Skip to main content

युनुसची मुलगी ॲनी म्हणाली, अब्बू जब देखो तब कंप्युटरपे लगे रहते है

 



अमरावती  : अब्बू जब देखो तब कंप्युटरपे लगे रहते है… कोरोना साथीच्या काळात गत वर्षापासून सतत कार्यरत असलेल्या युनुस शहा यांची ॲनी अस्मिर ही चार वर्षांची चिमुकली सांगत होती. कोरोना साथीच्या काळात आयसीएमआर व आरोग्य यंत्रणेसाठी डेटा संकलनाची व समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्‍या युनुस शहा यांची सलग दुसरी ईदही कर्तव्य पाळून साजरी झाली.


श्री.शहा हे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत आहेत. कोविडबाधितांवरील उपचारांना गती देण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेचे काम विविध पातळ्यांवर सुरु असते. सीएस ऑफिसमधील सहकाऱ्‍यांना कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल वेळोवेळी मिळवणे, याद्या तयार करणे, त्यासाठी लॅब, रुग्णालये व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय राखणे, आयसीएमआर पोर्टलसाठी डेटा संकलन करणे, त्यात वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊन तशा नोंदी घेणे अशी अनेकविध कामे अव्याहतपणे करावी लागतात.


दवाखान्यात नवे रूग्ण येणे, नव्या चाचण्या, नवे निष्कर्ष प्राप्त होणे, नव्याने काही दुरुस्त्या कराव्या लागणे हे सातत्याने सुरुच असते. या सगळ्या नोंदी त्या-त्या वेळीच घ्याव्या लागतात. त्यामुळे थांबून चालत नाही. सगळ्या बाबी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या वाटून घेतल्या. गौरव इंगळे, शिवानी गहलोत, अविनाश शेंडे, साखरकर मॅडम, श्रीकांत शहाणे, दीपक लकडे, विशाल काळे, अनिकेत खाडे असे अनेक सहकारी कोविड रिपोर्टिंग सेंटरमध्ये अविरत कार्यरत आहेत…युनुस शहा सांगत होते.


डेटा अपडेशन सतत सुरु असते


जे काम जी व्यक्ती करत असते, तिने एक दिवसही थांबून चालत नाही. कारण, त्याच्या वर्गीकरणाच्या पद्धती, आयसीएमआरचे नियम, रुग्णालयांची माहिती व समन्वय प्रक्रिया याबाबतची अनेकविध प्रकारची माहिती ते काम नित्य करणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यालाच अधिक चांगले अवगत असते. साथीच्या या काळात हे काम अधिकाधिक निर्दोष होणे आवश्यक आहे.  त्यामुळे रजा घेता येत नाही व अनेक कामे एकहातीही करावी लागतात. सायंकाळी ऑफिस सोडले तरी घरी गेल्यावर उशिरापर्यंत काम सुरूच असते. सकाळी उठल्यावरही माहिती अपडेशनचे काम सुरु होते.


घरी गेल्यावर कुटुंबासोबत असतो, मात्र, कार्यालयीन काम सुरुच ठेवावे लागते. मध्ये मध्ये मुलांशी खेळायला वेळ मिळतो. युनुसला ॲनी अस्मिर ही चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा अकदस हा मुलगा आहे. आज मुलांसोबत राहून पण आपले कार्यालयीन कर्तव्य पूर्ण करून युनुसने ईद साजरी केली. अब्बू जब देखो तब कंप्यूटर पे लगे रहते है, अशी त्याच्या चिमुकलीची तक्रार आहे

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...