Skip to main content

कथा एका नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या डॉक्टरची..

 



नि:स्वार्थ सेवा : कोरोना योद्धा डॉ.आरती धुमाळ


नवी मुंबई… लोकअर्थाने नियोजनबद्ध शहर. वैद्यकीय सुविधांची प्रचंड रेलचेल. तरीही कोरोना आजाराचा अवाढव्य खर्च कसा पेलवणार या विवंचनेतच सामान्य माणूस हतबल होतो. अशाच अत्यंत कठीण काळात साथ मिळाली ती डॉ.आरती गणेश धुमाळ ह्या समाजव्रती डॉक्टरांची. आणि सुरु झाली कोरोना युद्धात सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी.





डॉ.धुमाळ या नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी बेलापूर इथल्या हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागात मानद वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात घाबरलेल्या रुग्णांशी त्या स्वतः भरपूर गप्पा मारायच्या. सुसंवादातून त्यांची भीती घालवून आणि मग त्यांना योग्य ते औषधोपचार करायच्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या केस पेपरवर आवर्जून त्या स्वतःचा फोन नंबर लिहून ‘काहीही शंका असेल तर मला कधीही फोन करा’ असे आवर्जून सांगत. कोरोनाचा रुग्ण म्हटलं की, सगळेजण त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र डॉ.धुमाळांनी कधीही रुग्णांपासून लांब पळण्याचा प्रयत्न केला नाही. त्या रुग्णाला घरी गेल्यावरही फोन करून त्याच्या तब्येतीची विचारपूस करत.



अगदी लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या डॉ.आरती धुमाळ यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी गरजू आणि गरीब लोकांना अगदी कमी शुल्कामध्ये सर्व वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. वैद्यकीय सेवा हा डॉ.धुमाळ यांचा श्वास आहे. म्हणूनच या संकटकाळात शासनाच्यावतीने कोरोनाचं काम करत असताना त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. वर्षभरात शासनाचे कोणतेही मानधन न घेता नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात त्यांनी सेवा दिली. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे अशा परिस्थितीत शासन करीत असलेल्या प्रयत्नांत डॉ. धुमाळ जीव तोडून काम करीत आहेत. प्रत्येक माणूस आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित रहावा म्हणून त्यांचा प्रयत्न आहे.




शासनाच्या लसीकरण मोहिमेत अनेक लोक लस घ्यायला घाबरत होते. त्या सर्वांचे त्यांनी समुपदेशन केले. शासकीय सेवेत असलेले अनेक कर्मचारी आणि अधिकारी नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी डॉ.आरती धुमाळ म्हणजे वैद्यकीय सल्ला केंद्र आहे. अगदी कोरोना असो की, कोणतीही वैद्यकीय मदत यासाठी डॉ.धुमाळ सतत सहकार्य करीत असतात. अर्थात यासाठी त्यांना भक्कम साथ मिळाली ती कोकण भवन येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी असलेले पती डॉ.गणेश धुमाळ यांची… यामुळेच कोरोना काळात नवी मुंबई परिसरातील ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.


- प्रविण रा.डोंगरदिवे, माहिती सहाय्यक

- विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...