Skip to main content

चंद्रपुरच्या दारुबंदीसाठी नशाबंदी चे कार्यकर्ते एकवटले

 


जालना :- प्रतिनिधी  चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा नशाबंदीसाठी काम करणाऱ्या सामाजिक  कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे . तसेच दारूबंदी उठवण्याचा शासन निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे . या मागणीमध्ये सामाजिक कार्यकत्यांसह राज्याच्या नशाबंदी मंडळानेही उडी घेतली आहे . नशाबंदी मंडळाच्या चिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या की , काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने नेमलेल्या देवताळे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली होती . महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले आणि महिलांनी दिलेल्या दीर्घ संघर्षाची धार अधिक तीव्र झाली होती . मात्र महाविकास आघाडीच्या नव्या निर्णयामुळे दारूविरोधी लढणाऱ्या राज्यातील सर्व महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले आहे . पाच वर्षे हजारो महिलांनी केलेल्या प्रदीर्घ अशा आंदोलनाचा कार्यकर्त्यांचा सरकारने अपमान केला आहे . चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचे कारण तेथे अवैध दारू वाढली हे देण्यात आले आहे .असे कारण देणे हे सरकारने स्वतःच्याच अपयशाची कबुली देणे असल्याचे नशाबंदी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे . अवैध दारू वाढली तर ती रोखण्याचा प्रयत्न करणे , हा त्यावरील उपाय असू शकतो . वास्तविक तिथे पकडली जात असलेली अवैध दारू ही दारूबंदी यशस्वी होते आहे , असा त्याचा अर्थ होता . पण पालकमंत्री दारू विक्रेत्यांच्या बाजूचे असल्याने दारूबंदीला बदनाम केल्याचा आरोपा नशाबंदी कार्यकर्त्यांनी केला आहे . दारूबंदी गरजेची दारूतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा दारूतून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी सरकारला जास्त खर्च करावा लागतो , अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे . केवळ महसुलासाठी दारूबंदी उठवणे ; यातून राज्यातील व्यसनमुक्तीच्या सरकारच्या प्रयत्नाला बाधा निर्माण झाली आहे . निर्भया बलात्कार प्रकरणानंतर सरकारने तो कायदा आणखीन कडक केला . त्याप्रमाणे अवैध दारूच्या संदर्भातील कायदे अधिक कडक करण्याची गरज नशाबंदी कार्यकर्ते अमोल मडामे यांनी व्यक्त केली .


म्हणून अवैध दारू फोफावली


चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्यानंतर तत्कालीन सरकारने चंद्रपूर , गडचिरोली , वर्धा असा ड्राय झोन जाहीर करून त्यात ४५ अधिकाऱ्यांचे एक पथक काम करेल , असा शब्द दिला होता . दुर्दैवाने सरकारने ते केले नाही . दारूबंदी ही सरकारची विशेष योजना असल्यामुळे तिथे स्वतंत्र मनुष्यबळ अंमलबजावणीसाठी आवश्यक असते . ते न करता केवळ अवैध दारू वाढली , असे म्हणण्यात अर्थ नसल्याचे नशाबंदी कार्यकर्ते नंदकिशोर तळाशीलकर यांनी सांगितले .  


व्यसनमुक्तीच्या धोरणाला हरताळ


उत्पादन शुल्कचे सरकारला जितके उत्पन्न मिळते . त्यातील किमान एक टक्का रक्कम सरकारने व्यसनमुक्तीच्या कामासाठी खर्च करावे , असे २०११ च्या व्यसनमुक्ती धोरणात ठरविण्यात आले होते . वास्तविक व्यसनमुक्तीच्या कामाला या रकमेचा काहीच उपयोग होत नाही . उलट महाराष्ट्रातील नशाबंदी मंडळ ही सर्वात जुनी गांधीवादी चळवळ असताना ठरवून दिलेले पूर्ण अनुदानसुद्धा गेली काही वर्षे दिले जात नाही , असे नशाबंदी कार्यकत्यांचे म्हणणे आहे .दारू पिण्याचे व इतर व्यसन करण्याचे वय दिवसेंदिवस कमी होते आहे. महाराष्ट्राच्या एकूणच भवितव्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे. तेव्हा आपण या विषयाकडे राजकारण आणि अर्थकारण याच्या पलीकडे बघून कठोर भूमिका घ्यावी व चंद्रपूरची दारूबंदी पुन्हा एकदा अमलात आणावी. महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीत काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते अत्यंत निराश झालो आहोत. आपण हा निर्णय न बदलल्यास महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील सर्व  कार्यकर्ते आंदोलनाची भूमिका घेतील याची कृपया नोंद घ्यावी. अशा आशयाची मागणी  हेरंब कुलकर्णी,वसुधा सरदार,पारोमिता गोस्वामी,अविनाश पाटील,वर्षा विद्या विलास,महेश पवार,तृप्ती देसाई,विजय सिद्धेवार,रंजना गवांदे,डॉ्. अजित मगदुम,प्रेमलता सोनूने,अड. सुरेश माने,तुलसीदास भोईटे,अमोल मडामे,बिसमिल्ला सय्यद ,शिवाजी तायडे ,मनोहर सरोदे ,विष्णू पिवळ ,आणि  महाराष्ट्रातील नशाबंदी कार्यकर्ते यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...