सोलापुर /अब्दुल शेख - सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचारी पगार दिला गेला नाही , या विषयाला घेऊन महाराष्ट्र राज्य जि.प आरोग्य सेवा कर्मचारी संघ संघटना आक्रमक झाली आहे . संघटनेकडून मा. जिल्हाधिकारी ,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांचे वेतन मागिल्ब 10 महिन्यांपासून वेळेवर होत नाही. आरोग्य कर्मचार्यांना वेतांनाशिवाय दूसरा कोणता उतपन्न स्त्रोत नाही.बँकांचे गृह कर्जाचे हफ्ते ,पत संस्थेचे हफ्ते वेळेवर न गेल्यास व्याज ,चेन बौन्स ई.मुळे कर्मचार्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आरोग्य कर्मचार्यांच्या सर्व संवर्गाच्या नियमित पदौन्नती गेल्या तीन वर्षापासून रखडलेली आहे. काही कर्मचार्यांचे 6 व्या वेतन आयोगाचे हफ्ते अद्याप फंडात जमा झाले नाहीत. वरील सर्व मागण्या चर्चे अंती लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्या. अन्यथा संसदीय मार्गाचा अवलंब करून आंदोलन ,उपोषण करावे लागेल ,असा इशारा निवेदांनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस विजया चव्हाण ,गोपाल शिंदे , चंद्र्कांत पवार ,अध्यक्ष मिलिंद गणफुले,उपाध्यक्ष शिवाजी कांबळे ,, कोशाध्यक्ष बाबा काळजे ,विभागीय अध्यक्षा विजया राऊत यांच्या सह्या आहेत.
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

आपण जनते साठी जे पत्रकारितेच्या स्वरूपातून जे कार्य करता ते खरंच उल्लेखनीय आहे.
ReplyDeleteतुमचे असेच काम चालत राहूद्या आम्ही तुमच्या बरोबर आहे. 🌹