Skip to main content

बार्शीत लसीकरणत वशिलेबाजीचा आरोप , पारदर्शकता आणण्यासाठी ठिय्या आंदोलन

 


बार्शी/प्रतिनिधी - बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत आहे. लसीकरण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश नेवाळे यांनी बार्शी तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.


मागील काही दिवसांपासून बार्शी शहर व तालुक्यामध्ये लसीकरणाचा गैरव्यवहार, तसेच वशिला लावून लसीकरण होत असल्याचे निदर्शनास आल्याने दि ३१ मे पासून जोपर्यंत लसीकरणाचा पुरवठा सुरळीत होत नाही.अधिकारी पारदर्शकता बाळगत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती उमेश नेवाळे यांनी दिली.

           


 आंदोलनाबाबत माहिती देताना ते असे म्हणाले की, आमच्या भागातील तसेच बार्शीतील वयस्कर लोकांच्या लसीकरणासाठी रांगा लागलेल्या पाहून आम्ही काही तरुणांना सोबत घेऊन लसीकरणासाठी रांगेत उभारलो असता लसीकरण केंद्रावर असे आढळून आले की शहरातील मान्यवर, लोकसेवक, नगरसेवक, व्यापारी व राजकीय लोकांशी संबंधित असलेले बडे हस्ती नागरिकांच्या लसीकरणाच्या रांगेत न उभे राहता ते थेट लसीकरणासाठी सभागृहात प्रवेश करताना व अधिकाऱ्यांच्या संगनमताने लसी घेताना आणि अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करताना वशिला लावताना दिसून आले.


 याबाबत अधिक माहिती विचारली असता सर्वच ठिकाणी अधिकारी व कर्मचारी हे उडवाउडवीची उत्तरे देत होती व अनियमितपणामुळे लसीकरण उपलब्ध नसल्याचे नेहमीच सांगण्यात येत होते व आले आहे. ज्या दिवशी लसीकरण उपलब्ध नाही असे सांगितले जाते, त्याच दिवशी तालुक्याच्या विविध भागात चोरून लस देत असल्याचे आढळून आले. 

 

  यावेळी आंदोलनकर्ते उमेश नेवाळे यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. सोलापूर शहरामध्ये जिथे लसीचा स्टॉक उपलब्ध आहे त्याच ठिकाणी परत परत स्टॉक दिला जातो. परंतु दुसऱ्या ठिकाणी मात्र लस शिल्लक नाही असे सांगितले जाते.याची तात्काळ दखल घेऊन लसीकरणाचे नियोजन पारदर्शक करून सर्व ठिकाणी समान पद्धतीने लसीकरण उपलब्ध करण्यात यावे.बार्शी शहरातील व तालुक्यातील लसीकरण सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या लसीकरणाची तातडीने चौकशी करावी यात मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी झाले असल्याने त्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.आतापर्यंत बार्शी शहर व तालुक्याला  किती लस आल्या व त्या कोणाकोणाला दिल्या याची संपूर्ण माहिती आम्हाला लेखी स्वरूपात मिळावी .बार्शी शहर व तालुक्यातील फ्रंट लाईन वर्करला आतापर्यंत किती लस दिल्या त्याची लेखी स्वरूपात माहिती मिळावी.सर्वप्रथम फ्रंट लाईन वर्कर यांना प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण पूर्ण करून त्याच बरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नियमानुसार लसीकरण करून घेण्यात यावे.“वार्ड निहाय कुपन देण्याऐवजी वार्ड निहाय लसीकरण” केल्याने ४५ पुढील नागरिकांना रांगेत उभारण्याचा त्रास वाचेल म्हणून वार्ड निहाय लसीकरण करण्यात यावा यातही संपूर्णपणे पारदर्शकता असावी

Comments

Popular posts from this blog

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...