Skip to main content

शेत रस्त्याचा विषय निकाली काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी



शेत रस्त्याचा विषय निकाली काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी -शिवार फाऊंडेशनचे आवाहन

उस्मानाबाद :- शेत रस्त्याच्या अडचणी असतील तर शिवार हेल्पलाइन संपर्क करा, या अवाहनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना योग्य ती माहिती सांगितली जात आहे. पण अर्ज करताना आवश्यक ते कागदपत्र व विहित नमुन्यात अर्ज करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रकरण निकाली निघण्यात विलंब होऊ शकतो. 

अर्ज करताना शेतकऱ्यांनी अर्जदार म्हणून वैयक्तिक नाव व सामूहिक प्रश्न असेल तर इतर शेतकऱ्यांची नावे ही टाकावीत,तसेच मोबाईल नंबर व स्वाक्षरी नमूद कराव्यात. विषय मध्ये योग्य तो गट नंबर / सर्वे नंबर नमूद करून जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या नावे पत्रामध्ये" अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान" याचाही उल्लेख करावा. सोबत गाव नकाशा व  संबंधित शेत रस्त्याचा ७/१२ जोडावा. गाव नकाशा घेण्यासाठी संबधित तलाठी/ग्रामसेवक यांना संपर्क साधावा. पूर्वी अर्ज केलेला असल्यास त्याची पोहोच पावती जोडावी. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्यात तहसील कार्यालय येथे जमा करावा.

अर्ज करताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

  यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे तिला समजल की ती स्वतःच त्यातून बाहेर पडेल

                                                                                             आज जागतिक मासिक पाळी दिन... सकाळी सकाळीच घरातीलच एक किस्सा आठवला. सध्या लॉकडाउनमुळे घरा घरात पापड्या कुरवडया बनवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत... तसाच कार्यक्रम काही दिवसांपूर्वी आमच्याही घरी चालू होता. घरात मासिक पाळी येणाऱ्या आम्ही तिघी. आई ,वहिनी आणि मी. त्यातही आईची पिशवी काढून टाकल्याने राहिलो आम्ही दोघीच वहिनी आणि मी... घरात एकीचे झाले  की एकीचे चक्र सुरू असते. त्यामुळे एकदा अशीच मजा घरात घडली. गेल्या महिन्यात आईने घरात कुरवडया बनविण्याचा घाट घातला, त्याही दोन टप्यात. पहिल्या टप्प्यातल्या कुरवड्या व्यवस्थित झाल्या अगदी कोणत्याही अडचणी व तक्रारीशिवाय . परंतु दुसऱ्या टप्प्यात मात्र आमच्या वहिनीबाईंची पाळी होती. त्यादिवशी सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि दत्ता द...