Skip to main content

सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश

 


सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश


 सोलापूर: कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्री (दि. 12 जानेवारी )  12 वाजल्यापासून ते 17 जानेवारी 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत.


            डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक)- मंगळवेढेकर इन्स्टिटयुट कॉर्नर- हरिभाई देवकरण प्रशाला समोरील रस्ता- स्ट्रीट रोड- सिद्धेश्वर कन्या प्रशाला समोरील रस्ता-वनश्री नर्सरी विष्णू घाट- गणपती घाट- सरस्वती कन्या प्रशाला- भूईकोट किल्ल्याचा आतील परिसर- चार पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक)  अशा ठिकाणांसह आतील सर्व परिसरात संचारबंदी आदेश लागू राहील. परिसरातील रहिवाशांना संबंधित पोलीस ठाण्याकडून प्रवेशासंबंधात रहिवाशी पुराव्यासह पास प्राप्त करुन घ्यावे लागतील. इतर बाहेरील व्यक्तींना परिसरात प्रवेशास मनाई असेल. मंदिर परिसर भागात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या शासकीय वाहनास प्रवेश राहिल. शासनाच्या वतीने सेवा बजावणाऱ्या व्यक्तींनी  स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवावे. दर्शनासाठी, यात्रेसाठी भाविकांना प्रवेशास व मंदिर परिसरात येण्यास मनाई असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

            होम मैदानामध्ये मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ, सराव, सेल्फी पॉइंटसाठी मैदान बंद राहिल. मंदिर परिसरात अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना वगळून इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद राहतील. धार्मिक विधीच्या ने-आणसाठी मर्यादित वाहनांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून पास प्राप्त करुन घ्यावा. मनोरंजन, करमणुक, खाद्यापदार्थ पुजा साहित्य विक्रीच्या दुकानास परवानगी नसल्याने दुकानदारांना प्रवेशास बंदी असेल. प्रतिबंधित क्षेत्रात आतिशबाजी, दारुकामांना मनाई असेल.  शहर, जिल्हा, इतर राज्याबाहेरील भाविकांना यात्रेस मनाई राहिल.  मंदिर परिसरात यात्रा कालावधीमध्ये परवानगी शिवाय इतर ठिकाणी नंदीध्वज, पालखी, वाद्यपथक यांच्या मिरवणुकीस मनाई असेल.  मंदिरातील दैनंदिन पूजा, धार्मिक विधी  करणाऱ्या पुजाऱ्यांना मर्यादित संख्येमध्ये पोलीस ठाण्याकडून पास घेवून प्रवेशास परवानगी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


            वरील बाबीचे  उल्लघंन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता 45 ऑफ 1860 कलम, 188,269,270 व इतर कायद्यामधील तरतुदीनुसार कायदेशीर/दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...