Skip to main content

म्यूकरमायकोसिसच्या बुरशीच्या वाढीचा वेग नेहमीपेक्षा दिडपट

 



सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या संशोधनातून माहिती आली समोर 


बार्शी/ प्रतिनिधी:- म्युकर मायकोसिसला कारणीभूत ठरलेली  बुरशी प्रक्रिया करून प्रयोग शाळेत वाढविण्यात येत असताना, सदर बुरशी  नेहमीपेक्षा  दिडपट वेगाने वाढत असल्याचे ,सूक्ष्मजीव शास्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांनी सांगितले.


बुरशी प्रयोगशाळेत वाढविण्यासाठी ३ ते  ४ % साखरेचे प्रमाण,५ ते ५.५ असा   अँसिडीक पीएच(सामू) व २५ ते ३० डिग्री सेंटिग्रेड तपमान हे तीन घटक आवश्यक असतात.हे लक्षात घेऊन बुरशीच्या प्राथमिक वाढीसाठी "समृद्धी पोषक माध्यम"(इन रिचमेन्ट  न्युट्रीयंट मेडीयम)वापरले जाते व नंतर पोषक माध्यम वापरून पुढील प्रयोग केले जातात. 




     या पद्धतीने जेंव्हा आम्ही रुग्णातील क्लिनिकल सॅम्पल मधील बुरशी वाढविण्याचा प्रयोग केला  तेंव्हा अत्यंत कमी वेळात बुरशीची वाढ झालेली आढळून आली.नेहमी जेवढी बुरशी वाढायला साधारण ४५ ते ४८ तास लागतात, तेवढयाच प्रमाणात बुरशी वाढायला फक्त ३० ते ३२ तास लागल्याचे या प्रयोगाच्या पाहणीत समोर आल्याचे सौ शेटे- मांडे यांनी सांगितले.

साथीच्या काळात रोगकारक जंतूंची संसर्ग क्षमता  व वाढीचा वेग वाढलेला असतोच.पण या केलेल्या प्रयोगात बुरशीचा वाढीचा वेग त्याहीपेक्षा थोडा अधिक असल्याचे नोंदण्यात आले आहे.हा वाढलेला वेग ,कोविड व मुधुमेह रुग्णामध्ये म्युकर मायकोसिसच्या लागण सहज होण्या संदर्भात चिंता वाढविणारा असल्याचे डॉ सुहास कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले.


या रोगाचा फंगस नाकावाटे प्रवेश करून,सायनस द्वारे डोळे व मेंदू यांना प्रादुर्भाव पोहचवू शकतो. त्यामुळे या फंगसला नाकात किंवा सायनस मध्येच अटकाव करून रुग्णाच्या डोळ्याची व मेंदूची हानी टाळता येऊ शकते.त्यासाठी कोविड रुग्णांची नाकाची तपासणी दर २ ते ३ दिवसांनी  तज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे अनिवार्य करावे असे डॉ सुहास कुलकर्णी यांनी मुद्दाम नमूद केले आहे


कोण आहेत संशोधक:

1) डॉ सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ व संशोधक आहेत,मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक तसेच  मराठी विज्ञान परिषद शाखा बार्शीचे उपाध्यक्ष आहेत .त्यांचे ५०पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रसिध्द झाले असून १५ नवीन शोध लावले आहेत.

2)सौ अमृता शेटे मांडे या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासिका असून पीएचडी करत आहेत


Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...