यामुळे विकास होऊ लागला आहे . 

चालू करीत हंगामामध्ये पाच लाख मेघा टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी वाहतूकदार तोडणी तोडणी कामगार अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले
ह्या कार्यक्रमाला पंढरपूर श्याम गोसावी संदीप सलगर चे उपसरपंच बंडू जाधव इंद्रजीत पवार तानाजी चव्हाण शशिकांत निकम आदी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...