Skip to main content

हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन साजरा

 


 सुहेल सय्यद/सांगली - हयूमन वेलफेयर रिसर्च फाउंडेशन मार्फत मासिक पाळी दिन कवठे एकंद मध्ये साजरा करण्यात आला. या ऑनलाईन वेबिनोर ला महाराष्ट्रातून 176 लोकांनी नोंदणी केली होती. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक क्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र समाजामध्ये याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावेत यासाठी जागतिक पातळीवर दरवर्षी 28 मे हा मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.


     कार्यक्रमच्या प्रमुख वक्त्या डॉ. दीपशिखा दिवाकर स्त्री रोग तज्ञ  मध्यप्रदेश ह्या होत्या. यांनी मासिक पाळी म्हणजे काय, तसेच मासिक पाळी मध्ये घ्यायची काळजी, PCOD, मोनोपोज, गर्भाशयाच्या गाठी तसेच आहार कसा असावा या विषयवार मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, जो पर्यंत आपण या विषयावर उघडपणे बोलणार नाही चर्चा करणार नाही तो पर्यंत समाजातील अंधश्रद्धा व अज्ञानपना हा दूर होणार नाही यासाठी युवकांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे.


      या कार्यक्रमासाठी राज्यभरातून महिलांनी उपस्थिती दर्शवली या मध्ये कवठे एकंद च्या उपसरपंच सौ.शर्मिला घाईल, श्रीमती पी आर पाटील आय सी डी एस विभाग तासगाव, रितू पहानपटे आदिवासी विभाग चंद्रपूर, निशा पाटील समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना सांगली, सुनिता देशमुख, स्वाती टाकूडगे, मनीषा भोंगाळे उपस्थित होत्या.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे स्वयंसेवक अनिकेतन पवार व  आभार रमजान शेख यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्षा आरिफा मुजावर, उपाध्यक्षा शोभा माळी, अनुराधा पाटील, सामाजिक सल्लागार उर्मिला दशवंत संस्थेच्या सदस्या कीर्ती पवार, मुनेरा भालदार, प्रमोद माने, वासिम सय्यद यांनी केले  तांत्रिक सहाय्य सुहेल सय्यद यांनी केले

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...