Skip to main content

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..



20 जानेवारी 2021


1. मेष : लहानांशी मैत्री कराल. जवळचा मित्र परिवार गोळा कराल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. जुन्या कामातून धनलाभ संभवतो.


2. वृषभ : योग्य ठिकाणी कल्पकता दाखवावी. व्यवसायाचे सखोल ज्ञान घ्यावे. व्यवहारचातुर्य ठेवावे लागेल.


3. मिथुन : अंगीभूत कलेचे मूल्यमापन केले जाईल. लिखाणास प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तप्रियता दाखवाल.


4. कर्क : स्मरणशक्तीला ताण द्यावा. दिवसभर विचारात गर्क राहाल. तुमच्या अनुमानास निश्चिती येईल. इतरांना स्वेच्छेने मदत कराल.


5. सिंह : व्यापारात चांगला फायदा होईल. जोडीदाराशी गप्पा गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. कामातून समाधान शोधाल.


6. कन्या : जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मनातील चुकीचे विचार बाजूस सारावेत. नसत्या भांडणात पडू नका. त्वचा विकार जाणवू शकतात.


7. तूळ : नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा दर्शवाल. जरूर नसतांना उदारपणे वागू नका. डोळ्यांचे त्रास संभवतात.

8. वृश्चिक : जवळचे नातेवाईक भेटतील. मित्र-परिवाराबरोबर गप्पांमध्ये रमाल. उष्णतेचा त्रास संभवतो. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.


9. धनु : योग्य तर्क वापरावा लागेल. वक्तृत्वाची संधी चालून येईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो. बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल.


10. मकर : व्यवहारी बुद्धिमत्तेने वागणे ठेवाल. हसत खेळत कामे कराल. काही कामे अकारण रेंगाळतील. घेतलेल्या ज्ञानाचा सदुपयोग कराल.


11. कुंभ : काही ठिकाणी धूर्तपणा वापरावा लागेल. सगळीकडे बारीक नजर ठेवाल. तत्परतेने कामे कराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.


12. मीन : थोरांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. व्यावसायिक ज्ञान गोळा कराल. दिवसभर चंचलता जाणवेल. 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...