पंढरपुर/गणेश सुरवसे-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशनचे थेट प्रक्षेपण अभाविप,पंढरपूर शाखेच्या वतीने सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज, कोर्टी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.अभाविप,पंढरपूर च्या वतीने सत्काररुपी स्वामी विवेकानंदांच्या विचाराची शिदोरी देण्यात आली.त्यावेळी सर्व तरुण सहकारी, परिषदेचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

Comments
Post a Comment