Skip to main content

24 जानेवारीला होणार , कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन




कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन व विकिस्त्रोतात वाचकार्पण ,परिसर शास्त्रज्ञ, पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते कार्यक्रम 

 

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे वाचकार्पण करण्याचा सोहळा परिसर शास्त्रज्ञ पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते रविवार, दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी11 वाजता ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.

 

मराठी भाषा पंधरवड्याच्या अनुषंगाने विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने या प्रकाशन व वाचकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,  अशी माहिती विद्यापीठातील  सामाजिक शास्त्रे संकुलांचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.  सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभणार आहे. झूम अॅपव्दारे हा प्रकाशन व वाचकार्पण सोहळा होणार असून त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी, अध्यापक , अर्थशास्त्राचे अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यासंदर्भात या ग्रंथाच्या लेखिका आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस  यांनी सांगितले की, हा ग्रंथ तीन भागात विभागलेला आहे. यात जागतिक समस्या, तत्कालीन भारतीय स्थिती तसेच महाराष्ट्र आणि विदर्भातील स्थिती यावर आधारलेले सोळा लेख यात आहेत. यात प्रामुख्याने आर्थिक समस्यांचा अभ्यास मांडलेला असून या ग्रंथास प्रख्यात लेखक व अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची प्रस्तावना लाभली आहे. पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे व विकिमिडिया मुक्त ज्ञानस्त्रोतात याचे वाचकार्पण होत आहे याचा मला आनंद वाटतो.

सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी सांगितले की,  विकिमिडिया प्रकल्पाच्या अंतर्गंत विकिपिडिया, विकिस्त्रोत असे अनेक प्रकल्प चालतात. मराठी भाषेतील लेखकांनी आपले ग्रंथ विकिस्त्रोत या मुक्त ज्ञानस्त्रोतावर उपलब्ध करुन द्यावेत व मराठी भाषेच्या समृध्दीला हातभार लावावी अशी मोहीम आम्ही विकीमिडिया प्रकल्पांतर्गत हाती घेतली आहे. मराठी भाषा पंधरवड्यात आमच्या या मोहिमेला प्रतिसाद देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस त्यांचा नवाकोरा ग्रंथ ऑनलाईन स्वरुपात प्रकाशित करुन, त्याचक्षणी विकिमिडिया मुक्त ज्ञानस्त्रोतात वाचकार्पण करीत आहेत हा चांगला आदर्श आहे. असा वाचकार्पण सोहळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे आणि हा ग्रंथ  विकिमिडिया ज्ञानस्त्रोतात लोकार्पण होऊन सर्वांसाठी खुला होत आहे, याचा मला आनंद वाटतो.    

संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक व सर्व वाचकांना उपयुक्त असा हा ग्रंथ असून तो ई-बुक स्वरुपात विकिमिडिया प्रकल्पात विकिस्रोतव्दारे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा,  असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सामाजिकशास्त्रे संकुलांचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...