Skip to main content

संभाजी ब्रिगेड स्नेहमेळावा व पदाधिकारी निवडी संपन्न



पुणे /अमीर आत्तार - २३ सप्टेंबर रोजी मौजे बलवडी येथे संभाजी ब्रिगेड सांगोला सर्व पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळावा, आढावा बैठक तसेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री अमरजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री दिपकदादा वाडदेकर, संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष शिवश्री लखनराज थिटे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील, शहराध्यक्ष राजू शिंदे, उपाध्यक्ष शरद गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल दिघे, संघटक नितीन रणदिवे, लखनराज थिटे, गणेश महांकाळ, पप्पू लेंडवे, शहाजी दिघे, रणजित शिंदे, रोहन शिंदे, मनोज मेटकरी, आकाश ठोकळे, पप्पू पवार, हनी कांबळे, नारायण कदम, सचिन महांकाळ यांच्यासह मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुरोगामी विचारांचे पाईक, संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेवेळी सांगोला तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले शिवश्री राजू मगर यांची संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे मालक इंजी. शिवश्री कौस्तुभ शिंदे यांची सांगोला शहर उपाध्यक्ष पदी व माणुसकी प्रतिष्ठाण च्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असनारे शिवश्री संदिप गिड्डे यांची शहर कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

त्यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष दिपकदादा म्हणाले की, “आपण सतत २५ वर्ष समाजप्रबोधन करत समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे, आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोनी दिशाभूल करून तरूणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना रोखणे व योग्य मार्गदर्शनकरने आपले काम आहे. आपल्या तरूनांनी जागतिकीकरण समजून घेत आर्थिक साक्षर व आर्थिक सक्षम कसं होता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.” प्रदेशकार्याध्यक्ष अमरजीत पाटील बोलले की, “कसल्याही प्रकारच्या सोई-सुविधा नसताना अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत कोनत्याच प्रांताच्या, भाषेच्या सिमा आपणांस रोखू शकल्या नाहीत आपल्या मुलांनी आता ग्लोबल झालं पाहिजे, पडेल तो उद्योग व्यवसायात ताकदीने उतरून आपण जागतिकीकरणाचा भाग झालं पाहिजे. बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्गांनेच जाणे सर्वांच्या हिताचे आहे. सांगोला तालुक्याला खुप मोठा सत्यशोधक चळवळीचा वारसा आहे तो परत मोठ्या ताकदीने जागृत करूया, आपल्या वाडवडीलांनी उभारलेली हि चळवळ आपण चांगल्या प्रकारे चालवू, पडेल ते काम करून आर्थिक उन्नती साधून, सामाजिक-सांस्कृतिक शहाणपण मिळवून आपले जीवन सुंदर करू.” 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवश्री मल्हार गायकवाड यांनी केले व आभार भाई राजू मगर यांनी मांडले.त्यानंतर सुंदर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन नितीन रणदिवे आणि शिंदे यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...