Skip to main content

दिल्ली शेतकरी आंदोलनाला बार्शीत मोटारसायकल रॅलीने पाठिंबा



बार्शी- - अखिल भारतीय किसान सभा, बार्शी तालूका कौन्सिलच्या  वतिने 26 जानेवारी 2021 वार मंगळवार रोजी दिल्ली येथे केंद्र सरकारने संमत केलेले तिन कृषी कायदे रद्द करावे यासाठी चालू असलेले अंदोलन व टॅ्‍क्टर रॅलीस पाठिंबा दर्शवण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.  हि रॅली काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्वक वातावरणात काढण्यात आली.  हि रॅली भगवंत मैदाण येथून निघून बार्शी शहराच्या मुख्य रत्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर पोहचून तेथे सभेत रूपांत झाले.  यावेळी मोटारसायकवरून शेतकरी व कार्यकर्ते जय जवान जय किसान, तिन काळे कृषी कायदे रद्द करा अशा घोषणा देत होते.

यावेळी झालेल्या सभेत काॅम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, केंद्र सरकार हुकूमशाही पध्दतीने वाटचाल करीत आहे, देशातील सर्वात मोठा घटक शेतकरी हे कायदा रद्द करण्याची मागणी करीत असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, परंतू कोणतीही तमा न बाळगता हे अंदोलन कायदे रद्द मागे घेवूनच थांबेल. यावेळी किसान सभेचे काॅम्रेड लक्ष्मण घाडगे यांचेही भाशण झाले.

      हि रॅली यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, पैगंबर मुलाणी, काॅम्रेड बाळासाहेब जगदाळे, सुनील जावळी, आयटक संलग्न डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघाचे काॅ. लहू आगलावे, काॅ. धनाजी पवार, काॅ. भारत भोसले, किसान मूळे, अनिल शिंदे, अनिस चे प्रा. ए.बी. कदम, विनायक माळी, ग्रामपंचायत संघटनेचे काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी, रशिद इनामदार, बांधकाम कामगार संघटनेचे काॅ. अनिरूध्द नखाते, बालाजी शितोळे, शाफीन बागवान, संतोश मोहिते, आयटक महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेचे काॅ. प्रविण मस्तुद, परमेश्‍वर पवार, उमेश मदणे, सुधीर सेवकर, आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशनचे काॅ. पवन आहिरे, भारत पवार, दिपक कोकाटे, तूषार कांबळे, अविराज चांदणे, बैक संघटनेच्या सरिता कुलकर्णी आदि उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...