Skip to main content

केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी ,जास्तीत जास्त मदतीची शेतकऱ्यांकडून मागणी




सोलापूर: केंद्रीय पथकाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची काल सायंकाळी पाहणी केली. पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडी, बामणी, वाढेगाव तर मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावात भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी पथकातील केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव यश पाल, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांच्याकडे केली.

            पथकासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील, मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्यासह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

            केंद्रीय पथकाने सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे शिवाजी व्होवाळ यांच्या दोन एकरातील ज्वारी आणि डाळिंबाच्या बागेच्या नुकसानीची पाहणी केली. बामणी येथे अवि पोपट देशमुख यांच्या अडीच एकर डाळिंब बागेत भेट दिली.


            वाढेगाव येथे गोविंद चौगुले यांच्या डाळिंब बागेत पाणी घुसल्याने बहार धरता आला नसल्याचे सांगितले. याठिकाणी ड्रोनने घेतलेल्या व्हीडिओद्वारे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे पिकात पाणी घुसल्याची माहिती पथकाला मिळाली.

            कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील गणपत आवताडे यांच्या पाच एकर सूर्यफुलाचे पीक वाया गेले आहे. गेल्या 60 वर्षात असा पाऊस आणि पाणी पाहिले नसल्याचे श्री. आवताडे यांनी पथकाला सांगितले. पथकाने प्रत्येक शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचा सल्ला दिला.  याठिकाणी रूक्मिणी सिद्धेश्वर चोरमले या महिलेच्या एक एकर बाजरी आणि एक एकर मका पिकाची पाहणी पथकाने केली. श्रीमती चोरमले यांनी जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी केली.

            केंद्रीय पथक अतिवृष्टीचा अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असून त्यानंतर केंद्र सरकार मदत करणार आह

Comments

Popular posts from this blog

बाई व पाळी

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता...

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी संगणक प्रणालीवर त्वरीत नोंदणी करावी

                 ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन मुंबई : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानध...

ऐक ग ताई (मासिक पाळी व्यवस्थापन -एम एच एम ) -गुरु भांगे 

                      ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी          एमएचएम चे लय महत्व बाई Iधृ I वयात येता पाळी ही येई                      मातृचक्राची सुरुवात होई सुरुवात होता तू घाबरायचं नाही          MHM चे लय महत्व बाईI१I पाळी ही येता त्रास होईल ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल आहार चौरस सुरु ठेव ताई                MHM चे लय महत्व बाई I2I  मिठाचा वापर कमी तू कर ग                  कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग निरोगी राहण्याची ही चावी ताई        MHM चे लय महत्व बाईI3I चिडचिड होईल भीती ही वाटेल गोंधळ होईल राग तुला येईल  यामुळे घाबरून जायचे नाही                  MHM चे लय महत्व बाई I४I थकवा वाटेल ,ताण तुला येईल            ...